शेअर बाजाराची सकारात्मक सुरुवात; सेन्सेक्समध्ये 539 अंकाची उसळण
Share Market Updates : बुधवारी शेअर बाजार चांगलाच वधारला. मागील दिवसांपासून विक्रीचा सपाटा सुरू होता. आज मात्र, गुंतवणुकदारांचा खरेदीकडे कल दिसून आला.
Share Market Updates : मागील काही सत्रात घसरण सुरू असणारा शेअर बाजार आज वधारला आहे. बुधवारी शेअर बाजाराने चांगली सुरुवात केली. प्री-ओपनिंगपासून सकारात्मक संकेत देणारा शेअर बाजार व्यवहार सुरु होताच 0.60 टक्क्यांनी वधारला. आज सेन्सेक्स, निफ्टीत चांगली खरेदी होण्याची शक्यता आहे.
प्री-ओपन सेशनमध्ये सेन्सेक्स 350 अंकांनी वधारला. बाजारातील व्यवहार सुरू होताच किंचीत घसरण झाली. मात्र, बाजार पुन्हा 330 अंकांनी वधारत 58,100 अंकावर पोहचला होता. त्यानंतर सेन्सेक्स 539 अंकांनी वधारला होता. निफ्टीदेखील वधारला होता. निफ्टी 17,380 अंकांवर ट्रेड करत होता.
जागतिक बाजारपेठांमधील तेजीचा परिणाम भारतीय बाजारपेठांवर दिसून आला. आशियाई बाजारपेठा देखील तेजी दिसून आली. सिंगापूरमधील इंडेक्स SGX Nifty देखील वधारला होता.
शेअर बाजार सुरू होताच आयटी आणि मेटलच्या क्षेत्रात तेजी दिसून आली. इन्फोसिस, एचडीएफसी बॅंकेचे शेअर्स वधारलेत. खासगी आणि सार्वजनिक बँकांचे शेअर्स वधारले आहेत.
मंगळवारी बाजार सावरला
मंगळवारी शेअर बाजारातील घसरणीला काहीसा लगाम लागला. मंगळवारी शेअर बाजार होताना सेन्सेक्स 187.89 अंकांनी तर निफ्टीही 53.20 अंकानी वधारला होता.
बाजार बंद होताना ऑटो, मेटल, फार्मा, सार्वजनिक बँका ही क्षेत्रं वगळता इतर सर्व क्षेत्रांच्या शेअर्समध्ये घसरण झाली होती. BSE मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्येही 0.45 ते 1.4 टक्क्यांची घसरण झाली.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- Indian Post: पोस्ट ऑफीसमध्ये 400 रुपये गुंतवा आणि व्हा एक कोटींचे मालक, जाणून घ्या सविस्तर
- LIC IPO : तुमच्याकडे विमा पॉलिसी असेल तर शेअर्स स्वस्त मिळणार
- National Pension Scheme : रिटायरमेंटच्या आधी भासतेय पैशांची गरज? NPS च्या माध्यमातून होईल चणचण दूर, 'या' अटी कराव्या लागतील पूर्ण
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha