बाबा रामदेवांचा मोठी घोडदौड, फक्त 3 महिन्यातच कमावले 9335 कोटी रुपये, कंपनीच्या नफ्यात मोठी वाढ
Baba Ramdev Patanjali : बाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेदीक कंपनीला (Baba Ramdev Patanjali Ayurvedic company) मोठा नफा (profit) झाला आहे.
Baba Ramdev Patanjali : बाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेदीक कंपनीला (Baba Ramdev Patanjali Ayurvedic company) मोठा नफा (profit) झाला आहे. गेल्या 3 महिन्यांत कंपनीने सुमारे 9 हजार 335 कोटी रुपये कमावले आहेत. पतंजली आयुर्वेद अद्याप शेअर बाजारात लिस्ट झालेली कंपनी नाही. 2022-23 या आर्थिक वर्षात या कंपनीचे एकूण उत्पन्न 7 हजार 580.06 कोटी रुपये होते. आका यामध्ये मोठी वाढ झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
बाबा रामदेव यांच्या कंपनीने गेल्या 3 महिन्यांत सुमारे 9 हजार 335 कोटी रुपयांची कमाई केली आहे. ज्यात पतंजली फूड्सच्या OFS मधील कमाई तसेच इतर युनिट्सच्या उत्पन्नाचा समावेश आहे. बाबा रामदेव यांच्या नेतृत्वाखालील पतंजली आयुर्वेदचे एकूण उत्पन्न गेल्या आर्थिक वर्षात 23.15 टक्क्यांनी वाढून 9 हजार 335.32 कोटी रुपये झाले आहे. यामध्ये पतंजली फूड्स (पूर्वीची रुची सोया) आणि समूहाच्या इतर युनिट्सच्या ऑफर फॉर सेल (OFS) च्या उत्पन्नाचा समावेश आहे. टॉफलरच्या अहवालानुसार, 2023-24 या आर्थिक वर्षात पतंजली फूड्स व्यतिरिक्त पतंजली आयुर्वेदाच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ झाली आहे. जे मागील वर्षी 46.18 कोटी रुपये होते ते वाढून 2,875.29 कोटी रुपये झाले आहे.
मागील वर्षी झाला होता तोटा
बाबा रामदेव यांच्या कंपनीला गेल्या आर्थिक वर्षात मोठे नुकसान सहन करावे लागले होते. पतंजली आयुर्वेदने 1 जुलै 2022 रोजी आपला खाद्य व्यवसाय पतंजली फूड्सकडे हस्तांतरित केल्यामुळे, त्याचे उत्पन्न 14.25 टक्क्यांनी घसरून 6,460.03 कोटी रुपये झाले होते. पतंजलीच्या खाद्य व्यवसायात बिस्किटे, तूप, तृणधान्ये आणि न्यूट्रास्युटिकल्सचा समावेश आहे.
2023-24 मध्ये नफ्यात झाली मोठी वाढ
कंपनीच्या महसुलात घट झाल्यानंतर त्याच वर्षी पतंजली आयुर्वेदाचे उत्पन्न 2022-23 मध्ये 7 हजार 533.88 कोटी रुपये होते. तर एकूण नफा 578.44 कोटी रुपये होता. आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये तिचा एकूण नफा पाच पटीने वाढून 2,901.10 कोटी रुपये झाला. पतंजली आयुर्वेदचे एकूण उत्पन्न (इतर उत्पन्नासह) आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये 7,580.06 कोटी रुपये होते.
बाबा रामदेव यांनी केवळ भारतातच नव्हे तर जगभरात योगाचा प्रसार केला. हरियाणाचे मूळ असलेले बाबा रामदेव हे पतंजली आयुर्वेदीक व्यावसायाच्या माध्यमातून देखील लोकांपर्यंत पोहोचले आहेत. अनेकदा पतंजली आयुर्वेदचे नाव चर्चेत येते, कधी वादासाठी तर कधी त्याच्या झपाट्याने वाढणाऱ्या उलाढालीमुळे. दिवसेंदिवस कंपनीचं साम्राज्य वाढतच असल्याचे पाहायला मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या: