यंदाच्या आर्थिक वर्षात विकासदर 7 टक्के राहणार, RBI ने वर्तवला अंदाज
यंदाच्या आर्थिक वर्षात विकासदर 7 टक्के राहण्याचा अंदाज रिझर्व्ह बँकेकडून वर्तवण्यात आला आहे. RBI ने यंदाच्या आर्थिक वर्षातलं पहिलं पतधोरण जाहीर केलं. यामध्ये ही माहिती दिली आहे.
RBI News : रिझर्व्ह बँकेकडून (RBI) यंदाच्या आर्थिक वर्षातलं पहिलं पतधोरण जाहीर झालं आहे. यामध्ये यंदा देखील रेपो रेटमध्ये कोणताही बदल झालेला नाही. आरबीआयकडून रेपो रेट 6.5 टक्क्यांवर कायम आहे. व्याजदरात कोणतेही बदल होणार नाहीत असं सांगण्यात आलं आहे. फेब्रुवारी 2023 मध्ये रेपो रेटमध्ये शेवटची वाढ झाली होती. 3 ते 5 एप्रिल दरम्यान पतधोरण समितीची बैठक पार पडली. यामध्ये हा निर्णय झाला आहे. तसेच यंदाच्या आर्थिक वर्षात विकासदर 7 टक्के राहण्याचा अंदाज आहे.
आर्थिक वर्षात विकासदर 7 टक्के राहण्याचा अंदाज
चालू आर्थिक वर्षातलं पहिलं पतधोरण RBI ने जाहीर केलं आहे. यामध्ये यंदा देखील रेपो रेटमध्ये कोणताही बदल झालेला नाही. रेपो रेट 6.5 टक्के कायम आहे. दरम्यान, यंदाच्या आर्थिक वर्षात विकासदर 7 टक्के राहण्याचा अंदाज आहे. पहिल्या तिमाहीत 7.1 टक्के, दुसऱ्या तिमाहीत 6.9 टक्के, तिसऱ्या आणि चौथ्या तिमाहीत 7 टक्के विकासदर राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या:
RBI MPC Meeting : तुमच्या कर्जाचा EMI वाढणार की कमी होणार? आज आरबीआय घेणार महत्त्वाचा निर्णय! वाचा सविस्तर...