RBI ने केले लोन ट्रांसफर करण्याच्या नियमात बदल, जाणून घ्या काय आहेत नवे नियम
RBI Loan Transfer New Policy : RBI ने लोन ट्रांसफर करण्याच्या पध्दतीत शुक्रवारी नवी नियमावली सादर केली आहे
RBI Loan Transfer New Policy: एका बॅंकेतून दुसऱ्या बॅंकेत लोन ट्रान्सफर करण्याच्या पध्दतीसाठी भारतीय रिजर्व बॅंकेने शुक्रवारी नवी नियमावली जाहीर केली आहे. नियमावलीनुसार आरबीआयने लोन ट्रान्सफर करण्यासाठी एका नवीन पॉलिसीचा
मास्टर प्लॅन जाहीर केला आहे. त्यामुळे आता बॅंका आणि कर्ज देणाऱ्या संस्थांना एक व्यापक आणि बोर्ड अॅप्रूव्ड पॉलिसी अमलात आणावी लागणार आहे.
RBI चे लोन ट्रान्सफर करण्याचे हे नवे नियम 24 सप्टेंबर 2021 पासून लागू होणार आहेत. हे नियम सर्व बॅंकांना तसेच गृहनिर्माण कर्ज देणाऱ्या आणि विमा उतरविणाऱ्या सर्व संस्थांना लागू होणार आहेत.
या संस्थांवर लागू होतील आरबीआयचे हे नवे नियम
भारतीय रिजर्व बॅंकेच्या नव्या नियमावलीनुसार, " प्रादेशिक व ग्रामीण भागातील बॅंका वगळून छोच्या फायनांस बॅंका, गृहनिर्माण संस्था, राष्ट्रीय गृहनिर्माण बॅंका आणि एसआयडीबीआय निगडीत असलेल्या सर्व म्युचअल फंडाच्या कंपन्यांना हे नियम लागू होणार आहेत"
का केली जाते लोन ट्रान्सफर प्रोसेस
लोन ट्रान्सफर करण्याची प्रोसेस दोन बॅंकांमध्ये किंवा इतर फायनान्स बॅंकांमध्ये होत असते. लोन ट्रान्सफर करण्याच्या मदतीने सर्व बॅंकाआणि फायनान्स संस्था त्यांची लिक्विडिटी मॅनेज करतात. तसेच लोन एक्सपोजर आणि स्ट्रॅटेजिक सेल्सचा समतोल ठेवण्यासाठी देखील याचा
वापर करतात.