एक्स्प्लोर

PM Mudra Loan: व्यवसाय सुरु करण्याचा विचार करताय, 'या' योजनेअंतर्गत मिळणार 10 लाखांचं कर्ज; जाणून घ्या प्रक्रिया 

देशात व्यवसायाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारन विविध योजनांद्वारे कर्जपुरवठा करते. एका अशाच योजनेद्वारे व्यवसायासाठी बँक 10 लाख रुपयांचे कर्ज देते.

Pradhan Mantri Mudra Yojana: केंद्र सरकार वेगवेगळ्या विभागांसाठी अनेक प्रकारच्या योजना आणत असते. त्यापैकीच एका योजनेची माहिती आज आपण पाहणार आहोत. अनेकांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असतो, मात्र पैशांची अडचण येते. अशा परिस्थितीत, लोक बँकांकडे वळतात, परंतु कधीकधी अधिक कागदपत्रांच्या पूर्तता न झाल्यामुळं कर्ज मिळणं कठीण होतं. अशा परिस्थितीत देशात व्यवसायाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारनं प्रधानमंत्री मुद्रा योजना (Pradhan Mantri Mudra Yojana) सुरु केली आहे. या योजनेद्वारे तुम्ही कोणत्याही हमीशिवाय 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळवू शकता. जर तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता. पाहुयात या योजनेबद्दल सविस्तर माहिती...

प्रधानमंत्री मुद्रा योजनेबद्दल सविस्तर माहिती

केंद्र सरकारने 2015 मध्ये ही योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत सरकारला 50,000 ते 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज कोणत्याही हमीशिवाय द्यावे लागते. या कर्जामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचे प्रोसेसिंग शुल्क भरावे लागणार नाही. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांव्यतिरिक्त, हे लोक सहकारी बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका (RRBs), लघु वित्त बँका आणि NBFC कडून देखील हे कर्ज मिळवू शकतात. या कर्जाचा व्याजदर वेगवेगळ्या बँकांकडून वेगवेगळा असतो. साधारणपणे बँका या कर्जावर 10 ते 12 टक्के व्याजदर आकारतात.

मुद्रा कर्जाचे तीन प्रकार आहेत

PM मुद्रा कर्जाचे एकूण तीन प्रकार आहेत. पहिली श्रेणी म्हणजे शिशु कर्ज. या अंतर्गत, जेव्हा तुम्ही पहिल्यांदा तुमचा व्यवसाय सुरू करता, तेव्हा सरकार तुम्हाला 5 वर्षांसाठी कोणत्याही हमीशिवाय 50,000 रुपयांपर्यंतचे कर्ज देते. आधीच व्यवसाय करत असलेल्या लोकांनाही त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठीही कर्ज दिले जाते. जर तुम्ही 50,000 ते 5 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घेतले तर ते किशोर कर्जाच्या श्रेणीत येते. तरुण कर्ज श्रेणी अंतर्गत, सरकार व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी 5 ते 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज देते.

प्रधानमंत्री मुद्रा योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया आणि कागदपत्रे

प्रधानमंत्री मुद्रा योजनेसाठी 24 ते 70 वर्षे वयाचा कोणताही भारतीय नागरिक अर्ज करू शकतो. कर्जाच्या अर्जाद्वारे, तुम्हाला आधार, पॅन कार्ड, पासपोर्ट, पत्ता पुरावा इत्यादींची आवश्यकता लागणार आहे. या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी mudra.org.in या अधिकृत वेबसाइटवर जा आणि फॉर्म डाउनलोड करा. त्यानंतर फॉर्ममध्ये सर्व माहिती टाका आणि ती तुमच्या जवळच्या सरकारी किंवा खासगी बँकेत जमा करा. सर्व कागदपत्रे पाहिल्यानंतर बँक तुमचे कर्ज मंजूर करेल.

महत्त्वाच्या बातम्या:

SBI Chocolate Scheme : एसबीआयची गांधीगिरी, ग्राहकांना चॉकलेट पाठवून ईएमआय भरण्याची आठवण करुन देणार, डिफॉल्टर्ससाठी नवी मोहीम

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Garbage Free Hour : बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
मोठी बातमी! धनंजय मुंडे देवगिरीवर, अजित पवारांशी 10 मिनिटं चर्चा अन् थेट परळीला रवाना
मोठी बातमी! धनंजय मुंडे देवगिरीवर, अजित पवारांशी 10 मिनिटं चर्चा अन् थेट परळीला रवाना
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manjili Karad Beed PC : SIT, धस, बजरंग सोनवणेंवर आरोप;कराडच्या पत्नीनं सगळच सांगितलंWalmik Karad Wife Reaction : दोषी असतील तर कारवाई होईल, वाल्मिक कराडची पत्नी म्हणाली...Zero Hour Full | वाल्मीक कराडवर मकोका अंतर्गत हत्येचा आरोप, इतक्यात तरी जामीन मिळणं अतिशय कठीणABP Majha Marathi News Headlines 08PM TOP Headlines 08PM 14 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Garbage Free Hour : बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
मोठी बातमी! धनंजय मुंडे देवगिरीवर, अजित पवारांशी 10 मिनिटं चर्चा अन् थेट परळीला रवाना
मोठी बातमी! धनंजय मुंडे देवगिरीवर, अजित पवारांशी 10 मिनिटं चर्चा अन् थेट परळीला रवाना
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! राज्यातील शाळांसाठी CBSE पॅटर्न; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय, शिक्षणमंत्र्यांची माहिती
मोठी बातमी! राज्यातील शाळांसाठी CBSE पॅटर्न; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय, शिक्षणमंत्र्यांची माहिती
Embed widget