CNG Price Hike : पुण्यापाठोपाठ मुंबईत सीएनजीच्या दरात वाढ, MGL चा निवडणुकीनंतर मोठा निर्णय, जाणून घ्या नवे दर
CNG Price Hike : पुण्यामध्ये 20 नोव्हेंबरला सीएनजीच्या दरात वाढ झाली होती. आता मुंबईत देखील सीएनजीच्या दरात वाढ करण्यात आली आहे.
CNG Price Hike मुंबई : महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु असताना पुण्यात सीएनजीच्या दरात वाढ करण्यात आली होती. आता मुंबईत दखील सीएनजीच्या दरात वाढ करण्यत आली आहे. महानगर गॅस लिमिटेड (MGL) ने सीएनजीच्या दराबाबत मोठी घोषणा केली आहे. एमएजीएल म्हणजेच महानगर गॅस लिमिटेडनं प्रतिकिलो 2 रुपयांची दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. सीएनजीच्या दरात वाढ करण्यात आली असली तरी पीएनजीच्या दरात वाढ करण्यात आलेली नाही.
महागनर गॅस लिमिटेडच्या निर्णयानंतर नव्या दरानं सीएनजीची विक्री केली जाईल. पहिल्यांदा एक किलोग्राम सीएनजी 75 रुपये किलो मिळत होता. आता 77 रुपये द्यावे लागणार आहेत. पाईपलाईन गॅसद्वारे दिल्या जाणाऱ्या गॅसचा दर 48 रुपये प्रति यूनिट असेल. याबाबतची माहिती एमजीएलकडून देण्यत आली आहे.
रिक्षा भाडं वाढणार?
एमएमआर रिजनमध्ये मोठ्या संख्येनं रिक्षा, टॅक्सी आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील वाहनं सीएनजीवर चालतात. त्यमुळं सीएनजीच्या दरात वाढ झाल्यानंतर रिक्षा भाडं देखील वाढवण्यात यावं अशी मागणी करण्यात आली आहे. रिक्षाचालक संघटनेनं रिक्षाभाडे 2 रुपयांनी वाढवावं अशी मागणी केली आहे.
मुंबई रिक्षा मेन्स यूनियनचे नेते थम्पी कुरीन यांनी यासंदर्भात भाष्य केलं आहे. सरकारकडे इंधन दर, देखभाल खर्च आणि इतर खर्चाच्या आधारित दर लागू करण्याबाबत मागणी केली आहे. सीएनजीच्या दरात वाढ झाल्यानं एमएमआर रिजनमध्ये रिक्षाच्या दरात कमीत कमी दोन रुपये वाढ करावी अशी मागणी करु शकतो, असं ते म्हणाले. सरकारनं दरवाढ फॉर्म्युल्यानुसार एका किलोमीटरला 2.50 रुपयांची वाढ करावी, असं थम्पी कुरीन म्हणाले.
महानगर गॅस लिमिटेडच्या अधिकाऱ्यांनी टॉइम्स ऑफ इंडियासोबत बोलताना म्हटलं की घरगुती वापराच्या गॅसच्या किमती कमी करण्यासाठी अतिरिक्त बाजार मूल्य देऊन नैसर्गिक गॅस खरेदी करत आहे. त्यामुळं गॅसच्या उत्पानदावरील खर्च वाढत आहे. सीएनजीच्या दरात वाढ करुन त्याची भरपाई करण्याचा प्रयत्न केला जाईल.
निवडणूक निकालानंतर सामान्यांना धक्का
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु असताना पुण्यामध्ये सीएनजीच्या दरात 2 रुपयांची वाढ करण्यात आली होती. त्यानंतर गोकुळनं दूध खरेदी दर 3 रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेतला. तर आता मुंबईत सीएनजीच्या दरात वाढ झाली आहे.
इतर बातम्या :