एक्स्प्लोर

Petrol and Diesel Price: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींत मोठी घट; देशातही दर घटले?

Petrol and Diesel Price : भारतीय तेल कंपन्यांकडून देशात पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर करण्यात आले आहेत. आजही देशातील पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत.

Petrol and Diesel Price : गेल्या 24 तासांत जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या (Crude Oil Price) किमती सुमारे 3 डॉलरनं घसरल्या आहेत. दरम्यान, बुधवारी सकाळी सरकारी तेल कंपन्यांनी जारी केलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ दरांमध्ये बदल दिसून येत आहे. होळीच्या दिवशीही अनेक शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol and Diesel Price) वाढले आहेत. कच्च्या तेलाच्या किमतींबाबत बोलायचं झालं तर गेल्या 24 तासांत त्याच्या किमतींत मोठी घसरण झाली आहे. ब्रेंट क्रूड 3 डॉलरनं स्वस्त झालं आणि 83.31 डॉलर प्रति बॅरल विकलं गेलं आहे. WTI ची किंमत देखील 3 डॉलरने घसरून 77.50 डॉलर प्रति बॅरल झाली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतींच्या आधारे पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर केले जातात. भारतीय तेल कंपन्यांनी आज 8 मार्च रोजी देशातील पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर केले आहेत. आजही देशातील प्रमुख महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. आज देशातील किमती स्थिर आहेत. 

देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोलचा दर 96.72 रुपये आणि डिझेलचा दर 89.62 रुपये प्रति लिटर आहे. मुंबईत पेट्रोलचा दर प्रति लिटर 106.31 रुपये तर डिझेलचा दर 94.27 रुपये प्रति लिटर आहे. याशिवाय चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 102.63 रुपये आणि डिझेलचा दर 94.24 रुपये प्रति लिटर आहे. तसेच, कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर दरानं विकलं जात आहे.

iocl नं जारी केलेल्या दरांनुसार, देशातील सर्वात स्वस्त पेट्रोल पोर्ट ब्लेअरमध्ये आहे, जिथे किंमत 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 रुपये आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती राष्ट्रीय स्तरावर मे 2022 पासून आतापर्यंत जैसे थे आहेत. अशा स्थितीत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये चढ-उतार होऊनही दर वाढलेले नाहीत किंवा कमीही झालेले नाहीत. अशातच दर किती दिवस स्थिर राहणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कच्च्या तेलाच्या किमतीचा दिल्ली-मुंबईसह देशातील महानगरांतील तेलाच्या किमतींवर कोणताही परिणाम झालेला नाही.

Petrol Diesel Price Today : राज्यात कोणत्या शहरात किती दर? 

  • नागपूर : पेट्रोल 106.04 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर
  • पुणे : पेट्रोल105.84 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.36 रुपये प्रति लिटर 
  • कोल्हापूर : पेट्रोल 106.47 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.01 रुपये प्रति लिटर
  • औरंगाबाद : पेट्रोल 108 रुपये, डिझेल 95.96 रुपये प्रति लिटर 
  • परभणी : 109.45 रुपये प्रति लिटर, डिझेल 95.81 रुपये प्रति लिटर
  • नाशिक : पेट्रोल 106.77 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.27 रुपये प्रति लिटर

पेट्रोल आणि डिझेलचे दर कसे ठरवले जातात?

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ठरवण्यासाठी अनेक घटक जबाबदार असतात. यामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत आणि रुपया आणि डॉलरचा दर यांचाही मोठा वाटा आहे. ओपेक प्लस म्हणजे पेट्रोलियम उत्पादक देशांनी केलेल्या उत्पादनात कपात आणि रशिया-युक्रेन युद्धामुळे निर्माण झालेली परिस्थिती यामुळे सध्या पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. भारतातील तेल कंपन्यांनी गेल्या काही महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर कायम ठेवले आहेत.

Petrol Diesel Price Today : तुमच्या शहरांतील पेट्रोल-डिझेलच्या किमती जाणून घ्या

इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती (Petrol Diesel Price) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत). 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11PM 07 July 2024Navi Mumbai Rain Special Report : मुसळधार पावसानं नवी मुंबईला अक्षरश: धुतलंDada Bhuse On Ladki Bahin : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे महाराष्ट्राने स्वागत केले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
Embed widget