30 वर्षानंतर 1 कोटी रुपयांची बचतही कमी पडणार, कारण 1 कोटीचं मूल्य होणार फक्त...
Saving Calculator : येत्या 30 वर्षांत आपण 1 कोटी रुपयांपर्यंत बचत करु आणि भविष्य सुरक्षित करु. पण पुढील 30 वर्षांत 1 कोटी रुपयांचे मूल्य किती राहणार? याची तुम्हाला कल्पना आहे का?
Saving Calculator : दिवसेंदिवस महागाई (Inflation) वाढत आहे. त्यामुळं पैशाचे मूल्य देखील कमी होत आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्ही असा विचार करत असाल की येत्या 30 वर्षांत आपण 1 कोटी रुपयांपर्यंत बचत करु आणि भविष्य सुरक्षित करु. पण पुढील 30 वर्षांत 1 कोटी रुपयांचे मूल्य किती राहणार? याची तुम्हाला कल्पना आहे का? तर पुढील 30 वर्षात 1 कोटी रुपयांचे मून्य हे केवळ 23 लाख रुपये इतके कमी होईल. अशा परिस्थितीत, सतत गगनाला भिडणारी महागाई पाहता, अधिक बचत करण्याचा आणि योग्य ठिकाणी गुंतवणूक करण्याचा आतापासूनच विचार करा.
तुमची गुंतवणूक इक्विटी, कर्ज, सोने आणि रिअल इस्टेटमध्ये विभागणे गरजेचे
जर तुम्ही दीर्घकाळात अधिक बचत करू इच्छित असाल, तर मालमत्ता वाटप समजून घेणे महत्त्वाचे आहे. गुंतवणुकीसाठी ही अत्यंत महत्त्वाची रणनीती आहे. याचा अर्थ तुमची गुंतवणूक इक्विटी, कर्ज, सोने आणि रिअल इस्टेटमध्ये विभागणे. म्हणजेच बाजार दरानुसार पैसे कधी, कुठे आणि किती गुंतवायचे.
तुम्ही नेहमी महागाई लक्षात घेऊन गुंतवणूक करावी. अशा परिस्थितीत, जेव्हा तुम्हाला असे वाटते की तुम्ही तुमचे ध्येय पूर्ण करण्यासाठी पुरेसे पैसे गोळा केले आहेत, तेव्हा कदाचित त्या वस्तूचे मूल्य देखील वाढेल.
हे सूत्र लक्षात घेऊन बचत करा
जर तुम्ही आता बचत करत असाल की 30 वर्षात तुम्ही 1 कोटी रुपये जमा करून श्रीमंत होऊ, तर तुमचा विचार चुकीचा आहे. कारण तोपर्यंत या 1 कोटी रुपयांची किंमत 23 लाख रुपये होईल. समजा तुम्हाला तुमचे आर्थिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी 25 लाख रुपये गुंतवावे लागतील आणि वार्षिक चलनवाढीचा दर 5 टक्के असेल, तर सूत्रानुसार तुम्हाला तुमचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी 25 लाख नाही तर 40 लाख रुपये गुंतवावे लागतील. तरच पुढील दहा वर्षांत तुम्ही तुमची आर्थिक उद्दिष्टे साध्य करू शकाल.