(Source: ECI/ABP News/ABP Majha)
रेल्वे सेक्टरचे 'हे' दोन स्टॉक्स पाडणार पैशांचा पाऊस, 15 दिवसांत देणार दमदार रिटर्न्स?
सध्या शेअर बाजारात चांगलीच तेजी दिसत आहे. याच कारणामुळे सध्या गुंतवणूकदारांना मोठ्या प्रमाणात नफा होत आहेत. काही चांगल्या स्टॉक्समध्ये गुंतवून तुम्ही चांगला परतावा मिळवू शकता.
Railway PSU Stocks to BUY: सध्या शेअर बाजारात वेगवेगळ्या शेअर्समध्ये चांगलीच तेजी पाहायला मिळत आहे. गुंतवणूकदार अनेक शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत. गेल्या 12 सत्रांत भांडवली बाजाराचा (Share Market) आलेख चढाच राहिलेला आहे. शेअर बाजारातील सध्याची स्थिती पाहून शेअर बाजारातील तज्ज्ञांनी काही सर्वोत्तम स्टॉक्स सुचवले आहेत. या शेअर्समध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे.
सध्याची भांडवली बाजाराची स्थिती लक्षात घेता पोजिशनल ट्रेडर्ससाठी 5 ते 15 दिवसांसाठी रेल्वे सेक्टरधील दोन स्टॉक्स (Best Stocks To Invest) सुचवण्यात आले आहेत. या दोन्ही स्टॉक्सची नावे IRCTC आणि रेल विकास निगम लिमिटेड अर्थात RVNL अशी आहेत.
IRCTC शेअरची टार्गेट प्राईज काय? (IRCTC Share Price Target)
ब्रोकरेज फर्म शेरखानने IRCTC या शेअरमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. पुढच्या 15 दिवसांसाठी या शेअर्समध्ये गुंतवणूक (Share Market Investing) कर शकता असे शेरखानने सांगितले आहे. या शेअरमध्ये गुंतवणूक करत असाल तर त्यासाठी पहिले टार्गेट हे 980 रुपये आणि दुसरे टार्गेट हे 1020 रुपयांचे ठेवायला हवे, असे शेरखानने म्हटले आहे. सध्या हा शेअर 940 रुपयांवर आहे.
आरव्हीएनएल शेअरमध्ये कधी गुंतवणूक करावी (RVNL Share Price Target)
अॅक्सिस डायरेक्ट या ब्रोकरेज फर्मने आगामी 15 दिवसांचा विचार करून RVNL म्हणजेच रेल विकास निगम लिमिटेड या शेअरमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. 590 ते 602 रुपयांवर असताना हा शेअर खरेदी करावा. तसेच या शेअरमध्ये गुंतवणूक केल्यानंतर टार्गेट प्राईज 655 रुपयांचे असावे, असे अॅक्सिस डायरेक्ट या ब्रोकरेज फर्मने सांगितले आहे. या शेअरमध्ये गुंतवणूक करताना 582 रुपयांचा स्टॉप लॉस लावावा असहं सांगण्यात आलंय.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
हेही वाचा :
मुकेश अंबानींनाही टाकलं मागे! 'हा' दिग्गज उद्योगपती ठरला भारताचा सर्वोच्च धनिक, संपत्ती तब्बल...