मुकेश अंबानींनाही टाकलं मागे! 'हा' दिग्गज उद्योगपती ठरला भारताचा सर्वोच्च धनिक, संपत्ती तब्बल...
जगभरात प्रसिद्ध असलेल्या मुकेश अंबानी यांना आता एका उद्योगपतीने मागे टाकलं आहे. हा उद्योगपती मुकेश अंबानींपेक्षाही श्रीमंत झालेला आहे.
रिलायन्स उद्योग समुहाचे अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक मुकेश अंबानी ही भारतातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखले जातात. गेल्या कित्येक वर्षांपासून त्यांचे हे प्रथम क्रमांकाचे स्थान अबाधित होते. मात्र आता मुकेश अंबानी आता भारतातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती राहिलेले नाहीत. त्यांना भारतातील दिग्गज उद्योजक गौतम अदाणी यांना मागे टाकलं आहे. म्हणजेच हुरुन श्रीमंतांच्या यादीनुसार (2024 Hurun India Rich List) गौतम अदाणी हे भारतातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. या यादीनुसार श्रीमंतांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर घसरले आहेत. भारतातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती म्हणून समोर आल्यानंतर पर्यायाने गौतम अदाणी आशिया खंडातील श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत.
देशात प्रत्येक पाच दिवसांत एक अब्जाधीश
हुरुन इंडिया रिच 2024 या यादीनुसार श्रीमंतांच्या या यादीत एकूण 1,539 श्रीमंतांचा समावेश आहे. या सर्व श्रीमंतांची संपत्ती ही 1 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. 31 जुलै 2024 पर्यंतच्या डेटानुसार हुरून श्रीमंतांची यादी तयार करण्यात आलेली आहे. या यादीनुसार भारतात गेल्या वर्षभरात प्रत्येक पाच दिवसांत एक अब्जाधीश झालेला आहे.
गौतम अदाणी यांची संपत्ती नेमकी किती?
हुरुन इंडिया रिच 2024 च्या यादीनुसार 62 वर्षीय गौतम अदाणी 1 लाख 61 हजार 800 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. तर या यादीनुसार श्रीमंतीच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या मुकेश अंबानी यांची संपत्ती 1,014,700 कोटी रुपये आहे. या यादीच्या तिसऱ्या स्थानी एचसीएल शिव नादार आहेत. त्यांची संपत्ती 314,000 कोटी रुपये आहे. या यादीत पाचव्या स्थानी सन फार्माचे दिलीप सिंघवी आहेत. त्यांची संपत्ती 249,900 कोटी रुपये आहे.
Who Tops the 2024 Hurun India Rich List?
— HURUN INDIA (@HurunReportInd) August 29, 2024
Gautam Adani leads the charge, followed by Mukesh Ambani and Shiv Nadar. But who else makes the top 10? Uncover the full lineup of India's wealthiest individuals and see how fortunes have shifted.
For the complete list and exclusive… pic.twitter.com/PDQKlXEtDH
श्रीमंतांच्या यादीत शाहरुख खानचाही समावेश
हुरुन इंडिया रिच 2024 च्या यादीत प्रसिद्ध अभिनेत्रा शाहरुख खानचाही समावेश करण्यात आला आहे. शाहरुख हा अब्जाधीश असून त्याची एकूण संपत्ती 7300 कोटी रुपये आहे. कोलकाता नाईट रायडर्स आणि रेड चिलीज एंटरटेन्मेंट या दोन कंपन्यांत असलेल्या हिस्सेदारीमुळे शाहरुख खान अब्जाधीश म्हणून समोर आला आहे. या यादीत शाहरुखसह अमिताभ बच्चन, चुही चावला आणि कुटुंब, करण जोहर, ऋतिक रोशन यांचाही समावेश आहे.
हेही वाचा :
LIC : एलआयसीकडून सरकारला 6 हजार 103 कोटींचा निधी सुपूर्द, कंपनीने नेमका किती मिळवला नफा?
मुकेश अंबानींकडून मोठी घोषणा! जिओ वापरकर्त्यांना दिवाळीत जबरदस्त गिफ्ट, 'ही' गोष्ट मिळणार अगदी मोफत!
मुंबईच्या म्हाडाच्या सोडतीबाबत मोठी अपडेट, फॉर्म भरणाऱ्यांना घर मिळालं की नाही हे कधी समजणार?