एक्स्प्लोर

Sensex closing bell : आरबीआयचा एक निर्णय अन् शेअर बाजारात तेजी; गुंतवणूकदारांना 1.82 लाख कोटींचा फायदा

Stock Market Closing Bell : शेअर बाजारात सलग सहाव्या दिवशी आणि आठवड्यातील पाचव्या दिवशी तेजी दिसून आली.

मुंबई : या आठवड्याच्या शेवटच्या दिवशीही भारतीय शेअर बाजारात तेजी दिसून आली. रेल्वे, पॉवर आणि बँकिंग स्टॉक्समध्ये खरेदीचा मोठा जोर दिसून आला. या खरेदीच्या जोराने दिवसअखेर बाजार वधारत बंद झाला. आरबीआयने घेतलेल्या एका निर्णयाने बँकिंग स्टॉक्समध्ये चांगलीच तेजी दिसून आली. आज दिवसभरातील व्यवहार थांबले तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 333 अंकांच्या तेजीसह 66,599 अंकांवर आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 93 अंकांच्या तेजीसह 19,819 अंकांवर स्थिरावला. 

भारतीय रिझर्व्ह बँकेने इंक्रीमेंटल सीआरआरचा निर्णय घेतल्याने शेअर बाजारात तेजी दिसून आली. इंक्रीमेंटल सीआरआरनुसार बँकांना त्यांच्याकडे असलेल्या रोख रक्कमेपैकी 10 टक्के  रक्कम आरबीआयकडे जमा करावी लागत असे. आता हा नियम मागे घेण्याचा निर्णय आरबीआयने घेतला आहे. 

कोणत्या सेक्टरमध्ये चढ-उतार?

आजच्या व्यवहारात बँकिंग, ऑटो, एनर्जी, इन्फ्रा, ग्राहकोपयोगी वस्तू, ऑईल अॅण्ड गॅस सेक्टरच्या शेअर दरात तेजी दिसून आली. तर, आयटी, फार्मा, एफएमसीजी, हेल्थकेअर, मीडिया, रिअल इस्टेट सेक्टरमध्ये विक्रीचा जोर दिसला. आज पुन्हा, मिड कॅप निर्देशांक 383 अंकांच्या तेजीसह 40,977  अंकांवर स्थिरावला. तर, स्मॉल कॅप इंडेक्स तेजीसह बंद झाला. 

सेन्सेक्स निर्देशांकातील 30 पैकी 21 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली. तर, निफ्टी 50 मधील 32 कंपन्यांचे शेअर दर तेजीसह बंद झाले. 

आजच्या व्यवहारात एनटीपीसीच्या शेअर दरात 2.65 टक्क्यांची तेजी दिसून आली. त्याशिवाय, टाटा मोटर्स 2.2 टक्के, लार्सनमध्ये 1.93 टक्के, बजाज फिनसर्व्ह 1.42 टक्के, भारती एअरटेल 1.02 टक्के, टायटनच्या शेअर दरात 0.85 टक्के, एचडीएफसी बँकेच्या शेअर दरात  0.82 टक्क्यांची वाढ दिसून आली. तर, आयटीसीच्या शेअर दरात 0.71 टक्क्यांची घसरण दिसून आली. विप्रोच्या शेअर दरात 0.58 टक्के, टेक महिंद्रामध्ये 0.54 टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली. 

गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 1.82 लाख कोटींची वाढ 

आज मुंबई शेअर बाजारावर (BSE) सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल 8 सप्टेंबर रोजी 320.92 लाख कोटी रुपयांवर पोहोचले. आधीच्या व्यवहाराच्या दिवशी म्हणजे 7 सप्टेंबर रोजी बाजार भांडवल 319.10 लाख कोटी होते. अशाप्रकारे, आज BSE मध्ये सूचीबद्ध कंपन्यांच्या बाजार भांडवलात सुमारे 1.82 लाख कोटी रुपयांनी वाढ झाली आहे. 

2043 कंपन्यांच्या शेअर दरात वाढ 

मुंबई शेअर बाजारात  (BSE) आज तेजीसह बंद होणाऱ्या शेअर्सची संख्या अधिक  होती. एक्सचेंजमध्ये आज एकूण 3,820 शेअर्सचे व्यवहार झाले. यापैकी 2043 कंपन्यांच्या शेअर्स वाढीसह बंद झाले. त्याच वेळी, 1,650 शेअर्समध्ये घसरण दिसून आली. तर 127 कंपन्यांच्या शेअर दरात कोणताही बदल झाला नाही.याशिवाय आजच्या व्यवहारादरम्यान 326 कंपन्यांच्या शेअर्सने त्यांचा 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला. त्याच वेळी, 15 कंपन्यांच्या शेअर्सने  त्यांचा 52 आठवड्यांचा नवीन नीचांका गाठला. 

इतर महत्त्वाच्या बातम्या: 

महत्त्वाच्या बातम्या

फक्त 5 लाख रुपये गुंतवा, सव्वा सात लाख रुपये मिळवा, 'ही' आहे पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना
फक्त 5 लाख रुपये गुंतवा, सव्वा सात लाख रुपये मिळवा, 'ही' आहे पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना
नोकरीच्या शोधात असणाऱ्या युवकांसाठी मोठी बातमी, रेल्वेमध्ये 1 हजार 421 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?
नोकरीच्या शोधात असणाऱ्या युवकांसाठी मोठी बातमी, रेल्वेमध्ये 1 हजार 421 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी सोन्याला किती होता दर? आजचे दर काय? 80 वर्षात नेमकी किती झाली वाढ?
देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी सोन्याला किती होता दर? आजचे दर काय? 80 वर्षात नेमकी किती झाली वाढ?

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार

Embed widget