search
×

देशातील सर्वात मोठ्या IPOची प्रतिक्षा संपली! LIC IPO आजपासून खुला, जाणून घ्या सर्व माहिती एका क्लिकवर

LIC IPO for Policyholders: देशातील सर्वात मोठा आयपीओ असलेला एलआयसीचा आयपीओ आजपासून खुला झाला आहे. गुंतवणूकदारांना 9 मेपर्यंत बोली लावता येणार आहे.

FOLLOW US: 
Share:

LIC IPO for Policyholders: बहुप्रतिक्षित आणि देशातील सर्वात मोठा आयपीओ असलेला एलआयसीचा आयपीओ आज खुला होणार आहे. देशातील सामान्य गुंतवणूकदारांसाठी उद्यापासून आयपीओसाठी बोली लावता येणार आहे. एलआयसीने आयपीओमधील काही भाग हा कर्मचारी, पॉलिसीधारक यांच्यासाठी राखीव ठेवला आहे. एलआयसी कर्मचारी, पॉलिसीधारकांना सवलतीच्या दरात आयपीओमध्ये बोली लावता येणार आहे.  
मागील आर्थिक वर्षात एलआयसीचा आयपीओ येणार होता. मात्र, रशिया-युक्रेन युद्धामुळे आणि बाजारातील अस्थिरतेमुळे आयपीओ उशिराने आला. एलआयसी शेअरमधील गुंतवणूक ही दीर्घकाळासाठी उत्तम असल्याचे एलआयसीचे अध्यक्ष एम. आर. कुमार यांनी म्हटले. सरकारकडून एलआयसीचा भागविक्री बाजारात आणण्यासाठी मोठे प्रयत्न करण्यात आले. एलआयसीचा हा शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठा आयपीओ आहे.  एलआयसीचा आयपीओ ही सुरुवात असून गुंतवणुकदारांसाठी ही मोठी संधी असल्याचे एलआयसीच्या अधिकाऱ्यांनी म्हटले.

केंद्र सरकार एलआयसीचा 3.5 टक्के हिस्सा बाजारात विक्री करणार असून त्या माध्यमातून 21 हजार कोटी रुपये उभा करणार आहे. एलआयसीच्या पॉलिसीधारकांना आयपीओ किंमतीवर प्रति समभाग 60 रुपये किंवा 6 टक्क्यांची सूट मिळणार आहे. तर, कर्मचारी, रिटेल गुंतवणूकदारांना प्रति समभाग जवळपास ५ टक्के किंवा ४५ रुपयांची सवलत मिळणार आहे.  

शेअर बाजारात कधी लिस्ट होणार?

एलआयसीचा आयपीओ आज खुला होणार आहे. गुंतवणूकदारांना 9 मे पर्यंत बोली लावता येणार आहे. त्यानंतर पुढील तीन दिवस कंपनी आयपीओसाठी आलेल्या बोलींची पडताळणी करतील. त्यानंतर शुक्रवारी 13 मे रोजी एलआयसी शेअर अलॉटमेंट करण्याची शक्यता आहे. शनिवारी आणि रविवारी शेअर अलॉटमेंट होणार नाही.

अँकर गुंतवणूकदारांकडून मोठा प्रतिसाद

अँकर गुंतवणूकदारांसाठी सोमवारी 2 मे रोजी आयपीओ खुला झाला होता. अँकर गुंतवणूकदारांना 5627 कोटींची गुंतवणूक केली आहे. एलआयसीने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार. अँकर गुंतवणूकदारांकडून 949 रुपये प्रति शेअर या दराने बोली लावण्यात आली. अँकर गुंतवणूकदारांसाठी 5,92,96,853 इक्विटी शेअर राखीव होते. 

>> एलआयसी IPO बाबत महत्त्वाचे मुद्दे:

- एलआयसी कंपनी ही व्यावसायिक कंपनीप्रमाणे संचालक मंडळाकडून चालवण्यात येणार आहे. या संचालक मंडळात 9 संचालकांचा समावेश असून त्यांची नियुक्ती झाली आहे. एलआयसीमध्ये सध्या अध्यक्ष आहेत. वर्ष 2024 पर्यंत अध्यक्षपद राहणार असून त्यानंतर व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे जबाबदारी असणार आहे. 

- एलआयसीकडे 40 लाख कोटींची मालमत्ता असून 30 लाख कोटींचा राखीव निधी आहे. एलआयसी ही देशातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे. 

- केंद्र सरकार याआधी एलआयसीमधील 5 टक्के हिस्सा विकणार होता. मात्र, बाजारातील अस्थिर परिस्थिती पाहता 3.5 टक्के हिस्सा विकणार आहे. 

- मागील आर्थिक वर्षात एलआयसीचा आयपीओ येणार होता. मात्र, रशिया-युक्रेन युद्धामुळे आणि बाजारातील अस्थिरतेमुळे आयपीओ उशिराने आला. 

- एलआयसी शेअरमधील गुंतवणूक ही दीर्घकाळासाठी उत्तम असल्याचे एलआयसीचे अध्यक्ष एम. आर. कुमार यांनी म्हटले.


(Disclaimer:  ही बातमी केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखीमपूर्ण आहे. शेअर बाजारात गुंतवणूक करताना आर्थिक सल्लागार, तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. गुंतवणुकीसाठी आम्ही सल्ला देत नसून तुमच्या आर्थिक नुकसानीसाठी ABPLive.Com जबाबदार राहणार नाही)

 

Published at : 04 May 2022 08:57 AM (IST) Tags: lic LIC IPO LIC IPO news LIC Updates LIC IPO details

आणखी महत्वाच्या बातम्या

पैसे घेऊन तयार राहा, आता आला 'हा' नवा आयपीओ, देणार तगडे रिटर्न्स!

पैसे घेऊन तयार राहा, आता आला 'हा' नवा आयपीओ, देणार तगडे रिटर्न्स!

Traditional And Unified KYC : पारंपरिक आणि युनिफाईड केवायसीमध्ये नेमका फरक काय? जाणून घ्या...

Traditional And Unified KYC : पारंपरिक आणि युनिफाईड केवायसीमध्ये नेमका फरक काय? जाणून घ्या...

Adani Group IPO : गुंतवणूकदारांना मोठी संधी! अदानी समूहातील आणखी एका कंपनीचा IPO येणार

Adani Group IPO : गुंतवणूकदारांना मोठी संधी! अदानी समूहातील आणखी एका कंपनीचा IPO येणार

Tata IPO : गुंतवणूकदारांनो पैसे तयार ठेवा! टाटा समूहातील आणखी एका कंपनीचा आयपीओ येणार

Tata IPO :  गुंतवणूकदारांनो पैसे तयार ठेवा! टाटा समूहातील आणखी एका कंपनीचा आयपीओ येणार

सचिन तेंडुलकरला 'या' आयपीओनं केलं मालामाल, तब्बल 360 टक्के रिटर्न, 5 कोटींचे झाले 23 कोटी

सचिन तेंडुलकरला 'या' आयपीओनं केलं मालामाल, तब्बल 360 टक्के रिटर्न, 5 कोटींचे झाले 23 कोटी

टॉप न्यूज़

IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?

IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?

जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो

जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो

Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?

Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?

उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल

उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल