बापरे बाप...मुंबईतल्या वरळीत एका घराची किंमत तब्बल 105 कोटी, सुविधा वाचून व्हाल थक्क!
मुंबई ही स्वप्नांची नगरी आहे. आपली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी या शहरात रोज हजारो तरूण-तरुणी येतात. मात्र या शहरातील घरांच्या किमती थक्क करणाऱ्या आहेत.
मुंबई : या शहराला स्वप्नांची नगरी म्हटलं जातं. भारतभरातून तरूण-तरूणी आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी या शहरात येतात. झोपडपट्टीत राहणाऱ्या सर्वसाधारण व्यक्तीपासून ते आशिया खंडातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती याच मुंबईत राहते. हे शहर अत्यंत महागडं आहे, असं नेहमीच म्हटलं जातं. येथे जागेची किंमत एवढी असते, की सर्वसाधारण माणसाला इथं घर घेणं अशक्य असतं असं म्हटलं जातं. याच मुंबईची श्रीमंती सांगणारा असाच एक व्यवहार समोर आला आहे. मुंबईच्या उच्चभ्रू भागात एका उद्योजकाने तब्बल 105 कोटी रुपये मोजून घर खरेदी केलंय.
मुंबईत घरासाठी मोजले 105 कोटी रुपये
मिळालेल्या माहितीनुसार या उद्योजकाने मुंबई शहराच्या वरळीच्या अत्यंत उच्चभ्रू परिसरात एक घर घेतलंय. एका टॉवरमध्ये या उद्योजकाने घर घेतलं असून त्यासाठी त्याने तब्बल 105 कोटी रुपये मोजले आहेत. सर्व सोईसुविधांनी युक्त असं हे घर आहे. एका घरासाठी या व्यक्तीने एका चौरस फुटासाठी तब्बल 1 लाख 48 हजार रुपये मोजले आहेत. वरळी परिसरात घर घेण्यासाठी आतापर्यंतचा हा सर्वांत विक्रमी व्यवहार असल्याचे म्हटले जात आहे.
फ्लॅटचा आकार 7139 चौरस फूट
वरळीतील टॉवरमध्ये 59 व्या मजल्यावर हा फ्लॅट असल्याचं सांगितलं जातंय. या फ्लॅटचा आकार 7139 चौरस फूट इतका आहे. 13 नोव्हेंबर रोजी या फ्लॅटच्या खरेदी-विक्री व्यवहाराची नोंद झाली आहे.
लोअर परळच्या 120 कोटींच्या फ्लॅटची चर्चा
दरम्यान, याच वर्षाच्या ऑगस्ट महिन्यात मुंबईतील अशाच एका घराची सगळीकडे चर्चा रंगली होती. हे घर मुंबईतील लोअर परळ या भागात होतं. या घराची किंमत तब्बल 120 कोटी रुपये होते. या घरात तुम्हाला भाड्याने राहायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला प्रत्येक महिन्याला तब्बल 40 लाख रुपये मोजावे लागणार होते. या घरातून अरबी समुद्र दिसत होता. या घरामध्ये स्पा, स्वीमिंग पूल, प्रायव्हेट जीम असं बरंच काही होतं. या घराचा एक व्हिडीओही समोर आला होता. या घरात अत्याधुनिक तंत्राच्या मदतीने यंत्रणा उभारण्यात आली होती. या घराची तेव्हा चांगलीच चर्चा झाली होती. अवघ्या 1600 स्क्वेअर फुटांच हे घर होतं.
हेही वाचा :
बाबा रामदेवांचा मोठी घोडदौड, फक्त 3 महिन्यातच कमावले 9335 कोटी रुपये, कंपनीच्या नफ्यात मोठी वाढ
पैसे ठेवा तयार! लवकरच 6 तगडे आयपीओ गुंतवणुकीसाठी खुले होणार, मिळणार मोठा परतावा?