ITR Filing: 2.5 लाखांपेक्षा कमी पगार असलेल्यांसाठी आयटी रिटर्न भरणे आवश्यक आहे का? जाणून घ्या संपूर्ण माहिती
ITR Filing Last Date : इन्कम टॅक्स रिटर्न (ITR Filing) भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2022 आहे. जी आता जवळ येत आहे.
ITR Filing Last Date : इन्कम टॅक्स रिटर्न (ITR Filing) भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2022 आहे. जी आता जवळ येत आहे. अनेक लोक संभ्रमात असतात की, त्यांना आयटीआर भरणे आवश्यक आहे की नाही. काही लोक म्हणतात की त्यांचा पगार 5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे. सरकारने सांगितले आहे की 5 लाखांपेक्षा कमी असलेल्यांवर शून्य कर आकारला जातो. मग आयटीआर दाखल करायचा की नाही. दुसरीकडे काही लोकांचा असा विश्वास आहे की, त्यांचा पगार 2.5 लाखांपेक्षा कमी आहे. त्यामुळे त्यांना ITR दाखल करण्याची गरज नाही. आपण जाणून घेणार आहोत की ITR कोणी भरावा आणि कोणी नाही. तसेच याचे फायदे काय आहेत.
आयटीआर भरणे आवश्यक आहे
जर तुमचे एकूण उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला ITR फाइल करणे आवश्यक आहे. ही मर्यादा ज्येष्ठ नागरिकांसाठी 3 लाख आणि 80 वर्षांवरील लोकांसाठी 5 लाख आहे. जर तुमचे एकूण उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असेल तर तुम्हाला ITR भरण्याची गरज नाही. तसेच जर तुम्ही कमी पगार असूनही आयटीआर फाइल करत असाल तर तुम्हाला अनेक फायदे मिळतात.
आयटीआर का भरणे आवश्यक आहे?
जर तुम्ही चालू खात्यात 1 कोटी रुपये किंवा त्याहून अधिक रक्कम जमा केली असेल किंवा परदेशी प्रवासावर 2 लाख रुपये किंवा त्याहून अधिक खर्च केले असतील. तुम्ही कोणत्याही वर्षात 1 लाख रुपये किंवा त्याहून अधिक वीज बिल भरले असेल, तर तुम्हाला ITR भरणे आवश्यक आहे.
करपात्र उत्पन्न 5 लाख रुपये असल्यास काय करावे
2.5 लाखांपर्यंतच्या कमाईवर तुम्हाला आयकरातून सूट मिळेल. जर तुमचे एकूण करपात्र उत्पन्न 5 लाख रुपयांपेक्षा कमी असेल, तर तुम्हाला उर्वरित 2.5 लाख रुपयांवर सूट मिळेल. या प्रकरणात तुमची कर दायित्व शून्य आहे. तुमचे एकूण उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असल्यास ITR भरणे आवश्यक आहे. जर तुम्ही ITR भरला नाही तर तुम्हाला सूट मिळणार नाही, उलट तुम्हाला दंडही भरावा लागेल.