ऑटो क्षेत्रातील 'ही' कंपनी गुंतवणूकदारांसाठी लकी, वर्षभरात दिले 66 टक्क्यांनी रिटर्न्स!
शेअर बाजारात अनेक कंपन्या अशा असतात ज्या गुंतवणूकादारांना चांगला परतावा देतात. प्रीतिका ऑटो ही कंपनीदेखील अशीच आहे. या कंपनीने गेल्या वर्षभरात गुंतवणूकदारांना 66 टक्क्यांनी परतावा दिला आहे.
मुंबई : Pritika Auto Industries Ltd : शेअर बाजारात (Share Market) अशा काही कंपन्या असतात ज्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळवून देतात. अशाच एका प्रीतिका ऑटो इन्डस्ट्रीज लिमिटेड नावाच्या कंपनीने एका वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 66 टक्क्यांनी रिटर्न्स दिले आहेत. त्यामुळे आगामी काळातही ही कंपनी गुंतवणूकदारांना चांगला परतावा देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सध्या कंपनीच्या शेअरचे मूल्य 27.50 रुपये
प्रीतिका ऑटो ही कंपनी ऑक्टो सेक्टरमध्ये काम करते. ही एक मायक्रो कॅप कंपनी आहे. गेल्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी या कंपनीच्या शेअरच्या मूल्यात काहीशी घसरण झाल्याचे पाहायला मिळाली. बाजार बंद झाला तेव्हा या कंपनीचा शेअर 27.50 रुपयांवर बंद झाला. प्रीतिका ऑटो इन्डस्ट्रीज या कंपनीच्या शेअरचे गेल्या 52 आठवड्यांतील सर्वोच्च मूल्य हे 53.50 रुपये तर 52 आठवड्यांतील सर्वांत कमी मूल्य 16.15 रुपये आहे. या कंपनीकडून ट्रॅक्टरसाठी लागणारे सुटे भाग तयार केले जातात.
प्रीतिका इन्डस्ट्रीज कंपनीचा फयादा?
कर देण्याआधी प्रीतिका ऑटो इन्डस्ट्रीज या कंपनीचा मार्चच्या तिमाहीत 3. 53 कोटी नफा राहिला. गेल्या वर्षाच्या चौथ्या तिमाहीत हाच नफा 3. 94 कोटी रुपये होता. या कंपनीत गेल्या वर्षी ज्यांनी गुंतवणूक केली, आज त्यांना चांगला परतावा मिळाला आहे. कारण हा शेअर गेल्या एका वर्षाच्या काळात 16.15 रुपयांपासून 27 रुपयांपर्यंत गेला आहे. त्यामुळे या कंपनीत गुंतवणूक करणाऱ्यांना वर्षभरात साधारण 66 टक्के रिटर्न्स मिळाले आहेत.
सध्या शेअर बाजाराची स्थिती काय?
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. लोकसभा निवडणुकीमुळे सध्या गुंतवणूकदारांच्या मनात अस्थिरता आहे. असे असले तरी गेल्या आठवड्यात शेवटच्या दोन दिवसांत शेअर बाजाराने ऐतिहासिक कामगिरी केली. शुक्रवारी तर निफ्टीने ऐतिहासिक उच्चांक गाठला. सध्या मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 75410.39 अंकावर आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 22957.10 वर आहे. त्यामुळे या आठवड्याच्या पहिल्या दिवशी निफ्टी 23 हजारांचा टप्पा पार करणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. आम्ही या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा या लेखामागचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
हेही वाचा :
व्यवहार करताना आयुष्यात करू नका 'या' पाच चुका, अन्यथा आयटी विभागाची नोटीस आलीच म्हणून समजा!
या आठवड्यात शेअर बाजारात पैसे कमवण्याची जबरदस्त संधी, अनेक कंपन्या देणार तगडा परतावा!