एक्स्प्लोर

Rs 2000 Note : 2000 रुपयांची नोट बदलण्यासाठी मुदतवाढ मिळणार? अर्थ मंत्रालयाने म्हटले....

Rs. 2000 Note : दोन हजार रुपयांची नोट चलनातून रद्द करण्यात आली असून 30 सप्टेंबर 2023 पर्यंत नोट बँकेत जमा करता येतील अथवा बदलून मिळणार आहे.

Rs. 2000 Note News:  रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दोन हजार रुपयांची नोट (Rs. 2000 Currency note) चलनातून मागे घेणार असल्याचे जाहीर केले. त्यानंतर बँकांमधून दोन हजार रुपयांची नोट बदलण्यास सुरुवात झाली आहे. नोट बदलून घेण्यासाठी 30 सप्टेंबर 2023 ही शेवटची मुदत आहे. ही मुदत वाढवून देण्याबाबत चर्चा सुरू असताना केंद्र सरकारने यावर भूमिका स्पष्ट केली आहे. दोन हजार रुपयांची बदली करून घेण्याच्या प्रक्रियेसाठी मुदतवाढ देण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे अर्थ मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. 

लोकसभेत लेखी उत्तर देताना, अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी बँकांमध्ये ₹2000 च्या एक्सचेंजची अंतिम मुदत 30 सप्टेंबरच्या पुढे वाढवण्याचा प्रस्ताव आहे का या प्रश्नाला नकारार्थी उत्तर दिले.काळा पैसा संपवण्यासाठी सरकार इतर उच्च मूल्याच्या नोटा चलनातून बाद करण्याचा विचार करत आहे का या प्रश्नाला चौधरी यांनी नकारार्थी उत्तर दिले.

रिझव्‍‌र्ह बँकेने 19 मे रोजी अचानकपणे 2000 रुपयांची नोट चलनातून मागे घेण्याची घोषणा केली. परंतु अशी नोटा खात्यात जमा करण्यासाठी किंवा बँकांमध्ये बदलून घेण्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंतची मुदत दिली. 

आरबीआयच्या माहितीनुसार, चलनात असलेल्या 2000 रुपयाच्या चलनी नोटांपैकी तब्बल 76 टक्के नोटा बँकांमध्ये जमा केल्या गेल्या आहेत किंवा बदलल्या गेल्या आहेत. मूल्याच्या दृष्टीने, चलनात असलेल्या 2000 रुपयांच्या नोटा 30 जून रोजी 84,000  हजार कोटींवर आल्या आहेत. 19 मे रोजी 3.56 लाख कोटी रुपये चलनात होत्या. रिझव्‍‌र्ह बँकेने सांगितले की, परत आलेल्या 87 टक्के नोटा लोकांच्या बँक खात्यात जमा केल्या गेल्या आहेत तर उर्वरित 13 टक्के नोटा इतर मूल्यांमध्ये बदलल्या गेल्या आहेत.

आरबीआयच्या म्हणण्यानुसार, दोन हजार रुपयांची नोट चलनातून मागे घेणे ही लोकांची गैरसोय टाळण्यासाठी किंवा अर्थव्यवस्थेत कोणताही व्यत्यय टाळण्यासाठी नियोजित चलन व्यवस्थापनाचा एक भाग होता. 

8 नोव्हेंबर 2016 रोजी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका घोषणेद्वारे चलनातून 500 रुपये आणि एक हजार रुपयांच्या नोटा रद्द केल्या होत्या. त्या वेळी चलनात असलेल्या सर्व 500 आणि 1000 रुपयांच्या  नोटाबंदीनंतर अर्थव्यवस्थेतील चलनाची गरज जलदगतीने पूर्ण करण्यासाठी 2000 रुपये मूल्याच्या नोटा 10 नोव्हेंबर 2016 रोजी चलनात आणल्या गेल्या. 

आरबीआयने निर्णय का घेतला? 

2000 रुपये मूल्याची नोट नोव्हेंबर 2016 मध्ये जारी करण्यात आली. त्या वेळी चलनात असलेल्या सर्व 500 रुपये आणि 1000 रुपयांच्या नोटा एका झटक्यात चलनातून रद्द करण्यात आल्या होत्या. त्यावेळी बाजारातील चलनाची मागणी पूर्ण करण्यासाठी 2000 रुपयांची नोट जारी करण्यात आली होती.  सामान्य व्यवहारांसाठी दोन हजार रुपयांची नोट वापरली जात नसल्याची बाब समोर आली होती. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या "क्लीन नोट पॉलिसी" च्या अनुषंगाने, 2000 रुपये मूल्याच्या बँक नोटा चलनातून काढून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 23 मे 2023 पासून बँकेतून 2000 रुपयांची नोट बदलण्याची प्रक्रिया सुरू झाली असून 30 सप्टेंबरपर्यंत नोटा बदलता येणार आहेत. 

इतर संबंधित बातमी: 

महत्त्वाच्या बातम्या

CBI Action On Kishore Biyani : 'बिग बाजार'चे संस्थापक किशोर बियाणी यांच्यावर CBI कडून गुन्हा दाखल! SBI ची 904 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप
'बिग बाजार'चे संस्थापक किशोर बियाणी यांच्यावर CBI कडून गुन्हा दाखल! SBI ची 904 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप
साखरेचा दर 31 वरुन 42 रुपये करा, ऑल इंडिया शुगर ट्रेडर्स असोसिएशनची सरकारकडे मोठी मागणी, साखर पुन्हा महागणार का?  
साखरेचा दर 31 वरुन 42 रुपये करा, ऑल इंडिया शुगर ट्रेडर्स असोसिएशनची सरकारकडे मोठी मागणी, साखर पुन्हा महागणार का?  
Share Market : अमेरिका, चीन ते जपानमध्ये मार्केट कोसळलं, भारतीय शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स 81 हजारांच्या पार पण गुंतवणूकदारांचं 1 लाख कोटींचं नुकसान
अमेरिका चीन ते जपानमध्ये मार्केट कोसळलं, भारतीय शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स 81 हजारांच्या पार पण गुंतवणूकदारांना फटका 
Gold News : सोन्यातील बचतीला इलेक्ट्रॉनिक पर्याय; भौतिक सोन्याची मालकीही कायम!
सोन्यातील बचतीला इलेक्ट्रॉनिक पर्याय; भौतिक सोन्याची मालकीही कायम!

व्हिडीओ

NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CBI Action On Kishore Biyani : 'बिग बाजार'चे संस्थापक किशोर बियाणी यांच्यावर CBI कडून गुन्हा दाखल! SBI ची 904 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप
'बिग बाजार'चे संस्थापक किशोर बियाणी यांच्यावर CBI कडून गुन्हा दाखल! SBI ची 904 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप
Virat Kohli: विराट कोहली सचिन तेंडुलकरचा 100 शतकांचा विक्रम मोडणार का? टीम इंडियाच्या माजी प्रशिक्षकाचं कोहलीच्या चाहत्यांचं टेन्शन वाढवणारं वक्तव्य...
विराट कोहली सचिन तेंडुलकरचा 100 शतकांचा विक्रम मोडणार का?टीम इंडियाचा माजी प्रशिक्षक म्हणाला...
Beed : खेळाडूंच्या बोगस प्रमाणपत्र घोटाळ्याचा पर्दाफाश करणाऱ्या वैभव चव्हाणचा संशयास्पद मृत्यू, घातपाताचा आरोप; बीडमध्ये खळबळ
खेळाडूंच्या बोगस प्रमाणपत्र घोटाळ्याचा पर्दाफाश करणाऱ्या वैभव चव्हाणचा संशयास्पद मृत्यू, घातपाताचा आरोप; बीडमध्ये खळबळ
चौफेर घेरलेल्या निवडणूक आयोगाचा रिव्हर्स गिअर सुरुच, तीन दिवसात दुसरा निर्णय! SIR मधून वगळलेल्या महाराष्ट्रासह 7 राज्यातील मतदारांना आणखी एक संधी मिळणार
चौफेर घेरलेल्या निवडणूक आयोगाचा रिव्हर्स गिअर सुरुच, तीन दिवसात दुसरा निर्णय! SIR मधून वगळलेल्या महाराष्ट्रासह 7 राज्यातील मतदारांना आणखी एक संधी मिळणार
चीन बांगलादेशला 22 हजार कोटींची लढाऊ विमाने देणार अन् पाकिस्तानी हवाई दल भारतीय सीमेपासून अवघ्या 40 किमी अंतरावर बांगलादेशी पायलट्सना ट्रेनिंग देणार
चीन बांगलादेशला 22 हजार कोटींची लढाऊ विमाने देणार अन् पाकिस्तानी हवाई दल भारतीय सीमेपासून अवघ्या 40 किमी अंतरावर बांगलादेशी पायलट्सना ट्रेनिंग देणार
Eknath Shinde : शरद पवारांवर ब्रीच कँडीत उपचार सुरू; एकनाथ शिंदेंसह 'हे' नेते ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल, मुख्यमंत्र्यांनी फोनवरून केली विचारपूस
शरद पवारांवर ब्रीच कँडीत उपचार सुरू; एकनाथ शिंदेंसह 'हे' नेते ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल, मुख्यमंत्र्यांनी फोनवरून केली विचारपूस
योजनांचा लाभ आधार कार्डवर नाही, तर मतदार ओळखपत्रावर ठरणार; राहुल गांधी मोदी सरकारमधील मंत्र्यांचा व्हिडिओ शेअर करत म्हणाले, 'हा कट खूप खोलवर रुजलाय, काळजीपूर्वक समजून घ्या..'
योजनांचा लाभ आधार कार्डवर नाही, तर मतदार ओळखपत्रावर ठरणार; राहुल गांधी मोदी सरकारमधील मंत्र्यांचा व्हिडिओ शेअर करत म्हणाले, 'हा कट खूप खोलवर रुजलाय, काळजीपूर्वक समजून घ्या..'
Vaishnavi Hagawane Case: वैष्णवी हगवणे प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, सासू लता, पाहुणा निलेश चव्हाणला जामीन मंजूर, जामीन म्हणजे निर्दोष मुक्तता नाही, उच्च न्यायालयानं ठणकावलं
वैष्णवी हगवणे प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, सासू लता, पाहुणा निलेश चव्हाणला जामीन मंजूर, जामीन म्हणजे निर्दोष मुक्तता नाही, उच्च न्यायालयानं ठणकावलं
Embed widget