एक्स्प्लोर

Stock Market Closing Bell : शेअर बाजारात दिवसभरात अस्थिरता; तरीही गुंतवणूकदारांना दोन लाख कोटींचा फायदा

Sensex Closing Bell : आज शेअर बाजारातील व्यवहारात अस्थिरता दिसून आली असली तरी गुंतवणूकदारांना फायदा झाला.

मुंबई: आज भारतीय शेअर बाजारात (Share Market) दिवसभर अस्थिरता दिसून आली. सेन्सेक्स-निफ्टी निर्देशांकात चढउतार दिसून आला. या अस्थिरतेच्या वातावरणात मिड कॅप स्टॉक्समध्ये (Mid Cap Stocks) गुंतवणूकदारांकडून खरेदीचा जोर दिसल्याने निर्देशांक वधारला. आज बाजारातील व्यवहार स्थिरावले तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स (BSE Sensex) फक्त 4 अंकांनी वधारत 65,220  अंकांवर स्थिरावला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी (NSE Nifty) 3 अंकांनी वधारत 19,396  अंकांवर बंद झाला. 

कोणत्या सेक्टरमध्ये चढ-उतार?

ऑटो, एफएमसीजी, मेटल्स, मीडिया, एनर्जी, इन्फ्रा, ग्राहकोपयोगी वस्तू या क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी तेजी दिसून आली आहे. तर, फार्मा, आयटी, बँकिंग सेक्टरमध्ये विक्रीचा जोर दिसून आल्याने  घसरण झाली. आजच्या व्यवहारात मिड कॅप आणि स्मॉल कॅप स्टॉक्समध्ये तेजी दिसून आली. मिड कॅप इंडेक्समध्ये 1 टक्का अर्थात 418 अंकांच्या तेजीसह 38,544  अंकांच्या आतापर्यंतच्या उच्चांकावर स्थिरावला. सेन्सेक्स निर्देशांकातील 30 पैकी 15 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली. तर, निफ्टी निर्देशांकातील 50 कंपन्यांपैकी 28 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली. 

इंडेक्‍स  किती अंकांवर बंद दिवसभरातील उच्चांक दिवसभरातील नीचांक किती टक्के बदल
BSE Sensex 65,220.03 65,362.91 65,165.45 0.01%
BSE SmallCap 35,850.19 35,873.15 35,619.85 0.89%
India VIX 11.75 12.09 11.59 -1.78%
NIFTY Midcap 100 38,544.30 38,563.00 38,237.65 1.10%
NIFTY Smallcap 100 11,852.50 11,861.20 11,797.55 0.81%
NIfty smallcap 50 5,378.05 5,382.30 5,348.35 0.86%
Nifty 100 19,325.45 19,364.25 19,305.50 0.11%
Nifty 200 10,317.25 10,331.20 10,299.20 0.26%
Nifty 50 19,396.45 19,443.50 19,381.30 0.01%

गुंतवणूकदारांना दोन लाख कोटींचा फायदा

आजच्या व्यवहारात बाजारात अस्थिरता दिसून आली तरी गुंतवणूकदारांच्या संपत्तीत मोठी वाढ दिसून आली. मुंबई शेअर बाजारावर सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांचे बाजार भांडवल (Market Cap) 308.35 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. सोमवारी, हे बाजार भांडवल 306.39 लाख कोटी रुपयांवर होते. म्हणजेच आजच्या व्यापारात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 1.96 लाख कोटी रुपयांची वाढ दिसून आली आहे.

2165 कंपन्यांच्या शेअर दरात वाढ

मुंबई शेअर बाजारामध्ये (BSE) सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांपैकी बहुतांशी कंपन्यांच्या शेअर दरात आज वाढ नोंदवण्यात आली.  एक्सचेंजमध्ये आज एकूण 3,785 शेअर्सचे व्यवहार झाले. यातील 2165 शेअर्स वाढीसह बंद झाले. त्याच वेळी 1503 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली. तर 117 कंपन्यांच्या शेअर्स दरात कोणत्याही बदल झाला नाही. याशिवाय आजच्या व्यवहारादरम्यान 252 कंपन्यांच्या शेअर दराने त्यांचा 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला. तर 38 कंपन्यांच्या शेअर्सने 52 आठवड्यांच्या नीचांक गाठला. आज कोणत्याही कंपनीच्या शेअर दराने अप्पर सर्किट गाठले नाही. तर, दोन कंपन्यांच्या शेअर दराला लोअर सर्किट लागले. 

इतर महत्त्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
Nashik Election : प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
Shahu Maharaj : समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

1 Min 1 Constituency : 1 मिनिट 1 मतदारसंघ : 15 Nov 2024 : Vidhan Sabha : Maharashtra ElectionRaj Thackeray Bhiwandi : महिला कार्यकर्ता पाया पडली, राज ठाकरे म्हणले, हे नाही आवडत मलाNashik-BJP Sena Rada : भाजपच्या गणेश गीतेंच्या वाहनावर हल्ला,  नाशिकमध्ये भाजप-सेनेचा राडाShreya Yogesh Kadam Ratnagiri : 6 महिने मुलांपासून दूर; प्रचारादरम्यान योगेश कदमांच्या पत्नी भावूक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
Nashik Election : प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
Shahu Maharaj : समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
भरारी पथकाची कारवाई, 546 कोटींची मालमत्ता जप्त; रोकड, मौल्यवान वस्तूंसह सोने-चांदी ताब्यात
मोठी बातमी! भरारी पथकाची कारवाई, 546 कोटींची मालमत्ता जप्त; रोकड, मौल्यवान वस्तूंसह सोने-चांदी ताब्यात
Sharad Pawar : शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
Palus Kadegaon Sabha Constituency : विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
Embed widget