एक्स्प्लोर

ट्रॅफिक ते गॅस सिलिंडर, येत्या जून महिन्यापासून बदलणार 'हे' महत्त्वाचे नियम; जाणून घ्या अन्यथा खिशाला लागेल कात्री!

जून महिना चालू व्हायला अवघे काही दिवस शिल्लक आहे. पुढील महिन्यात अनेक नियमांत बदल होणार आहेत. ते जाणून न घेतल्यास तुमच्या खिशाला कात्री लागू शकते.

मुंबई : मे महिना संपायला अवघे काही दिवस शिल्लक आहे. मे महिन्यानंतर आता जून महिना लागणार आहे. नव्या महिन्याच्या पहिल्याच दिवसापासून अनेक नियम बदलणार आहेत. या बदलांकडे लक्ष न दिल्यास तुमच्या खिशाला कात्री लागू शकते. येत्या 1 जूनपासून घरगुती तसेच व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात बदल होणार आहे. यासह वाहतुकीच्या नियमातही अनेक बदल होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर बदललेले हे नियम काय आहेत? यासह अन्य कोणकोणत्या नियमांत बदल झाला आहे, हे जाणून घेऊ या... 

गॅस सिलिंडरच्या दरात होणार बदल 

प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवसापासून घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिडंरच्या दरात बदल होत असतो. या दिवशी देशातील ऑईल मार्केटिंग कंपन्या या गॅस सिलिंडरच्या किमती ठरवत असतात. बदललेला हा दर प्रत्येक महिन्याच्या एका तारखेपासून लागू होतो. त्यामुळे येत्या एक जूनपासून गॅस सिलिंडरच्या दरात बदल होणार आहे. याआधी 9 मार्च रोजी घरगुती गॅस सिलिंडरचे दर कमी झाले होते. व्यावसायिक गॅसदेखील एप्रिल महिन्यात स्वस्त झाला होता. त्यामुळे जून महिन्यात गॅस सिलिंडरची किंमत कमी होणार की वाढणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

आधारमध्ये बदल करण्यासाठीच्या मुदतीत वाढ  

यूआयडीएआयच्या एका निर्णयामुळे सामान्य लोकांना दिलासा मिळाला आहे. कारण यूआयडीएआयने आधारमध्ये मोफत बदल करण्याची मुदत 14  केली आहे. म्हणजेच आता 14 जूनपर्यंत सामान्य लोकांना कोणतेही अतिरिक्त शुल्क न देता आधार कार्डमध्ये बदल करता येईल. आधार सेंटरवर जाऊन आधार कार्डमध्ये बदल करायचा असल्यास प्रत्येक अपडेटसाठी 50 रुपये द्यावे लागतील.

...तर भरावा लागणार 25 हजारांचा दंड

येत्या जून महिन्यात वाहतुकीच्या अनेक नियमांत बदल करण्यात येणार आहे. कोणताही अल्पवयीन मुलगा गाडी चालवताना दिसल्यास त्याच्या पालकांकडून मोठा दंड आकारला जाणार आहे. हा दंड 25 हजार रुपयांपर्यंत असू शकतो. विशेष म्हणजे 25 वर्षांपर्यंत लायसन्स देण्यात येणार नाही. 

वाहतुकीच्या नियमात आणखी मोठे बदल

येत्या 1 जूनपासून वाहतुकीच्या नियमात मोठे बदल होणार आहेत. कोणत्याही व्यक्तीने या नियमांचे उल्लंघन केल्यास त्याच्याकडून मोठा दंड आकारला जाऊ शकतो. वेगाची मर्यादा ओलांडत एखाद्या व्यक्तीने गाडी चावल्यास 2000 रुपयांचा दंड भरावा लागू शकतो. हा दंड अगोदर एक हजार रुपये होता. लायसन्स नसताना गाडी चालवल्यास 500 रुपयांचा दंड भरावा लागू शकतो. हेल्मेट नसताना किंवा सिट बेल्ट नसताना गाडी चालवल्यास संबंधित व्यक्तीला 100 रुपयांचा दंड भरावा लागणार आहे.

हेही वाचा :

व्यवहार करताना आयुष्यात करू नका 'या' पाच चुका, अन्यथा आयटी विभागाची नोटीस आलीच म्हणून समजा!

या आठवड्यात शेअर बाजारात पैसे कमवण्याची जबरदस्त संधी, अनेक कंपन्या देणार तगडा परतावा!

ऑटो क्षेत्रातील 'ही' कंपनी गुंतवणूकदारांसाठी लकी, वर्षभरात दिले 66 टक्क्यांनी रिटर्न्स!

प्रज्वल ढगे हे 'एबीपी माझा ऑनलाईन'टीममध्ये 'कॉपी एडिटर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकारण, मनोरंजन, क्रीडाविषयक बातम्यांमध्ये विशेष रस आहे. त्यांनी याआधी 'लोकसत्ता', 'टीव्ही ९ मराठी' या माध्यमांत काम केलेले आहे.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार

व्हिडीओ

Pune Protest : अजित पवारांनी आम्हाला साथ द्यावी, लाडकी बहीण म्हणून चॉकलेट देतायत!
Eknath Shinde Speech Dadar :चक्रव्यूह भेदून शाहजीबापूने सगळ्यांना आडवं पाडलं, शिंदेंचं मुंबईत भाषण
Naresh Mhaske : ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होताच नरेश म्हस्केंनी दिल्या शुभेच्छा म्हणाले..
Mahapalikecha Mahasangram Dhule : धुळ्यातील नागरिकांच्या समस्या काय? स्थानिक पत्रकारांशी संवाद
Mahapalikecha Mahasangram Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये ६८ जागांसाठी होणार निवडणूक, कोण मारणार बाजी?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; नडला व्हिआयपी दर्शनासाठी अट्टाहास
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; नडला व्हिआयपी दर्शनासाठी अट्टाहास
पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र, पवार काका-पुतण्याची हातमिळवणी; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र, पवार काका-पुतण्याची हातमिळवणी; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
अजित पवार अन् एकनाथ शिंदेंसाठी 'हा' धोक्याचा इशारा; फडणवीसांवर टीका करत काँग्रेसचा वार
अजित पवार अन् एकनाथ शिंदेंसाठी 'हा' धोक्याचा इशारा; फडणवीसांवर टीका करत काँग्रेसचा वार
Embed widget