NSDL IPO : एनएसडीएलच्या आयपीओला सेबीकडून मंजुरी, तब्बल 3 हजार कोटी रुपये उभारणार, गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी
NSDL IPO: सेबीनं एनएसडीएलच्या आयपीओला मंजुरी दिली आहे. येत्या काळात नॅशनल स्टॉक एक्सेंजच्या आयपीओला देखील मंजुरी मिळू शकते, अशा चर्चा आहेत.
मुंबई : भारतीय शेअर बाजारात गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या संख्येनं आयपीओ लिस्ट झाले आहेत.नॅशनल सिक्युरिटीज डिपॉजिटरी लिमिटेडच्या (NSDL) आयपीओला सेबीनं मंजुरी दिली आहे. एनएसडीएलचा आयपीओ 3 हजार कोटी रुपयांचा आहे. सेबीचा आयपीओ हा पूर्णपणे ऑफर फॉर सेल असेल. या आयपीओद्वारे गुंतवणूकदारांना 5 कोटी 72 लाख शेअर्सची विक्री केली जाणार आहे.
सीडीएसल प्रमाणं आता एनएसडीएल देखील स्टॉक एक्सेंजवर लिस्ट होणार आहे. ऑफर फॉर सेल द्वारे एनएसडीएलच्या 57260001 शेअर्सची विक्री केली जाणार आहे. आयडीबीआय, एनएसई, यूनियन बँक ऑफ इंडिया, एसबीआय यांच्याकडून शेअर्सची विक्री केली जाणार आहे. आयडीबीआय बँकेकडून 2 कोटी 20 लाख शेअर्सची विक्री केली जाणार आहे. तर, नॅशनल स्टॉक एक्सेंज कडून 1 कोटी 80 लाख शेअर्सची विक्री केली जाणार आहे. यूनियन बँक ऑफ इंडियाकडून 50 लाख 62 हजार शेअर्सची विक्री केली जाईल. स्टेट बँक ऑफ इंडियाकडून 40 लाख शेअर्सची विक्री केली जाणार आहे. एसयूयूटीआयकडून 34 लाख शेअर्सची विक्री केली जाईल. एनएसडीएलमध्ये आयडीबीआय बँकेची भागिदारी 26 टक्के, नॅशनल स्टॉक एक्सेंजची भागिदारी 24 टक्के, एसबीआयकडे 5 टक्के, यूनियन बँक ऑफ इंडियाकडे 2.8 टक्के आणि कॅनरा बँकेकडे 2.3 टक्के भागिदारी आहे.
एनएलडीएलच्या आयपीओचं लिस्टिंग बीएसईवर
एनएसडीएलनं सेबीकडे आयपीओसाठी गेल्या वर्षी ड्राफ्ट पेपर दाखल केले होते. त्यावेळी एचडीएफसी बँकेनं एनएसडीएलमधील त्यांची 2 टक्के भागिदारी विकण्याची घोषणा केली होती. एचएडीएफसीची एनएसडीएलमध्ये 8.95 टक्के भागिदारी आहे. 1996 मध्ये डिपॉजिटरीज कायदा आणला गेल्यानंतर डीमॅट खात्यांची संख्या वाढवण्यामध्ये एनएसडीएलचं योगदान मोठं राहिलं आहे. या आयपीओमध्ये गुंतवणूक करण्यासाठी एनएसडीएलच्या कर्मचाऱ्यांना सूट मिळणार आहे. एनएसडीएलचं लिस्टींग बीएसईवर होणार आहे.
सीडीएसएल या या डिपॉजिटरीनं देखील त्यांचा आयपीओ यापूर्वीच आणलेला आहे सीडीएसएलनं गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिलेला आहे. सीएसडीएलच्या शेअरची किंमत सध्या 1358 रुपये आहे. गेल्या पाच वर्षात या शेअरनं 550 टक्के परतावा दिला आहे.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
इतर बातम्या :