search
×

LIC IPO: एलआयसी आयपीओसाठी आज शेवटचा दिवस; जाणून घ्या ग्रे मार्केटमध्ये काय आहे प्रीमियम दर

LIC IPO : एलआयसी आयपीओसाठी अर्ज करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. एलआयसी आयपीओसाठी किरकोळ गुंतवणूकदारांसह पॉलिसीधारक आणि कर्मचाऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.

FOLLOW US: 
Share:

LIC IPO : भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (LIC) आयपीओसाठी बोली लावण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. एलआयसी आयपीओला पॉलिसीधारक, किरकोळ गुंतवणुकदारांनी बोली लावली आहे. आयपीओसाठी रविवारपर्यंत 1.79 पटीहून अधिक  बोली लागली आहे. एलआयसीचा आयपीओ हा देशातील आतापर्यंतचा सर्वात मोठा आयपीओ आहे. त्यामुळे आयपीओच्या माध्यमातून शेअरमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आज शेवटची संधी आहे. 

पॉलिसीधारकांचा मोठा प्रतिसाद 

एलआयसी आयपीओसाठी पॉलिसीधारकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला आहे. पॉलिसीधारकांसाठी राखीव असलेल्या कोट्यात 5.4 पट अधिक सबस्क्रिप्शन झाले आहे. आज शेवटच्या दिवशी यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. एलआयसी कर्मचाऱ्यांसाठी राखीव असलेल्या कोट्यात 3.79 पटीने सबस्क्रिप्शन झाले आहे. तर, किरकोळ गुंतवणुकदारांनी 1.59 पटीने सबस्क्रिप्शन केले. आहे. 

ग्रे मार्केटमध्ये किती दर?

शेअर बाजारात येऊ घातलेल्या आयपीओला ग्रे मार्केट कसा प्रतिसाद देतो, याकडे अनेकांचे लक्ष असते. ग्रे मार्केटमध्ये एलआयसी शेअर प्रीमियम दर घसरला असल्याचे दिसून आले आहे. चार ते पाच दिवसांपूर्वी एलआयसीच्या प्रीमियम शेअर दर हा 85 रुपयांवर होता. आज हा प्रीमियम दर 36  रुपयांवर आला आहे. रविवारी हा दर 60 रुपयांवर होता. ग्रे मार्केटमध्ये एलआयसीसाठी 92 रुपयांपर्यंत प्रीमियम दर देण्यात आला होता. त्यात आता घसरण होऊन हा हा दर 36 रुपयांवर आला आहे. शेअर बाजारात सुरू असलेल्या पडझडीचा परिणाम एलआयसीच्या ग्रे मार्केट दरावर होत असल्याचे शेअर बाजार विश्लेषकांनी सांगितले. 

शेअर बाजारात कधी लिस्ट होणार?

गुंतवणूकदारांना आयीपीओसाठी आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत बोली लावता येणार आहे. त्यानंतर पुढील तीन दिवस कंपनी आयपीओसाठी आलेल्या बोलींची पडताळणी करतील. त्यानंतर शुक्रवारी 13 मे रोजी एलआयसी शेअर अलॉटमेंट करणार आहे. शनिवारी आणि रविवारी शेअर अलॉटमेंट होणार नाही. एलआयसी शेअर बाजारात 17 मे रोजी लिस्ट होणार आहे. 

Published at : 09 May 2022 10:55 AM (IST) Tags: lic LIC IPO LIC IPO news LIC News LIC IPO last date

आणखी महत्वाच्या बातम्या

Adani Group IPO : गुंतवणूकदारांना मोठी संधी! अदानी समूहातील आणखी एका कंपनीचा IPO येणार

Adani Group IPO : गुंतवणूकदारांना मोठी संधी! अदानी समूहातील आणखी एका कंपनीचा IPO येणार

Tata IPO : गुंतवणूकदारांनो पैसे तयार ठेवा! टाटा समूहातील आणखी एका कंपनीचा आयपीओ येणार

Tata IPO :  गुंतवणूकदारांनो पैसे तयार ठेवा! टाटा समूहातील आणखी एका कंपनीचा आयपीओ येणार

सचिन तेंडुलकरला 'या' आयपीओनं केलं मालामाल, तब्बल 360 टक्के रिटर्न, 5 कोटींचे झाले 23 कोटी

सचिन तेंडुलकरला 'या' आयपीओनं केलं मालामाल, तब्बल 360 टक्के रिटर्न, 5 कोटींचे झाले 23 कोटी

Sachin Tendulkar Investment : सचिन तेंडुलकरची 'या' कंपनीत आहे गुंतवणूक; आता लाँच होणार आयपीओ

Sachin Tendulkar Investment : सचिन तेंडुलकरची 'या' कंपनीत आहे गुंतवणूक; आता लाँच होणार आयपीओ

IPO News : एकाच आठवड्यात येणार 11 आयपीओ, 4000 कोटींचा खेळ; गुंतवणुकीसाठी तयार ठेवा पैसा

IPO News :  एकाच आठवड्यात येणार 11 आयपीओ, 4000 कोटींचा खेळ; गुंतवणुकीसाठी तयार ठेवा पैसा

टॉप न्यूज़

Lok Sabha Election : उमेदवार जाहीर करण्यात भाजप, ठाकरेंची आघाडी; तुमच्या मतदारसंघात कोण कुणाशी भिडणार? पाहा संपूर्ण यादी

Lok Sabha Election : उमेदवार जाहीर करण्यात भाजप, ठाकरेंची आघाडी; तुमच्या मतदारसंघात कोण कुणाशी भिडणार? पाहा संपूर्ण यादी

Rajasthan Royals Vs Delhi Capitals Score: 20 व्या षटकांत 4,4,6,4,6...; रियान परागने गोलंदाजांना धुतलं, दिल्लीला 186 धावांचं आव्हान दिलं

Rajasthan Royals Vs Delhi Capitals Score:  20 व्या षटकांत 4,4,6,4,6...; रियान परागने गोलंदाजांना धुतलं, दिल्लीला 186 धावांचं आव्हान दिलं

Hardik Pandya: आदर की भीती?, लसिथ मलिंगा-पोलार्ड खुर्ची सोडून उठले, हार्दिक पांड्याचा नवीन व्हिडिओ आला समोर

Hardik Pandya: आदर की भीती?, लसिथ मलिंगा-पोलार्ड खुर्ची सोडून उठले, हार्दिक पांड्याचा नवीन व्हिडिओ आला समोर

Praful Patel gets Clean Chit : 2017 च्या भ्रष्टाचार प्रकरणात CBI कडून प्रफुल्ल पटेल यांना क्लीन चीट

Praful Patel gets Clean Chit : 2017 च्या भ्रष्टाचार प्रकरणात CBI कडून प्रफुल्ल पटेल यांना क्लीन चीट