जग ठप्प करणारा मायक्रोसॉफ्टमधील तांत्रिक बिघाड नेमका कशामुळे? मोठं कारण आलं समोर!
मायक्रोसॉफ्टच्या विंडोज या ऑपरेटिंग प्रणालीवर सायबर हल्ला झाला होता. यामुळे मायक्रोसॉफ्टच कार्यप्रणाली ठप्प् पडली होती.
Microsoft Server Down : शुक्रवारी (19 जुलै) मायक्रोसॉफ्ट विंडोजची कार्यप्रणाली कोलमडून पडली. त्याचा परिणाम म्हणून देशभरातली वेगवेगळे उद्योग, व्यापार, हवाई वाहतूक, शेअर मार्केट, कॉर्पोरेट कंपन्या यांना फटका सहन करावा लागला. या तांत्रिक बिघाडामुळे अनेकांचे वेगवेगळ्या स्तरावर नुकसान झाले आहे. दरम्यान, मायक्रोसॉफ्ट विंडोजमध्ये असं नेमकं काय घडलं, ज्यामुळे ही सगळी व्यवस्था कोलमडून गेली होती? याबाबतची माहिती समोर आली आहे.
मायक्रोसॉफ्टमध्ये तांत्रिक बिघाड
शुक्रवारी अचानकपणे मायक्रोसॉफ्ट विंडोज ही ऑपरेटिंग सिस्टिम असणाऱ्या कॉम्प्यूटर्सवर थेट निळ्या रंगाची स्क्रीन आली होती. या निळ्या स्क्रीनमुळे कॉम्यूटरवर कोणतेही काम करता येत नव्हते. परिणामी वेगवेगळ्या क्षेत्रातील सर्व कामे ठप्प पडली होती. यामध्ये बँकिंग, हवाई वाहतूक, कॉर्पोरेट, शेअर मार्केट, उद्योग अशा वेगवेगळ्या क्षेत्रांचा समावेश आहे. मायक्रोसॉफ्टच्या विंडोज प्रणालीवर आलेली ही अडचण क्राउडस्ट्राइक (CrowdStrike) या कंपनीच्या सॉफ्टवेअरमुळे आली असा, दावा केला जातोय. या कंपनीकडून आलपे फालक्न नावाचे सॉफ्टवेअर अपडेट करण्यात येत होते. पण या अपडेटिंगदरम्यान मायक्रोसॉफ्टच्या विंडोज या ऑपरेटिंग प्रणालीमध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाला. या अडचणीनंतर क्राउडस्ट्राइकने आपले हे सॉफ्टवेअर अपडेट मागे घेतले आहे.
क्राउडस्ट्राइकने काय स्पष्टीकरण दिलं?
ही घटना घडल्यानंतर हळूहळू यंत्रणा सुरळीत होत आहे, असा दावा मायक्रोसॉफ्टने केला होता. दरम्यान, मायक्रोसॉफ्टमधील या तांत्रिक बिघाडाला क्राउडस्ट्राइकच जबाबदार आहे, असा थेट दावा केला जात नाहीये. मात्र या बिघाडानंतर आम्ही ही अडचण लवकरात लवकर दूर करण्यासाठी गांभीर्याने काम करत आहोत, असे क्राउडस्ट्राइकने सांगितले आहे. मायक्रोसॉफ्टमधील बिघाडामुळे अनेक एअरलाईन्स, ब्रॉडकास्टर्स, स्टॉक एक्स्चेंज, टेलीकॉम फर्म तसेच बँकिंग सेवा यावर परिणाम पडला होता.
हवाई वाहतूक सेवा ठप्प
जगभरातील बहुसंख्या एअर लाईन्सकडून कॉम्यूटरमध्ये मायक्रोसॉफ्टची विंडोज ही ऑपरेटिंग प्रणाली वापरली जाते. पण शुक्रवारी ही प्रणालीच काम करत नसल्यामुळे हवाई वाहतूक सेवा ठप्प झाली होती. परिणामी जगभरातील विमान उशिराने उड्डाण करत होते.
क्राउडस्ट्राइकला जबाबदार धरलं जातंय
मायक्रोसॉफ्टमधील तांत्रिक बिघाडाला क्राउडस्ट्राइक या कंपनीला जबाबदार धरलं जातंय. ही एक अमेरिकन सायबर सुरक्षा देणारी कंपनी आहे. या कंपनीची स्थापना 2011 साली करण्यात आली होती. जॉर्ज कुर्ट्ज, दिमित्री अल्पेरोव्हिच आणि ग्रॅग मर्स्टन यांनी केली होती. या कंपनीवर आतापर्यंत अनेक सायबर हल्ले झालेले आहेत. 2013 साली या कंपनीने आपले फालक्न हे सॉफ्टवेअर लॉन्च केले होते. या सॉफ्टवेअरमध्ये देण्यात आलेल्या अपडेटमुळेच मायक्रोसॉफ्ट या ऑपरेटिंग सिस्टिममध्ये अडचणी निर्माण झाल्याचे म्हटले जात आहे.
हेही वाचा :