एक्स्प्लोर

RBI MPC Meeting : तुमच्या कर्जाचा EMI वाढणार की कमी होणार? आज आरबीआय घेणार महत्त्वाचा निर्णय! वाचा सविस्तर...

चलनविषयक धोरण समिती रेपो रेटबाबत काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीचा (RBI MPC Meeting) आजचा तिसरा दिवस आहे. 3 एप्रिलपासून या बैठकीला सुरुवात झाली होती. आर्थिक वर्ष 2024-25 या वर्षाची ही पहिलीच बैठक असल्यामुळे या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. दरम्यान याच बैठकीत रेपो रेटवरही (Repo Rate) निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे या बैठकीनंतर कर्जदारांना (Home Loan) दिलासा मिळणार? की घेतलेल्या कर्जाचा हफ्ता वाढणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. 

शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरण समितीकडून आज रेपो रेटबाबत महत्त्वाची घोषणा केली जाणार आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होत आहे. पीएमसी रेपो रेटमध्ये कमी करण्याची आशा व्यक्त केली जात आहे. तसे झाल्यास कर्जदारांनाही दिलासा मिळेल.

 रिझर्व्ह बँकेने आपल्या रेपो रेटमध्ये एप्रिल 2023 पासून कोणताही बदल केलेला नाही.  एप्रिल 2023 पासून पीएमसीच्या सहा बैठका झाल्या. मात्र या सहाही बैठकांत रेपो रेट जेसे थेच ठेवण्यात आले. सध्या रेपो रेट 6.5 टक्के असून यावेळीही यात कोणताही बदल न होण्याची शक्यता आहे. आगामी तिसऱ्या तिमाहीत रेपो रेटमध्ये बदल होऊ शकतो.

रेपो रेट म्हणजे काय?

रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरण समितीकडून रेपो रेट ठरवला जातो. रेपो रेटमध्ये झालेला बदल हा थेट सामान्यांच्या कर्जावर परिणाम करतो. भारतीय रिझर्व्ह बँक ही इतर व्यापारी बँकांना पैशांच्या रुपात कर्ज देते. याच पैशांचा वापर करून व्यापारी बँका सामान्य लोकांना वेगवेगळी कर्जे देतात. रिझर्व्ह बँक व्यापारी बँकांना ज्या व्याजदराने पैसे देते, त्यालाच रेपो रेट म्हणतात. रेपो रेट वाढला की सामान्य कर्जदाराचे ईएमआय वाढतात.

रेपो रेट कमी असावा, अशी सामान्यांची इच्छा

म्हणजेच रेपो रेट वाढल्यावर सामान्यांच्या खिशाला झळ बसते. ही झळ बसू नये म्हणून एक तर रेपो रेट कमी असावा किंवा तो स्थिर तरी राहावा, अशी सामान्यांची अपेक्षा असते. मात्र देशाची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया रेपो रेट ठरवत असते. गेल्या वर्षभरापासून रेपो रेटमध्ये कोणताही बदल न केल्यामुळे सध्या कर्जदारांचे इएमआय वाढलेले नाहीत.    

हे ही वाचा :

 पारंपरिक आणि युनिफाईड केवायसीमध्ये नेमका फरक काय? जाणून घ्या...

कधीकाळी नवरा चालवायचा टॅक्सी, आज आहेत अब्जाधीश; फोर्ब्सच्या यादीत समावेश झालेल्या रेणुका जगतियानी कोण आहेत?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
मंत्रालयातील ती काळी लॅम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
मंत्रालयातील ती काळी लॅम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
Education : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay  Raut Meet Sharad Pawar | मिशन पालिका इलेक्शन! संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेटCity Sixty | सिटी 60 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP MajhaSantosh Deshmukh Case | धनंजय देशमुखांचं 'शोले' स्टाईल आंदोलन, सरकारला अल्टिमेटम Special ReportChay Wale Baba |  41 वर्षांपासून मौनव्रत, चायवाल्या बाबाची महाकुंभ मेळ्यात चर्चा Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
मंत्रालयातील ती काळी लॅम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
मंत्रालयातील ती काळी लॅम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
Education : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर तुमच्यावर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
Nashik Accident : पोलादी सळ्यांनी घेतला पाच तरुणांचा जीव, नाशिकमधील भीषण अपघातानंतर पोलिसांना खडबडून जाग; घेतला मोठा निर्णय
पोलादी सळ्यांनी घेतला पाच तरुणांचा जीव, नाशिकमधील भीषण अपघातानंतर पोलिसांना खडबडून जाग; घेतला मोठा निर्णय
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | सोमवार
Embed widget