मोठ्या घसरणीनंतर शेअर बाजार सावरला; सेन्सेक्स 198 अंकांनी वधारला
share market news : मागील काही दिवस घसरण दिसून येणारा शेअर बाजार मंगळवारी सावरला. पेटीएमचाही शेअर मंगळवारी वधारला.
Mumbai Share Market news : मंगळवारी घसरणीसह सुरू झालेला शेअर बाजार दुपारी चांगलाच सावरला. शेअर बाजार बंद झाला तेव्हा सेन्सेक्स (Sensex) 198 अंकांनी वधारला होता. सोमवारी शेअर बाजारात जोरदार विक्री झाल्याने बाजार घसरला होता. वीज, टेलिकॉम आणि फार्मा कंपन्यांच्या शेअरमध्ये चांगली खरेदी दिसून आली. सुरुवातील सेन्सेक्स जवळपास 300 अंकांनी घसरला होता. मात्र, त्यानंतर सेन्सेक्स सावरू लागला. अखेर 198.44 अंकांनी वधारुन 58,664.33 अंकावर बाजार बंद झाला.
नॅशनल स्टॉक एक्सचेंजही 86.80 अंकानी वधारला. निफ्टी (Nifty) 17,503.35 अंकावर बंद झाला. सेन्सेक्स कंपन्यांमध्ये पॉवरग्रीडचा शेअर चार टक्क्यांनी वधारला. एनटीपीसी, टाटा स्टील, भारती एअरटेल, सनफार्मा, बजाज फिनसर्व या स्टॉकमध्ये खरेदी दिसून आली. तर, इंडसइंड बँक, एशियन पेंट्स, इन्फोसिस, मारुती, अॅक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक आदी शेअरमध्ये घसरण झाली.
Latent View Analytics मुळे गुंतवणुकदारांची चांदी
Latent View Analytics आज शेअर बाजारात सूचीबद्ध झाला. अपेक्षेप्रमाणे आयपीओ मिळालेल्या गुंतवणुकदारांना मोठा फायदा झाला. आयपीओमध्ये प्रति शेअर 197 इतकी दर होता. मात्र, Latent View Analytics सूचीबद्ध होताना 148 टक्क्यांनी वधारला आणि 488.75 रुपयांवर बंद झाला.
पेटीएमही वधारला
शेअर बाजारात सूचीबद्ध झाल्यापासून दोन दिवस घसरण दिसून आलेल्या पेटीएमचा शेअर मंगळवारी वधारला. पेटीएमच्या शेअर खरेदीसाठी गुंतवणुकदारांनी उत्साह दाखवल्याने शेअर आज 10 टक्क्यांनी वधारला. बाजार बंद झाला तेव्हा शेअरचा दर 1495 रुपये इतका होता.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
स्टॉक गुरू गुजराल म्हणतात, पैसा सर्वस्व नाही, राकेश चालू शकत नाही आणि मी...
म्युच्युअल फंड गुंतवणुकीचा 'हा' नियम ठाऊक आहे का? 15 वर्षात होऊ शकता करोडपती
'या' दोन सरकारी कंपन्याची मालमत्ता विक्रीला; मोदी सरकार उभारणार 1100 कोटी!
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha