पुन्हा पडणार पैशांचा पाऊस, 16 ऑक्टोबर रोजी येणारा 'हा' आयपीओ देणार तब्बल 55 टक्क्यांनी रिटर्न्स?
सध्या अनेक कंपन्या आपले आयपीओ घेऊन येत आहेत. येत्या 16 ऑक्टोबर रोजी अशाच एका दमदार कंपनीचा आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे.
मुंबई : सध्या अनेक कंपन्या शेअर बाजारात (Share Market) आपले आयपीओ घेऊन येत आहेत. आयपीओच्या माध्यमातून शेअर बाजारावर सूचिबद्ध होण्याचा अनेक कंपन्यांचा प्रयत्न चालू आहे. दरम्यान, आता अवघ्या काही दिवसांनंतर 50 कोटी रुपयांचा एक दमदार आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. विशेष म्हणजे हा आयपीओ आतापासूनच तुम्हाला प्रत्येक शेअरमध्ये साधारण 100 रुपयांचा परतावा देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हा आयपीओ नेमका कोणता आहे? हे जाणून घेऊ या..
येत्या 16 ऑक्टोबर रोजी गुंतवणुकीसाठी खुल्या होणाऱ्या या आयपीओचे नाव लक्ष्य पॉवरटेक असे आहे. या आयपीओत 16 ते 18 ऑक्टोबर या काळात गुंतवणूक करता येणार आहे. लक्ष्य पॉवरेटक हा आयपीओ (Lakshya Powertech IPO) 49.91 कोटी रुपयांचा असणार आहे. ही कंपनी 23 ऑक्टोबर 2024 रोजी राष्ट्रीय शेअर बाजाराच्या एसएमई प्लॅटफॉर्मवर सूचिबद्ध होणार आहे.
आतापासूनच एका शेअरमागे 100 रुपयांचा फायदा
लक्ष्य पॉवरटेक या आयपीओच्या प्रत्येक शेअरचे मूल्य (Lakshya Powertech IPO) हे 180 रुपये आहे. ग्रे मार्केटमध्ये हा शेअर आतापासूनच 100 रुपयांच्या प्रिमियमवर ट्रेड करतो आहे. लक्ष्य पॉवरच्या शेअरचे ग्रे मार्केटमधील मूल्य पाहून हा शेअर राष्ट्रीय शेअर बाजारावर 280 रुपयांवर सूचिबद्ध होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. म्हणजेच गुंतवणूकदारांना प्रत्येक शेअरमागे 100 रुपयांच नफा होऊ शकतो. म्हणजेच ज्या गुंतवणूकदारांना आयपीओ अलॉट होईल, त्यांना ही कंपनी शेअर बाजारावर जेव्हा सूचिबद्ध होईल, तेव्हा साधारण 55 टक्के रिटर्न्स मिळण्याची शक्यता आहे.
किरकोळ गुंतवणूकदारांना फक्त 1 लॉटसाठी पैसे गुंतवता येणार
या आयपीओत किरकोळ गुंतवणूकदार फक्त एका लॉटसाठी गुंतवणूक करू शकतात. या आयपीओच्या एका लॉटमध्ये साधारण 800 शेअर्स असतील. म्हणजेच किरकोळ गुंतवणूकदारांना लक्ष्य पॉवरेटक या आयपीओत गुंतवणूक करायची असेल तर त्यांच्याकडे साधारण 1 लाख 44 हजार रुपये असणे गरजेचे आहे. लक्ष्य पॉवरटेक या कंपनीची सुरुवात 2012 साली झाली होती.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
हेही वाचा :
गुंतवणूकदारांना श्रीमंत बनवणाऱ्या रतन टाटांच्या 26 कंपन्या कोणत्या? सविस्तर यादी एका क्लिकवर
मोठी बातमी! देशातील सर्वात मोठ्या IT कंपनीला 11909 कोटींचा नफा, गुंतवणूकदारांना लाभांश जाहीर