महागड्या गाड्या, आलिशान घर! कोलकाताला IPLची ट्रॉफी मिळवून देणारा, श्रेयस अय्यर किती कोटींचा मालक?
यंदाच्या आयपीएलवर कोलकाता नाईट रायडर्स या संघाने विजय मिळवला. या विजयात कर्णधार श्रेयस अय्यरने महत्त्वाची भूमिका बजावली.
मुंबई : यंदाच्या आयपीएल (IPL 2024) ट्रॉफीवर कोलकाता नाईट रायडर्स या संघाने आपलं नाव कोरलं आहे. या हंगामच्या सुरुवातीपासूनच केकेआरने चांगली कामगिरी केली. या संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरनेही आपल्या नेतृत्वाची चुणूक दाखवत संघाला विजयापर्यंत नेलं. गेल्या कित्येक वर्षांपासून श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) या संघाची धुरा सांभाळतोय. संघाचा कर्णधार असला तरी तो मैदानात कायम शालीनतेना वागताना दिसतो. त्यामुळे त्याचे आज लाखोंनी चाहते आहेत. याच पार्शवभूमीवर देशभरात असंख्या चाहते असणारा श्रेयस अय्यर किती कोटींचा मालक आहे, हे जाणून घेऊ.
आयपीएलच्या यंदाच्या हंगामात केकेआर संघाचा विजय झाल्यामुळे श्रेयस अय्यरची सगळीकडे वाहवा होत आहे. त्याचे सोशल मीडियावर तोंडभरून कौतूक केले जात आहे. एका संघाचा कर्णधार असला तरी तो फार साधेपणाने वागतो. श्रेयस अय्यर हा कौट्यवधींचा मालक आहे. क्रिकेटचे सामने, वेगेवगळ्या ब्रँड्सच्या जाहिराती यांच्या माध्यमातून श्रेयस चांगले पैसे कमवतो.
आयपीएलमधून श्रेयस अय्यर किती कमवतो
श्रेयस अय्यर आयपीएलमधूनही चांगले पैसे कमवतो. त्याला सर्वांत अगोदर 2015 साली दिल्ली कॅपिटल संघाने 2.6 कोटी रुपयांना खरेदी केले होते. 2018 सालापर्यंत त्याला आयपीएलमधून मिळणारा पगार 7 कोटी रुपयांपर्यंत वाढला. 2022 साली कोलकाता नाईट रायडर्स या संघाने त्याला तब्बल 12.25 कोटी रुपये देऊन खरेदी केले. आजघडीला श्रेयस अय्यर कोलकाता संघाचे नेतृत्त्व करतोय.
श्रेयस अय्यरची संपत्ती किती?
आजघडीला श्रेयस अय्यरची एकूण संपत्ती 58 कोटी रुपये असल्याचे म्हटले जाते. आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक क्रिकेट, आयपीएल, ब्रँड्सच्या जाहिराती या माध्यमातून तो हे पैसे कमवतो. फेब्रुवारी 2024 मध्ये त्याचा बीसीसीआयसोबतचा करार संपुष्टात आला. याआधी करारबद्ध असताना श्रेयसला 2022-23 साली बीसीसीआयकडून तीन कोटी रुपये मिळाले होते.
आलिशान घर, महागड्या गाड्या
श्रेयस अय्यर अनेक ब्रँड्सच्या जाहिराती करतो. यामध्ये बोट, मान्यवर, ड्रीम 11 या नामवंत कंपन्यांचा समावेश आहे.मुंबईतील लोढा टॉवरमध्ये श्रेयस अय्यरने एक आलिशान अपार्टमेंट खरेदी केलेले आहे. त्याची एकूण किंमत 11.85 कोटी रुपये असल्याचे म्हटले जाते. त्याच्याकडे अनेक आलिशान कार आेत. यामध्ये मर्जिडिझ बेन्झ जी-6, लॅम्बोर्गिनी Huracan, ऑडी एस-5 या कारचा समावेश आहे.
कोलकाता नाईट रायडर्सची हैदराबादवर मात
दरम्यान, 26 मे रोजी पार पडलेल्या आयपीएलच्या अंतिम सामन्यात सरनायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात अंतिम लढत झाली. या सामन्यात हैदराबाद संघाने सुमार कामगिरी केली. या संघाला फक्त 113 धावा करता आल्या. तर कोलकाता नाईट रायडर्सने अवघ्या 10.3 षटकांत ही धावसंख्या गाठली. हे लक्ष्य गाठताना व्यंकटेश अय्यरने अर्धशतक केले.
हेही वाचा :
कोलकाता जिंकली, पण IPL मधून शाहरुखला किती प्रॉफिट होतो? जाणून घ्या कमाईचं गणित
ऑटो क्षेत्रातील 'ही' कंपनी गुंतवणूकदारांसाठी लकी, वर्षभरात दिले 66 टक्क्यांनी रिटर्न्स!