Gold And Silver Rate Today : बाप रे बाप! सोन्याचा भाव पोहोचला थेट 71 हजारांवर, चांदीही महागली!
गेल्या काही दिवसांपासून सोन्याचा भाव सातत्याने वाढत आहे. सोन्यासह चांदीचाही दर वाढलेलाच पाहायला मिळतोय. लग्नसराईत ही भाववाढ होत आहे.
जळगाव : सध्या लग्नसराई आहे. या काळात सोन्याची मोठ्या प्रमाणात खरेदी होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून सोन्याचा भाव (Today Gold Rate) सातत्याने वाढत आहे. सध्या हा भाव 70 हजारांच्या पुढे गेला असून आजदेखील हा दर थेट 71 हजारांपर्यंत पोहोचला आहे. सोन्याच्या या चढ्या दरामुळे (Gold Rate) सोने खरेदीदारांची चिंता वाढली आहे.
एक तोळे सोने तब्बल 71 हजारांवर
जळगावच्या सोने बाजारात आज (8 एप्रिल) पुन्हा एकदा सोन्याचा दर वधारला. आज दहा ग्रॅम शुद्ध सोन्यासाठी तब्बल 71 हजार रुपये मोजावे लागत आहेत. जीएसटीसह सोन्याचा हा दर थेट 73 हजार 200 वर पोहोचला आहे. सोन्याप्रमाणेच चांदीचा भावदेखील चांगलाच वाढला आहे.
चांदीचे दरही गगनाला भिडले
गुढी पाडव्याच्या पूर्वसंध्येलाच सोन्याच्या दरात ही वाढ झाली आहे. पाडव्याच्या मुहूर्तावर लोक सोने-चांदीची दागिने खरेदी करण्याला प्राधान्य देतात. मात्र सोन्याचा दर थेट 71 हजारांपर्यंत वाढला आहेस सोन्यासह चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. देशभरात प्रसिद्ध असलेल्या खामगाव येथील चांदीच्या बजारपेठेत चांदीचा भाव गगनाला भिडला आहे. आज चांदीचा भाव 85 हजार 200 रुपये प्रतिकिलो झाला आहे. गेल्या दहा दिवसांत चांदीच्या भावात प्रतिकीलो 6 हजार रुपयांची वाढ झाली आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर चांदीचे भाव वाढल्याने ग्राह चांदी खरेदीकडे पाठ फिरवत असल्याचं दिसतंय.
मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सोन्याचा दर 65 हजार
गेल्या आठवड्याभरापासून सोन्याचा दर हा सातत्याने वाढतोय. 1 एप्रिल रोजी हा दर 70 हजार 650 रुपयांपर्यंत गेला होता. भविष्यात सोन्याचा दर हा 75 हजार रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच सोन्याचा दर हा साधारण 2300 ते 2400 पर्यंत वाढला आहे. २६ मार्च रोजी सोन्याचा दर 65 हजार प्रति दहा ग्रॅम होता. जो आता जीएसटीसकट 73 हजारांपर्यंत वाढला आहे.
आंतरराष्ट्रीय पातळीवर घडणाऱ्या घडामोडी, देशांतर्गत परिस्थिती, महागाई, सोन्याचा साठा, सोन्याची मागणी या सर्व गोष्टींचा सोने आणि चांदीच्या दरावर परिणाम पडतो. लनंडमध्ये दररोज दोन वेळा सोन्याचा दर ठरवला जातो. त्यानंतर जगभरातील देशांत सोन्याचा भाव ठरतो. आगामी काळात सोनं आणखी महागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा :
EPFO ने केला महत्त्वाच्या नियमात बदल, कोट्यवधी कर्मचाऱ्यांची डोकेदुखीपासून सुटका; वाचा सविस्तर!
'पिंक टॅक्स' म्हणजे काय रे भाऊ? महिलांना कसं लुटलं जातं? वाचा...