एक्स्प्लोर

IPO Updates : 38 कंपन्या अन् तब्बल 41 टक्के रिटर्न्स; आयपीओत पैसा टाकणारे 6 महिन्यांत मलामाल!

IPO Updates : शेअर बाजारात 2024-25 या आर्थिक वर्षातील पहिल्या सहा महिन्यात 38 आयपीओ लिस्ट झाले. यामधून गुंतवणूकदारांना चागंला परतावा मिळाला.

मुंबई : भारतीय शेअर बाजारात गेल्या काही दिवसांपासून आयपीओ मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना चांगला परतावा मिळत आहे. 2024-25 या आर्थिक वर्षातील पहिल्या सहा महिन्यांचा टप्पा 30 सप्टेंबरला पार पडला. या कालावधीत 38 आयपीओ लिस्ट झाले. या आयपीओच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना सरासरी 41.8 टक्के परतावा मिळाला आहे. एसएमई आयपीओमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना सहा महिन्यात 92 टक्के परतावा मिळाला आहे.

आयपीओमधून गुंतवणूकदारांना मिळालेल्या परताव्यात 1 एप्रिल 2023 ते 30 सप्टेंबर 2023 या कालावधीच्या तुलनेत 1 एप्रिल 2024 ते 30 सप्टेंबर 2024 या दरम्यान 34 टक्क्यांची वाढ झाली आहे. 38 आयपीओपैकी  30 आयपीओतून गुंतवणूकदारांना 10 टक्क्यांपेक्षा अधिक परतावा मिळाला आहे. 

गुंतवणूकदारांना दमदार परतावा

काही दिवसांपूर्वी बजाज हाऊसिंग फायनान्सचा आयपीओ लिस्ट झाला या आयपीओमध्ये एका शेअरची किंमत 70 रुपये निश्चित करण्यात आली होती. बजाजचा आयपीओ लिस्ट 150 रुपयांनी झाला. त्यामुळं गुंतवणूकदारांना 100 टक्क्यांपेक्षा अधिक परतावा मिळाला. बजाज हाऊसिंगच्या गुंतवणूकदारांना लिस्टिंगच्या दिवशी तब्बल 136 टक्क्यांपर्यंत परतावा मिळाला. 30 सप्टेंबरच्या आकडेवारी नुसार  यूनिकॉमर्स ई सोल्यूशन्स, प्रिमियम एनर्जीज च्या आयपीओमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना 87 टक्क्यांहून अधिक परतावा मिळाला आहे. प्राईम डाटाबेस ग्रुपच्या रिपोर्टनुसार 38 आयपीओमधून गुंतवणूकदारांना 48 टक्के परतावा मिळाला आहे.

38 आयपीओच्या आयपीओपैकी 35 आयपीओंना मोठा प्रतिसाद मिळाला आहे. 35 आयपीओ 10  पटींहून अधिक सबस्क्राईब झाले. त्यापैकी 17 आयपीओ  50 पटींहून अधिक सबस्क्राईब झाले.

ह्युंदाई, स्वीगीसह बड्या कंपन्यांचे आयपीओ येणार

भारताच्या शेअर बाजारात आयपीओत गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. नुकत्याच लिस्ट झालेल्या केआरएन हीट एक्सेंजर कंपनीच्या आयपीओला 212 पट सबस्क्राईब करण्यात आलं होतं. या आयपीओत गुंतवणूक करणाऱ्यांना देखील दमदार परतावा मिळावा.  सेबीनं गेल्या काही  दिवसांमध्ये विविध कंपन्यांना आयपीओ लिस्टींगसाठी मंजुरी दिली आहे.  ह्युंदाई या कार निर्मिती क्षेत्रातील दक्षिण कोरियातील कंपनीच्या भारतातील यूनिटचा आयपीओ लवकरच येणार आहे. ह्युंदाईचा आयपीओ तब्बल 25 हजार कोटी रुपयांचा असेल. भारताच्या शेअर बाजारातील सर्वात मोठा आयपीओ असणार आहे. यापूर्वी एलआयसीचा आयपीओ 21 हजार कोटींचा होता. 

ह्युंदाई कंपनीसह स्विगी, ओयो, एनटीपीसी ग्रीन या कंपन्यांचे आयपीओ येणार आहेत.  या कंपन्यांच्या लिस्टिंगच्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नाहीत. बजाज हायऊसिंग फायनान्स, पीएनजी ज्वेलर्स, प्रीमियम एनर्जीज,  यूनिकॉमर्स ई सोल्यूशन्स, केआरएन हीट एक्सेंजर्सच्या आयपीओला मिळालेला दमदार प्रतिसाद पाहता गुंतवणूकदार आगामी आयपीओमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करु शकतात.

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

इतर बातम्या : 

शेअर बाजार कोमात, 'ही' कंपनी जोमात, एका वर्षात 570 टक्क्यांनी रिटर्न्स; आता गुजरातमध्ये 200 कोटी गुंतवणार!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विमान उडालं अन् पुन्हा मुंबईत परत फिरलं; रामदास आठवलेंची उड्डाण मंत्रालयाकडे तक्रार
विमान उडालं अन् पुन्हा मुंबईत परत फिरलं; रामदास आठवलेंची उड्डाण मंत्रालयाकडे तक्रार
मुंबईत चॉकलेटचं रॅपर बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग; अग्निशमनच्या 6 गाड्या घटनास्थळी
मुंबईत चॉकलेटचं रॅपर बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग; अग्निशमनच्या 6 गाड्या घटनास्थळी
मोठी बातमी ! आचारसंहितेपूर्वी हालचाली; 15 जातींचा ओबीसीत समावेश करण्याची केंद्राकडे शिफारस
मोठी बातमी ! आचारसंहितेपूर्वी हालचाली; 15 जातींचा ओबीसीत समावेश करण्याची केंद्राकडे शिफारस
National Award : वादाची 'वाळवी'... चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार, पण स्वीकारायला कोणीच नाही; भर सभागृहात माय मराठीच्या बाजूने कोणीच नाही!
वादाची 'वाळवी'... चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार, पण स्वीकारायला कोणीच नाही; भर सभागृहात माय मराठीच्या बाजूने कोणीच नाही!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 8 PM 09 Oct हेडलाईन्स एबीपी माझा ABP MajhaABP Majha Headlines : दुपारी 07 च्या हेडलाईन्स एबीपी माझा ABP MajhaYek Number Movie Interview : राज ठाकरेंवरचा बायोपिक; येक नंबर सिनेमाच्या टीमशी गप्पाGhatkopar Fire : प्लॅस्टिकचे रॅपर बनवणाऱ्या कंपनीला आग, अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विमान उडालं अन् पुन्हा मुंबईत परत फिरलं; रामदास आठवलेंची उड्डाण मंत्रालयाकडे तक्रार
विमान उडालं अन् पुन्हा मुंबईत परत फिरलं; रामदास आठवलेंची उड्डाण मंत्रालयाकडे तक्रार
मुंबईत चॉकलेटचं रॅपर बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग; अग्निशमनच्या 6 गाड्या घटनास्थळी
मुंबईत चॉकलेटचं रॅपर बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग; अग्निशमनच्या 6 गाड्या घटनास्थळी
मोठी बातमी ! आचारसंहितेपूर्वी हालचाली; 15 जातींचा ओबीसीत समावेश करण्याची केंद्राकडे शिफारस
मोठी बातमी ! आचारसंहितेपूर्वी हालचाली; 15 जातींचा ओबीसीत समावेश करण्याची केंद्राकडे शिफारस
National Award : वादाची 'वाळवी'... चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार, पण स्वीकारायला कोणीच नाही; भर सभागृहात माय मराठीच्या बाजूने कोणीच नाही!
वादाची 'वाळवी'... चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार, पण स्वीकारायला कोणीच नाही; भर सभागृहात माय मराठीच्या बाजूने कोणीच नाही!
मर्दानी... कंडक्टरने कॉलेजच्या विद्यार्थीनीची छेड काढली; मैत्रिणींनी दुर्गा बनून चपलेनं धुतला
मर्दानी... कंडक्टरने कॉलेजच्या विद्यार्थीनीची छेड काढली; मैत्रिणींनी दुर्गा बनून चपलेनं धुतला
आचारसंहितेपूर्वीच टेंडर, सोशल मीडियावर जाहिरातीसाठी 90 कोटी खर्च; विरोधकांचा जोरदार हल्लाबोल
आचारसंहितेपूर्वीच टेंडर, सोशल मीडियावर जाहिरातीसाठी 90 कोटी खर्च; विरोधकांचा जोरदार हल्लाबोल
Supriya Sule: तुतारी चिन्हावर लढण्यासाठी आत्तापर्यंत 1680 अर्ज; बारामतीबाबत सुप्रिया सुळेंचं मोठं वक्तव्य, म्हणाल्या 'आमची खास रणनीती...'
तुतारी चिन्हावर लढण्यासाठी आत्तापर्यंत 1680 अर्ज; बारामतीबाबत सुप्रिया सुळेंचं मोठं वक्तव्य, म्हणाल्या 'आमची खास रणनीती...'
केवळ शहर नाही, अवघा जिल्हा अहिल्यानगर; महाराष्ट्र शासन राजपत्रात उल्लेख, अधिसूचना जारी
केवळ शहर नाही, अवघा जिल्हा अहिल्यानगर; महाराष्ट्र शासन राजपत्रात उल्लेख, अधिसूचना जारी
Embed widget