15 ऑक्टोबरपासून पैशांचा पडणार पाऊस? आतापर्यंतचा सर्वांत मोठा आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला होणार
ह्युंदाई मोटर्स इंडिया या कंपनीचा आयपीओ 15 ऑक्टोबर रोजी येणार आहे. या आयपीओतून चांगले रिटर्न्स मिळवण्याची नामी संधी आहे.
Hyundai Motor India IPO: देशातील सर्वांत मोठा आयपीओ (IPO) येत्या 15 ऑक्टोबर रोज गुंतणुकीसाठी खुला होणार आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून गुंतवणूकदारांचे या आयपीओकडे लक्ष आहे. येणारा हा आयपीओ ह्युंदाई मोटर इंडिया या कंपनीचा आहे. या आयपीओच्या माध्यमातून कंपनी कोट्यवधी रुपयांचे शेअर्स विकणार आहेत. या आयपीओतील सर्व शेअर्स हे ऑफर फॉर सेल (OFS) असणार आहेत. ह्युंदाई (Hyundai Motor India IPO) ही भारतातील सर्वांत मोठ्या वाहननिर्मिती कंपन्यांपैकी एक आहे. ही कंपनी आयपीओच्या माध्यमातून साधारण 27,870 कोटी रुपये जमा करणार आहे. हा देशातील आतापर्यंतचा सर्वांत मोठा आयपीओ आहे.
ग्रे मार्केटमध्ये प्रिमियम काय आहे?
ग्रे मार्केटमधील स्थितीवरून संबंधित आयपीओ गुंतवणूकदारांना किती परतावा देऊ शकतो, याचा अंदाज लावला जातो. ह्युंदाई मोटर इंडिया या आयपीओला ग्रे मार्केटमध्ये सुरुवातीला चांगला प्रतिसाद मिळाला होता. मात्र सध्या ग्रे मार्केटमध्ये या आयपीओचे मूल्य घसरले आहे. सध्या ग्रे मार्केटमध्ये या आयपीओचे जीपीएम हे 75 रुपये प्रति शेअर आहे. म्हणजेच या आयपीओची संभाव्य लिस्टिंग 2035 रुपयांवर होऊ शकते. म्हणजेच हा आयपीओ गुंतवणूकदारांना साधारण 3.83 टक्क्यांनी रिटर्न्स देऊ शकतो.
आयपीओचा किंमत पट्टा किती?
ह्युंदाई मोटर इंडिया या कंपनीच्या आयपीओत तुम्हाला 15 ते 17 ऑक्टोबर 2024 या काळात गुंतवणूक करता येईल. या आयपीओचा किंमत पट्ट 1865 ते 1960 रुपये प्रति शेअर्स असेल. या आयपीओच्या एका लॉटमध्ये साधारण 7 शेअर्स असतील. हे सर्व शेअर्स ऑफर फॉर सेल असतील. म्हणजेच आयपीओतून उभे राहिलेले सर्व पैसे हे गुंतवणूकदार किंवा कंपनीच्या संस्थापकडांकडे जाते कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी 77,84,00 शेअर्स राखीव ठेवले आहेत. कंपनीच्या कर्मचाऱ्यांना 186 रुपये प्रति शेअर सूट देण्यात आली आहे.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
हेही वाचा :
पुन्हा पडणार पैशांचा पाऊस, 16 ऑक्टोबर रोजी येणारा 'हा' आयपीओ देणार तब्बल 55 टक्क्यांनी रिटर्न्स?
IPO Updates : 38 कंपन्या अन् तब्बल 41 टक्के रिटर्न्स; आयपीओत पैसा टाकणारे 6 महिन्यांत मलामाल!