(Source: Poll of Polls)
Maharashtra News Live Updates : मोठी बातमी! मनोरमा खेडकरांच्या पोलीस कोठडीत वाढ, पोलिसांकडून आणखी तपास होणार
Maharashtra Breaking 20th July LIVE Updates: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा...
LIVE
Background
मुंबई : राज्यात सध्या मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. राज्य सरकारने लागू केलेली लाडका बहीण योजना सध्या चांगलीच चर्चेत आहे. या योजनेच्या अंमलबजावणीच्या पद्धतीवरून विरोधक सत्ताधाऱ्यांवर टीका करत आहेत. तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांनी आम्ही तरुणांसाठीदेखील लाडका भाऊ योजना आणली आहे, असा दावा केला जातोय. दुसरीकडे राज्यातील कोकण, पश्चिम महाराष्ट्र या भागासाठी मुंबई, मुंबई उपनगर, पुणे यासारख्या भागात पावसाने जोर धरला आहे. या प्रमुख तसेच इतर महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
कलावती नगरमधील 15 नागरिकांना सुखरूप बाहेर काढले
नागपूरच्या पिपळा भागातील कलावती नगरमधील 15 नागरिकांना एसडीआरएफ च्या पथकाने सुखरूप पुराच्या पाण्यातून बाहेर काढले. पिपळा गावाशेजारी असलेल्या नाल्याला पूर आल्याने सकल भागाती काही घरांना पुराच्या पाण्याने वेढल्याने त्यात इंगळे व किंगरे कुटुंबियांसह एकूण 15 नागरिक पुराच्या पाण्यात अडकले होते, त्यानंतर एसडीआरएफ च्या पथकाला याची माहिती देण्यात आली होती. या सर्वांना सुरक्षित काढून माजी सरपंच नरेश भोयर यांच्या सह्यन्द्री कॉन्वेंमध्ये उभारण्यात आलेल्या मदत केंद्रावर ठेवण्यात आले
मनोरमा खेडकर यांच्या पोलिस कोठडीत दोन दिवसांची वाढ.
* मनोरमा खेडकर यांच्या पोलिस कोठडीत दोन दिवसांची वाढ.
* मनोरमा खेडकर यांच्या सोबत धमकी देताना उपस्थित असलेले इतर फरार असल्यानं मनोरमा खेडकर यांच्याकडून माहिती घेण्यासाठी पोलीसांनी पोलिस कोठडी वाढवून मागीतली.
* पोलिस कोठडीत जेवण वेळेवर मिळत नसल्याची मनोरमा खेडकर यांची तक्रार. त्यानंतर न्यायाधीशांनी मनोरमा खेडकर यांना कोणत्या वेळेला जेवण दिले हे तपासण्यासाठी सी सी टी व्ही कॅमेरातील व्हीडिओचा आधार घेतला जाईल असं म्हटलंय
कोल्हापूर-सांगली जिल्ह्यांना जोडणारा वारणा नदीवरील सावर्डे पूल पाण्याखाली, वाहतूक बंद
कोल्हापूर-सांगली जिल्ह्याला जोडणारा वारणा नदीवरील सावर्डे पूल पाण्याखाली
वारणा-चांदोली भागात चार दिवसांपासून मुसळधार पाऊस
वारणा नदीच्या पातळीत झपाट्याने वाढ
जिल्हा प्रशासनाकडून सावर्डे पुलावरील वाहतूक केली बंद
मोठी बातमी! नागपूरच्या पिपळा भागातील कलावती नगरमध्ये 15 नागरिक पुरात अडकले
नागपूरच्या पिपळा भागातील कलावती नगरमध्ये 15 नागरिक पुरात अडकले ...
त्यांना बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दल व आपत्ती व्यवस्थापनाच्या पथक घटनास्थळी दाखल
खडकवासला धरणाच्या कालव्यातून उद्यापासून पाणी सोडण्यात येणार
उद्या पासून खडकवासलाचा नवीन मुठा उजवा कालवा सुरू होत आहे. तरी नागरिकांनी खबरदारी घ्यावी कालवात कोणी उतरू नये. खरीप हंगाम सुरू करत आहे, असे आवाहन पुण्याच्या खडकवासला पाटबंधारे विभागाने केले आहे. उद्यापासून खडकवासला धरणाच्या कालव्यातून पाणी सोडण्यात येणार.