(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Share Market : शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स 650 अंकांनी वधारला
Share Market Opening Bell : शेअर बाजारात आज तेजी दिसत असून सेन्सेक्स 600 हून अधिक अंकांनी वधारला.
Share Market Opening Bell : शेअर बाजारात आज खरेदीचा जोर दिसून येत आहे. शेअर बाजाराची सुरुवात आज वधारत झाली. आशियाई शेअर बाजारात असलेल्या तेजी परिणाम भारतीय शेअर बाजारावरही दिसून आला. मुंबई शेअर बाजाराचा सूचकांक सेन्सेक्समध्ये 630 अंकांची तेजी दिसून आली. तर, निफ्टी 175 अंकांनी वधारला.
शेअर बाजारात आज सुरुवातीच्या सत्रात तेजी असल्याचे चित्र आहे. सेन्सेक्स 623 अंकांनी वधारत 55,507 अंकांवर खुला झाला. तर, निफ्टी 175 अंकांनी वधारत 16527.60 अंकावर खुला झाला. सकाळी 9.45 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्समध्ये 841.41 अंकांची तेजी दिसून आली. त्यावेळी सेन्सेक्स 55731 अंकांवर व्यवहार करत होता. तर, निफ्टी निर्देशांकात 265 अंकाची उसळण दिसत असून 16623 अंकाची तेजी दिसून आली आहे.
शेअर बाजारातील सर्व सेक्टरमध्ये तेजी असल्याचे चित्र आहे. बँकिंग, आयटी, ऑटो, एफएमसीजी, एनर्जी सारख्या क्षेत्रात तेजी असल्याचे चित्र आहे. निफ्टीतील 50 पैकी 47 शेअर्स तेजी दिसून येत आहे. तर, तीन शेअर दरात घसरण झाली आहे. सेन्सेक्समधील 30 शेअर पैकी 27 शेअरमध्ये तेजी दिसत आहे.
इन्फोसिस शेअर दरामध्ये 2.89 टक्क्यांची वाढ झाली आहे. यूपीएलच्या शेअर दरात 2.56 टक्के, HCL टेकमध्ये 2.44 टक्क्यांनी वाढ झाली आहे. टाटा मोटर्स 2.42 टक्के, ग्रासिम 2.39 टक्के, अदानी पोर्ट्स 2.29 टक्के, विप्रो 2.27 टक्के, टायटन कंपनी 2.09 टक्के, टेक महिंद्रा 5 टक्क्यांनी वधारले आहेत.
दरम्यान, शुक्रवारी शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्स 632 अंकांनी, तर निफ्टीही 182 अंकानी वधारला होता. सेन्सेक्समध्ये 1.17 टक्क्यांची वाढ होऊन तो 54,884 बंद झाला. तर निफ्टीमध्ये 1.13 टक्क्यांची वाढ होऊन तो 16,352 वर बंद झाला होता. शुक्रवारी 2152 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे. तर, 1099 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण नोंदवण्यात आली आहे. 119 कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही.