एक्स्प्लोर

UPI Payment for Feature Phone : स्मार्टफोन आणि इंटरनेटशिवाय करू शकता ऑनलाइन पेमेंट; RBIचं नवं फिचर लाँच

RBI नं लाँच केलेल्या नव्या फिचरमुळे आता स्मार्टफोनचा वापर न करणारे लोक देखील डिजीटल पेमेंट करू शकणार आहेत. 

UPI Payment for Feature Phone : सध्या अनेक लोक ऑनलाइन पद्धतीनं पेमेंट करतात. त्यासाठी गूगल पे, फोन पे या अॅपचा वापर लोक करतात. आता स्मार्टफोन आणि इंटरनेटचा वापर न करता तुम्ही डिजिटल पेमेंट करू शकता. नुकतच RBI एक नवं फिचर लाँच केलं आहे. 

ज्या लोकांना स्मार्टफोन वापरता येत नाही किंवा जे लोक महाग स्मार्टफोन खरेदी करू शकत नाहीत, असे लोक फिचर फोनचा वापर करतात. फिचर फोनमध्ये टच स्क्रिन,इंटरनेट,अॅप्स इत्यादी फिचर्स नसतात. अशा लोकांसाठी आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI)नवं फिचर लाँच केलं आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं मंगळवारी (8 मार्च) नवं यूपीआय आधारित पेमेंट्स प्रोडक्ट लाँच केलं आहे. या फिचरमुळे फिचर फोन असणारे लोक डिजीटल पेमेंट करू शकणार आहेत. 

आरबीआयनं मंगळवारी एक ट्वीट शेअर केले. या ट्वीटमध्ये त्यांनी लिहिले, 'आरबीआयचे गव्हर्नर हे 8 मार्च 2022 रोजी दुपारी 12 वाजता फिचर फोनसाठी यूपीआय सुविधा UPI123Pay आणि डिजीटल पेमेंट्साठी 24 तासांची हेल्पलाइन डिजीसाथी लाँच करत आहेत.' आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी डिसेंबर महिन्यामध्ये फिचर फोनसाठी डिजीट पेमेंटचे फिचर लाँच करण्याबाबतची घोषणा केली होती. 

आरबीआयचं नवं फिचर विविध भाषांमध्ये उपलब्ध आहे. नव्या फिचरमुळे स्मार्टफोन आणि फिचर फोन धारक आता सहजपणे डिजिटल व्यवहार करू शकतील. फिचर फोनमध्ये UPI, म्हणजेच UPI123Pay ही तीन- स्टेपची प्रक्रिया आहे - कॉल करा, निवडा आणि पैसे द्या. पेमेंट करण्यापूर्वी  फोन यूजरनं त्यांचे बँक खाते फिचर फोनसोबत लिंक करणे आवश्यक आहे. तसेच त्यांच्याकडे डेबिट कार्डचे यूपीआय पिन सेट केलेले असावे.  

यूपीआय पिन सेट केल्यानंतर तुम्ही तुमच्या फिचर फोनमधून डिजीटल पेमेंट करू शकता. ऑनलाइन पेमेंट करण्यासाठी ज्या व्यक्तीला ऑनलाइन पद्धतीनं पैसे पाठवायचे असतील त्या व्यक्तीचा फोन नंबर तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. व्यवसायिकांना ऑनलाइन पद्धतीनं पेमेंट करण्यासाठी तुम्ही मिस कॉल करणे ही पेमेंटची पद्धत तुम्ही वापरू शकता. 

महत्वाच्या बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sada Sarvankar : भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
Sunil Raut : ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
Latur : निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rashmi Shukla Special Report : विरोधकांचा आरोप, निवडणूक आयोगाची कारवाई; रश्मी शुक्ला यांची बदलीKolhapur Vidhan Sabha Madhurima Raje  : मधुरिमाराजेंची माघार, Satej Patil संतापले Special ReportZero hour Full : जरांगेंची माघार ते रश्मी शुक्ला पदमुक्त, सविस्तर विश्लेषण झीरो अवरमध्येMuddyache Bola : Sangli : पलूसचा बालेकिल्ला काँग्रेस राखणार ? : ABP Majha : Vidhan Sabha Election

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sada Sarvankar : भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
Sunil Raut : ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
Latur : निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह हे शरद पवारांचेच अपत्य, अजित पवारांचं नाही; पक्ष फोडाफोडीवरुन 'राज'गर्जना
राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह हे शरद पवारांचेच अपत्य, अजित पवारांचं नाही; पक्ष फोडाफोडीवरुन 'राज'गर्जना
Video: ''मला या बाप-बेट्याची दानत माहितीय, जे बाळासाहेबांचे झाले नाहीत ते राज ठाकरेंचे काय होणार''; राजू पाटील शिंदे पिता-पुत्रांवर भडकले
Video: ''मला या बाप-बेट्याची दानत माहितीय, जे बाळासाहेबांचे झाले नाहीत ते राज ठाकरेंचे काय होणार''; राजू पाटील शिंदे पिता-पुत्रांवर भडकले
पुण्यातील 21 जागांवर महायुतीच जिंकणार, पंकजा मुंडेंना विश्वास; 2019 चा आकडाही सांगितला
पुण्यातील 21 जागांवर महायुतीच जिंकणार, पंकजा मुंडेंना विश्वास; 2019 चा आकडाही सांगितला
Embed widget