israel hamas war : कानपूरचे इस्रायल कनेक्शन, 150 कोटींचा फटका बसणार? नेमकं प्रकरण काय?
सध्या इस्रायल (Israel) आणि हमास (Hamas) यांच्यात युद्ध सुरु आहे. या युद्धाचा परिणाम इतर देशांवर देखील होत असल्याचं चित्र दिसत आहे.
Kanpur Israel Connection : सध्या इस्रायल (Israel) आणि हमास (Hamas) यांच्यात युद्ध सुरु आहे. या युद्धाचा परिणाम इतर देशांवर देखील होत असल्याचं चित्र दिसत आहे. इस्रायल-हमास युद्धाचा परिणाम कानपूरच्या चामड्याच्या व्यवसायावरही होण्याची शक्यता आहे. कानपूरचे इस्रायल कनेक्शन 150 कोटी रुपयांचे आहे. त्यामुळं मोठं नुकसान होऊ शकते.
इस्रायल-हमास युद्धामुळे कानपूरच्या चर्मोद्योगावरही परिणाम होत आहे. या युद्धामुळं कानपूरचे चामड्याच्या व्यवसायाचे दीडशे कोटींचे नुकसान होण्याची भीती आहे. सेफ्टी बूट्स आणि शूज, सॅडलरी, पिशव्या आणि इतर चामड्याच्या वस्तू कानपूरमधून इस्रायलला निर्यात केल्या जातात. परंतू सध्या सुरु असलेल्या युद्धामुळं अनेक मोठ्या ऑर्डर एकतर थांबल्या आहेत किंवा रद्द झाल्या आहेत.
इस्रायल-हमास युद्धामुळं कानपूरच्या चामड्याच्या व्यवसायाचे मोठे नुकसान?
इस्रायल-हमास युद्धामुळं कानपूरच्या चामड्याच्या व्यवसायाचे मोठे नुकसान होऊ शकते. परिस्थिती पाहून शहरातील सर्व चामडे निर्यातदारांनी मध्यममार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. जागतिक बाजारपेठेवर अचानक बदललेल्या जागतिक परिस्थितीचा परिणाम होईल, असे त्यांचे मत आहे. असे झाल्यास नुकसानीचा आकडा एक हजार कोटींच्या वर जाऊ शकतो, अशी भीती त्यांना वाटते. उत्तर प्रदेशमधील कानपूर हे चर्मोद्योगासाठी ओळखले जाते. येथून, सेफ्टी बूट आणि शूज, सॅडलरी, पिशव्या आणि इतर चामड्याच्या वस्तू मोठ्या प्रमाणावर तयार केल्या जातात. येथील वस्तूंची जगभरात निर्यात केली जाते. यामधल सहाशे ते आठशे कोटींचा माल एकट्या इस्रायलला पाठवला जातो. यंदाही आठशे कोटींहून अधिकची मागणी आहे.
जागतिक पातळीवर युद्धाचा परिणाम
सध्याच्या परिस्थितीत तेथील व्यावसायिक माल मागवण्यास टाळाटाळ करत आहेत. निर्यातदारांच्या मते, इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेले युद्ध यापुढेही असेच सुरू राहिले, तर शहराच्या व्यवसायासाठी ते चांगले नाही. निर्यातदारांच्या मते, जागतिक युगात कोणत्याही दोन देशांमधील युद्धाचा केवळ त्या देशांवरच परिणाम होत नाही, तर त्याचा परिणाम जागतिक पातळीवरही होतो. सध्या या युद्धाच्या जागतिक परिणामाचा फटका कानपूरच्या चर्मोद्योगालाही बसत आहे. कोरोनाच्या काळात जागतिक बाजारपेठ ठप्प झाली होती. आता हळूहळू सर्व काही सामान्य होऊ लागले आहे. आधी युक्रेन-रशिया युद्धामुळं आणि आता इस्रायल-हमास युद्धामुळं जागतिक बाजारपेठ कमकुवत झाली आहे. अशा परिस्थितीत अनेक मोठ्या वर्क ऑर्डर्स थांबवण्यात आल्या आहेत किंवा रद्द करण्यात आल्या आहेत.
इस्रायल आणि हमासमधील युद्धाचा आज आठवा दिवस... इस्रायलकडून गाझा (Gaza) पट्टीवर सतत बॉम्बहल्ले सुरू आहेत. हमासनं इस्रायलला आज मोठ्या हल्ल्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे आता हमासनं इस्रायलविरोधात कुठला मोठा प्लॅन आखलाय, याबाबत अवघ्या देशाची धडधड वाढली आहे. काल दिवसभरात झालेल्या बॉम्बहल्ल्यात गाझा पट्टीत 150 हून अधिक मृत्यू झाले आहेत, तर मृतांचा एकूण आकडा चौदाशेच्या पार गेला आहे. गाझा पट्टीतले अनेक भाग पूर्णपणे बेचिराख झाले आहेत. तिकडे इस्रायलमध्येही 1 हजार 300 जणांचा मृत्यू झाला आहे. इस्रायली सैन्यांनी गाझामध्ये ऑपरेशन सुरू केलं आहे. हमासच्या एकएका अतिरेक्यांला शोधून ठार केलं जात आहे. इस्रायलनं अन्न, वीज आणि पाण्याचा पुरवठा बंद केल्यानं गाझा पट्टीतले 20 लाख रहिवाशी जेरीस आले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या: