एक्स्प्लोर

RBI On Paytm Payments Bank : रिझर्व्ह बँकेने पेटीएम पेमेंट्स बँकेला पुरेसा वेळ दिला होता, पण...; आरबीआयचे सात मुद्दे, सर्व प्रश्नांची उत्तरं मिळणार

Paytm Payments Bank Crisis : पेटीएम पेमेंट्स बँकेच्या संबंधित ग्राहकांना आणि नागरिकांना पडलेल्या प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडून लवकरच प्रश्नोत्तरे म्हणजे FAQ  जारी केले जातील असं सांगण्यात आलं आहे. 

मुंबई: पेटीएम पेमेंट्स बँक पेमेंट्स बँकने केलेल्या नियमांच्या उल्लंघनानंतरही (Paytm Payments Bank) त्यांना पुरेसा वेळ दिला गेला आणि मगच त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याची माहिती आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास (Shaktikanta Das) यांनी दिली. आर्थिक क्षेत्रातील प्रत्येक कंपनीसाठी काही नियम आहेत, त्यांनी त्याचे पालन करणं अत्यावश्यक आहे, जर काही उल्लंघन झालं तरीही रिझर्व्ह बँक त्या संस्थेला पुरेसा वेळ देते असंही त्यांनी स्पष्ट केलं. पेटीएम पेमेंट्स बँकसंबंधी ग्राहकांना पडलेल्या प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडून प्रश्नोत्तरे म्हणजे FAQ  जारी केले जाणार आहेत. 

तीन दिवसीय पतधोरण समिती बैठकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी माध्यमांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी पेटीएम पेमेंट्स बँक विरुद्ध नुकत्याच झालेल्या कारवाईनंतर आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी गुरुवारी फिनटेक क्षेत्रातील चिंता दूर करण्याचा प्रयत्न केला. पेटीएम पेमेंट्स बँक विरोधात केलेल्या कारवाईमुळे फिनटेकला घाबरण्याची गरज नाही, कारण ही कारवाई एका घटकाशी संबंधित आहे. बँकिंग नियामकाकडून प्रत्येकाला पुरेसा वेळ दिला जातो असं शक्तीकांत दास यांनी स्पष्ट केलं.

पेटीएम पेमेंट्स बँक क्रायसिसवर FAQ येतील

पेटीएम पेमेंट्स बँक क्रायसिसबाबत विचारले जाणारे प्रश्न पाहता, गव्हर्नर दास म्हणाले की रिझर्व्ह बँक लवकरच या संदर्भात FAQ जारी करेल. ते म्हणाले की, सर्व नियमन केलेल्या संस्थांना रिझर्व्ह बँकेकडून कोणत्याही समस्येचे निराकरण करण्यासाठी किंवा त्याचे पालन करण्यासाठी पुरेसा वेळ दिला जातो. पेटीएम पेमेंट्स बँक देखील नियमन केलेल्या संस्थांमध्ये समाविष्ट आहे आणि या पेमेंट्स बँकेला देखील अनुपालनासाठी सेंट्रल बँकेने पुरेसा वेळ दिला होता.

रिझर्व्ह बँकेची भीती बाळगू नका

पुरेसा वेळ देऊनही नियमांची पूर्तता होत नाही, तेव्हा रिझर्व्ह बँकेकडून कारवाई केली जाते असं शक्तीकांत दास यांनी स्पष्ट केलं. जर एखाद्या संस्थेने नियमांचे पालन केले तर आम्हाला कारवाई करण्याची काय गरज आहे? आम्ही एक जबाबदार नियामक आहोत, त्यामुळे नियम पाळणाऱ्यांनी कोणतीही चिंता करण्याची गरज नाही असं शक्तीकांत दास म्हणाले. 

कोणत्याही विशिष्ट प्रकरणाबाबत किंवा घटकाबाबत फार काही सांगण्याची गरज नाही. त्याचा मुद्दा स्पष्ट करण्यासाठी त्यांनी सात मुद्द्यांमध्ये परिस्थिती स्पष्ट केली. 

RBI गव्हर्नरचे सात मुद्दे

1. रिझर्व्ह बँक आर्थिक क्षेत्रातील इनोव्हेशनला पाठिंबा देते आणि यापुढेही देत राहील.
2. फिनटेक, इनोव्हेशन आणि तंत्रज्ञानाला चालना देण्यासाठी रिझर्व्ह बँकेच्या वचनबद्धतेबद्दल शंका नसावी.
3. आम्ही काही काळ संबंधित संस्थेशी (पेटीएम पेमेंट बँक) संवाद साधत होतो.
4. पेटीएम समस्येवर नियामक तपशील शेअर करणे योग्य नाही.
5. दीर्घकालीन यशासाठी प्रत्येक घटकाने हे पैलू लक्षात ठेवले पाहिजेत.
6. RBI ने उचललेली सर्व पावले व्यवस्थेच्या स्थिरतेसाठी आणि ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आहेत.
7. पेटीएमच्या समस्येवर आम्ही लवकरच FAQ जारी करू.

ही बातमी वाचा: 

 

महत्त्वाच्या बातम्या

Gold-Silver Price Today: ग्राहकांना मोठा झटका! सोन्याच्या आयात शुल्कात वाढ; मुंबई-पुण्यासह तुमच्या शहरातील आजचे भाव पाहा
ग्राहकांना मोठा झटका! सोन्याच्या आयात शुल्कात वाढ; मुंबई-पुण्यासह तुमच्या शहरातील आजचे भाव पाहा
CNG PNG Price Hike Pune: पुणेकरांना पुन्हा महागाईचा फटका; सीएनजी अन् पीएनजीच्या दरात तिसऱ्यांदा वाढ, डिझेल आणि एटीएफ बाबतच्या निर्णयानंतर पेट्रोल-डिझेलही महागणार?
पुणेकरांना पुन्हा महागाईचा फटका; सीएनजी अन् पीएनजीच्या दरात तिसऱ्यांदा वाढ, डिझेल आणि एटीएफ बाबतच्या निर्णयानंतर पेट्रोल-डिझेलही महागणार?
Suzlon Energy : सुझलॉन एनर्जीचा दमदार परफॉर्मन्स; विक्रमी डिलिव्हरी आणि मजबूत ऑर्डर बुकमुळे शेअर्समध्ये तेजी!
सुझलॉन एनर्जीचा दमदार परफॉर्मन्स; विक्रमी डिलिव्हरी आणि मजबूत ऑर्डर बुकमुळे शेअर्समध्ये तेजी!
Business News : विजय केडियांचा हिस्सा असलेल्या 'या' शेअर्सला 5 टक्क्यांचे अप्पर सर्किट; गुंतवणूकदारांची खरेदीसाठी झुंबड, काय आहे कारण?
विजय केडियांचा हिस्सा असलेल्या 'या' शेअर्सला 5 टक्क्यांचे अप्पर सर्किट; गुंतवणूकदारांची खरेदीसाठी झुंबड, काय आहे कारण?

व्हिडीओ

TMC MP Merged With Small Party : आता छोटा पक्ष, नंतर मोठं लक्ष्य | ABP Majha Special Report
Eknath Shinde Vs Ganesh Naik : नाईक Vs शिंदे, पत्रिकेवरून नवा संघर्ष! | ABP Majha Special Report
Chhatrapati Sanbhajinagar RTO : एक ऑडिओ क्लिप... आणि RTO चा कारभार चव्हाट्यावर? | Special Report
Opration Tiger : ऑपरेशन फिक्स? वेटिंग फॉर 'सिक्स' | ABP Majha Special Report
UBT Meeting Special Report :मातोश्रीची वाढती धाकधूक की आमदारांनंतर आता खासदारांमध्येही फुटीची नांदी?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aanchal Mamidwar : मृतदेहासोबत लग्न, तिथंच राहण्याचं वचन; नंतर घर सोडलं, भावावर आरोप, आंचल मामीडवार प्रकरणात मोठा ट्विस्ट, सक्षमच्या कुटुंबीयांनी आंचलचे ते मेसेज दाखवले, बाळा....
मृतदेहासोबत लग्न, तिथंच राहण्याचं वचन; नंतर घर सोडलं, भावावर आरोप, आंचल मामीडवार प्रकरणात मोठा ट्विस्ट, सक्षमच्या कुटुंबीयांनी आंचलचे ते मेसेज दाखवले, बाळा....
Pawanraje Nimbalkar Case: पवनराजे निंबाळकर प्रकरणाची आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी; तब्बल 20 वर्षानंतर निकाल लागण्याची शक्यता; धाराशिवमध्ये पोलिसांचा चोख बंदोबस्त
पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणाची आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी; तब्बल 20 वर्षानंतर निकाल लागण्याची शक्यता; धाराशिवमध्ये पोलिसांचा चोख बंदोबस्त
'स्वतःच्या हिंमतीवर सगळं कमावलेलं, कामाचीही कमी नव्हती, तरीही...'; संचिता उगलेनं आयुष्य संपवलं, आजोबा म्हणाले...
'स्वतःच्या हिंमतीवर सगळं कमावलेलं, कामाचीही कमी नव्हती, तरीही...'; संचिता उगलेनं आयुष्य संपवलं, आजोबा म्हणाले...
Nashik Vidhan Parishad Election 2026: ठाकरे गटाच्या नेत्याच्या वक्तव्याने महायुतीची धाकधूक वाढली, नाशिक विधान परिषदेत मोठा गेम होणार?
ठाकरे गटाच्या नेत्याच्या वक्तव्याने महायुतीची धाकधूक वाढली, नाशिक विधान परिषदेत मोठा गेम होणार?
Buldhana News: मेहकरचा गड महाविकास आघाडीच्या ताब्यात! काँग्रेसच्या 9 नगरसेवकांचा ठाकरे गटाला खुला पाठिंबा; एकनाथ शिंदेंना मोठा धक्का
मेहकरचा गड महाविकास आघाडीच्या ताब्यात! काँग्रेसच्या 9 नगरसेवकांचा ठाकरे गटाला खुला पाठिंबा; एकनाथ शिंदेंना मोठा धक्का
Monsoon Rain Updates: मान्सून कोकणातच अडकला, मुंबईत कधी येणार? उशीर झाल्यास मुंबईकरांवर पाणी कपातीचं मोठं संकट
मान्सून कोकणातच अडकला, मुंबईत कधी येणार? उशीर झाल्यास मुंबईकरांवर पाणी कपातीचं मोठं संकट
Shivsena Crisis VIDEO : ठाकरेंचे 5 किंवा 6 खासदार फुटले तर ते अपात्र ठरतील का? कारवाई टाळण्यासाठी शिंदेंसमोर 'संवैधानिक' मार्ग काय?  
ठाकरेंचे 5 किंवा 6 खासदार फुटले तर ते अपात्र ठरतील का? कारवाई टाळण्यासाठी शिंदेंसमोर 'संवैधानिक' मार्ग काय?  
Sangli Crime: वेदांत बंडगर हत्याप्रकरणात खासदार विशाल पाटलांचा पोलिसांवर गंभीर आरोप, म्हणाले, 'पोलीस दलातील एक गँग अल्पवयीन मुलांना गुन्हे अंगावर घ्यायला सांगते'
वेदांत बंडगर हत्याप्रकरणात विशाल पाटलांचा पोलिसांवर गंभीर आरोप, म्हणाले, 'पोलीस दलातील एक गँग अल्पवयीन मुलांना गुन्हे अंगावर घ्यायला सांगते'
Embed widget