LIC IPO : तुमच्याकडे विमा पॉलिसी असेल तर शेअर्स स्वस्त मिळणार
LIC IPO : एलआयसी त्यांच्या आयपीओसाठी 10 फेब्रुवारी रोजी सेबीकडे DRHP सादर करणार आहे.
LIC IPO : देशातील सर्वात मोठी जीवन विमा कंपनी एलआयसीचा आयपीओ मार्च 2022 मध्ये येणार आहे. कंपनी या आठवड्यात इश्यूसाठी रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (DRHP) मसुदा सादर करणार आहे. ज्यांच्याकडे एलआयसीचा विमा आहे त्यांना सवलतीत आयपीओ मिळू शकेल अशी अपेक्षा आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एलआयसी पॉलिसी धारक आयपीओ 5% कमी किंमतीत मिळवू शकतात.
एलआयसी त्यांच्या आयपीओसाठी 10 फेब्रुवारी रोजी सेबीकडे DRHP सादर करणार आहे. दरम्यान एलआयसीचा हा इश्यू किरकोळ गुंतवणूकदार आणि कंपनीच्या कर्मचार्यांना काही सवलतीत देखील उपलब्ध होऊ शकतो. मात्र, ही सवलत किती असू शकते हे अद्याप कळू शकलेले नाही.
एलआयसीकडून या आठवड्यात इश्यूसाठी अर्ज सादर केला जाऊ शकतो अशी माहिती गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभाग (DIPAM) सचिव तुहिन कांत पांडे यांनी दिली होती
पांडे यांनी रॉयटर्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, एलआयसीचे मूल्य 5 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त असू शकते. आणि त्याचे एंटरप्राइज मूल्य त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त असू शकते. एलआयसीचा डीआरएचपी जमा केल्यानंतर, सरकारला एलआयसीमध्ये किती स्टेक विकायचा आहे हे कळेल.
इतर महत्त्वाच्या बातम्या :