आयपीओंचा धमाका! या आठवड्यात येणार एकूण 4 नवे आयपीओ; पैसे घेऊन राहा तयार
या आठवड्यात एकूण चार आयपीओ येणार आहेत. त्यामुळे या आयपीओंमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
![आयपीओंचा धमाका! या आठवड्यात येणार एकूण 4 नवे आयपीओ; पैसे घेऊन राहा तयार share market update ipo update total four ipo coming for upcoming week know detail information in marathi आयपीओंचा धमाका! या आठवड्यात येणार एकूण 4 नवे आयपीओ; पैसे घेऊन राहा तयार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/08/18/efc6b7cd4d9f857cf5ad9f01ab9f947c1723948741032988_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : या आठवड्यात गुंतवणूकदारांना आयपीओच्या माध्यमातून चांगला परतावा मिळण्याची नामी संधी चालून आली आहे. कारण या आठवड्यात दोन मनेबोर्ड सेगमेंट तर दोन एसएमई सेगमेंटचे आयपीओ येणार आहेत. मेनबोर्ड सेमेंटच्या यादीत ओरियंट टेक्नॉलॉजीज आणि इन्टार्क बिल्डिंग यांचा समावेश आहे. तर एसएमई सेगमेंटमध्ये ब्रेस पोर्ट लॉजिस्टिक्स आणि फोर्कास स्टूडिओ हे दोन आयपीओ गुंतवणुकीसाठी खुले होणार आहेत.
या एकूण चार नव्या आयपीओंसह या आठवड्यात एकूण पाच कंपन्या शेअर बाजारावर सूचिबद्ध होणार आहेत. यामधअये सरस्वती साडी डिपोचाही समावेश आहे. सेबीने एखूण 25 कंपन्यांच्या आयपीओंना मंजुरी दिली आहे. त्यामुळे आगामी काळातही नवे आयपीओ येण्याची शक्यता आहे.
इन्टार्क बिल्डिंग प्रोडक्ट्स आईपीओ
स्टील कन्स्ट्रक्शन सोल्यूशन प्रोव्हाईडर इन्टार्क बिल्डिंग प्रोडक्ट्स या कंपनीचा एकूण 1,186 कोटी रुपयांचा आयपीओ येत आहे. या आयपीओचा किंमत पट्टा (प्राईस बँड) 850-900 रुपये जाहीर करण्यात आला आहे. हा आयपीओ येत्या 19 ऑगस्ट रोजी गुंतवणुकीसाठी खुला होणार असून 21 ऑगस्टपर्यंत तुम्हाला यात पैसे गुंतवता येणार आहेत. या आयपीओत 200 कोटी रुपयांचे फ्रेश शेअर दिले जातील तर 400.28 कोटी रुपयांचे शेअर्स ऑफर फॉर सेलच्या माध्यमातून विकले जातील. ऑफर फॉर सेलच्या मदतीने अरविंद नंदा, गौतम सुरी, ईशान सुरी, शोभना सुरी आणि ओआयएच मॉरीशस लिमिटेड आपली हिस्सेदारी विकणार आहेत.
ओरियंट टेक्नॉलॉजीज आईपीओ
आयटी सोल्यूशन प्रोव्हाईडर टेक्नॉलॉजीजने 195-206 रुपए किंमत पट्टा निश्चित केला आहे. 21 ऑगस्ट रोजी हा आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला होणार असून 23 ऑगस्टपर्यंत तुम्हाला या आयपीओत गुंतवणूक करता येईल. ही कंपनी आयपीओच्या माध्यमातून 215 कोटी उभारणार आहे. त्यासाठी 120 कोटी रुपयांचे फ्रेश इक्विटी तर 46 लाख शेअर हे ऑफर फॉर सेलच्या माध्यमातून विकले जातील. ओएफएस अंतर्गत प्रमोटर अजय बळीराम सावंत, उमेश नवनीतल शाह, उज्वल अरविंद म्हात्रे आणि जयस मनहरलाल हे आपली हिस्सेदारी विकतील.
एसएमई सेगमेंटमध्ये येणार दोन नवे आयपीओ
एसएमई सेगमेंटमध्ये दोन नवे आयपीओ येणार आहेत. या नव्या आयपीओंमध्येफोर्कास स्टूडिओ आणि ब्रेस पोर्ट लॉजिस्टिक्सचा समावेश आहे. हे दोन्ही आयपीओ गुंतवणुकीसाठी 19 ऑगस्ट रोजी खुले हतोतील. 21 ऑगस्टपर्यंत गुंतवणऊकदारांना यात गुंतवणूक करता येईल. फोर्कास कंपनीने आपल्या प्रत्येक शेअरचे मूल्य 77-80 रुपये निश्चित केले आहे. तर ब्रेस पोर्टने शेअरचे मूल्य 76-80 रुपये प्रति शेअर निश्चित केले आहे.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
हेही वाचा :
सहा महिन्यांच्या आत दिले 1400 टक्क्यांनी रिटर्न्स, 'या' कंपनीत गुंतवणूक करणारे झाले मालामाल!
IPO Update : दोन दिग्गज कंपन्यांचे लवकरच येणार आयपीओ, पैसे घेऊन राहा तयार!
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)