एक्स्प्लोर

PM Kisan 22th Installment: 'पीएम किसान योजने'चा २२ वा हप्ता कधी मिळणार? तारीख आली समोर, सर्वाधिक लाभार्थी अहिल्यानगरचे

PM Kisan 22th Installment: योजनेच्या निधी वितरणाचा मुख्य सोहळा गुवाहाटी येथे होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

PM Kisan 22th Installment: शेकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे, पीएम किसान सन्मान निधीचा २२ वा (PM Kisan 22th Installment) हप्ता शुक्रवारी (दि. १३) शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. यासाठी राज्यातील ९१ लाख १८ हजार ८३१ शेतकरी पात्र आहेत. निधी वितरणाचा मुख्य कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आसामची राजधानी गुवाहाटी येथे होणार आहे. राज्यातील कार्यक्रमाचे नियोजन सुरू असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे. या योजनेचा २१ वा हप्ता नोव्हेंबर (PM Kisan Installment) महिन्यात वितरित करण्यात आला होता. सुमारे चार महिन्यांच्या अंतरानंतर आता २२ व्या हप्त्याची घोषणा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या हप्त्याचे वितरण विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, या योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये सर्वाधिक संख्या अहिल्यानगर जिल्हा येथील असून, या जिल्ह्यातील सुमारे ५ लाख ४५ हजार २८० शेतकरी या हप्त्यासाठी पात्र असल्याची माहिती समोर आली आहे.(PM Kisan 22th Installment)

केंद्र सरकारने पीएम किसान सन्मान निधी योजना अंतर्गत २१ वा हप्ता १९ नोव्हेंबर रोजी लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा केला होता. त्यानंतर २२ व्या हप्त्यासाठी पात्र लाभार्थ्यांची यादी निश्चित करण्यात आली. सुरुवातीला हा हप्ता जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी दिला जाईल, अशी चर्चा होती; मात्र तो मुहूर्त साधता आला नाही.

२१ व्या हप्त्यात राज्यातील सुमारे ९० लाख ४१ हजार २४१ शेतकरी पात्र ठरले होते. आता २२ व्या हप्त्यासाठी ९१ लाख १८ हजार ८३१ शेतकरी पात्र ठरले असून, यावेळी लाभार्थ्यांच्या संख्येत १ लाख २ हजार ५९० शेतकऱ्यांची वाढ झाली आहे. या योजनेअंतर्गत निधी वितरणाचा मुख्य कार्यक्रम आसामची राजधानी गुवाहाटी येथे शुक्रवारी (१३ तारखेला) आयोजित करण्यात आला आहे. राज्यातील कार्यक्रमाचे नियोजन सुरू असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे.

दरम्यान, पीएम किसान योजनेचा २२ वा हप्ता यापूर्वी जानेवारीअखेर वितरित केला जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. त्यानंतर राज्यातील जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ७ फेब्रुवारीपूर्वी निधी वितरित केला जाईल, अशी चर्चा सुरू होती. मात्र प्रत्यक्षात हा हप्ता देण्यात विलंब झाला.

आता आसाम, पश्चिम बंगालसह काही राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या हप्त्याचे वितरण करण्यात येत असल्याची माहिती अधिकृत सूत्रांकडून देण्यात आली. २१ वा हप्ता दिल्यानंतर जवळपास चार महिन्यांनी हा पुढील हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

 पहिले पाच लाभार्थ्यांचे जिल्हे कोणते

योजनेच्या २२ व्या हप्त्यासाठी सर्वाधिक ५ लाख ४५ हजार २८० शेतकरी अहिल्यानगर जिल्ह्यातील असून त्याखालोखाल सोलापूर जिल्ह्यातील ४ लाख ९२ हजार ४४१, कोल्हापूर जिल्ह्यातील ४ लाख ६४ हजार ८६९, तर सातारा जिल्ह्यातील ४ लाख ३८ हजार ६६८ शेतकरी व पुणे जिल्ह्यातील ४ लाख ३३ हजार ७०६ शेतकरी लाभार्थी ठरले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

देशात रोजगाराच्या बाबातीत उत्तर प्रदेश आघाडीवर, महाराष्ट्राचा कितवा नंबर? इंडिया स्किल्स रिपोर्टमधून महत्वाची माहिती समोर
देशात रोजगाराच्या बाबातीत उत्तर प्रदेश आघाडीवर, महाराष्ट्राचा कितवा नंबर? इंडिया स्किल्स रिपोर्टमधून महत्वाची माहिती समोर
Global Food Crisis Warning Marathi News: 2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
Vimal Pan Masala Owner Net Worth: FDA ची शाहरुख, अजय, टायगरला नोटीस; कोण आहेत विमल पान मसालाचे मालक?; कोट्यवधींचे साम्राज्य, चक्रावून टाकणारी संपत्ती!
FDA ची शाहरुख, अजय, टायगरला नोटीस; कोण आहेत विमल पान मसालाचे मालक?; कोट्यवधींचे साम्राज्य, चक्रावून टाकणारी संपत्ती!
एका दिवसात किती रेल्वे गाड्या चालवल्या जातात? किती होते कमाई आणि किती होतो खर्च? जाणून घ्या सविस्तर माहिती
एका दिवसात किती रेल्वे गाड्या चालवल्या जातात? किती होते कमाई आणि किती होतो खर्च? जाणून घ्या सविस्तर माहिती

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Embed widget