Mukesh Ambani : मुकेश अंबानी यांनी खरेदी केली 'ही' प्रसिद्ध एक कंपनी, ब्युटी इंडस्ट्रीमध्ये उतरण्यास सज्ज
Arvind Fashion Sells Sephora : अरविंद फॅशन कंपनीने रिलायन्स रिटेलची मालकीची कंपनी असलेल्या रिलायन्स ब्युटी अँड पर्सनल केअर लिमिटेडसोबत हा करार केला आहे.
Mukesh Ambani Investment in Beauty Brand : आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) रिटेल सेक्टरमध्ये आपला दबदबा वाढवत आहेत. रिलायन्स ग्रुप (Reliance Group) ची कंपनी रिलायन्स रिटेल (Reliance Retail) आपल्या पोर्टफोलिओमध्ये एकामागून एक कंपन्या जोडत आहे. अंबानींनी आणखी एक कंपनी आपल्या रिलायन्स रिटेल (Reliance Retail) च्या पोर्टफोलिओ (Portfolio) मध्ये जोडली आहे. एक ब्युटी, फॅशन कंपनी (Beauty Fashion Brand) अंबानींच्या किटमध्ये सामील होणार आहे. एका प्रसिद्ध ब्युटी ब्रांड डिव्हिजन खरेदीच्या करारावर शिक्कामोर्तब झाला आहे.
मुकेश अंबानी यांनी खरेदी केली 'ही' प्रसिद्ध एक कंपनी
अहमदाबाद येथील लालभाई कुटुंबाची प्रमोटेड कंपनी असलेल्या अरविंद फॅशननं (Arvind Fashion) शुक्रवारी आपल्या स्टॉक एक्सचेंज फायलिंगमध्ये या संदर्भात माहिती दिली आहे. अरविंद फॅशन कंपनीने शेअर बाजार लिस्टिंग वेळी स्टॉक एक्सचेंजला या संदर्भात माहिती दिली आहे. अरविंद फॅशन कंपनीने सौंदर्य उत्पादने विभागातील संपूर्ण हिस्सेदारी विक्री आणि हस्तांतरित करण्यासाठी रिलायन्सला विकली आहे. अरविंद फॅशन कंपनीने रिलायन्स रिटेलची मालकीची कंपनी असलेल्या रिलायन्स ब्युटी अँड पर्सनल केअर लिमिटेडसोबत हा करार केला आहे.
ब्युटी इंडस्ट्रीमध्ये उतरण्यास सज्ज
अरविंद फॅशनने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत म्हटल आहे की, सेफोरा ब्युटी ब्रांड कंपनी रिलायन्स ब्युटी अँड पर्सनल केअर लिमिटेडला विकली आहे. रिलायन्स ब्युटी अँड पर्सनल केअर लिमिटेड ची संपूर्ण मालकी रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडकडे आहे. अरविंद फॅशन कंपनीने कंपनीच्या सौंदर्य उत्पादने विभाग सेफोरा (Sephora) ची हिस्सेदारी रिलायन्सकडे हस्तांतरीत केली आहे. थोडक्यात सांगायचं झालं तरं, अरविंद फॅश कंपनीने आपल्या मालकीची स्वीस सेफोरो ब्रँड कंपनी रिलायन्सला विकली आहे.
सेफोरा कंपनीसाठी रिलायन्सचा करार
सेफोरा कंपनीसाठी रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेड अरविंद कंपनीसोबत करार केला आहे. या कराराअंतर्गत अरविंद फॅशन सेफोरा सौंदर्य उत्पादने डिव्हिजनमधील संपूर्ण हिस्सेदारी आणि विक्री रिलायन्सला हस्तांतरित करण्यात आलं आहे. या कराराची माहिती देताना अरविंद फॅशन कंपनीने म्हटले आहे की, या कराराची सर्व औपचारिकता पूर्ण केल्यानंतर अरविंद ब्युटी ब्रँड्स रिटेल ही यापुढे त्याची उपकंपनी राहणार नाही, तर रिलायन्सकडे याची मालकी असेल.
महत्त्वाच्या इतर बातम्या :