(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Stock Market Opening: अदानींनी एफपीओ मागे घेतल्यानंतर शेअर बाजारात पडझड; सेन्सेक्स 479, तर निफ्टी 146 अंकांनी खाली
Stock Market Opening: शेअर मार्केटमधील पडझडीत बँकिंग स्टॉकचा सर्वात मोठा वाटा आहे. बँक निफ्टी 1.70 टक्क्यांनी घसरला आहे.
Stock Market Opening: अदानी समुहानं एफपीओ (Adani Group FPO) मागे घेतल्यानंतर शेअर बाजारात (Share Market) पडझड सुरू झाली आहे. आज पुन्हा एकदा भारतीय शेअर बाजार सुरू होताच मोठी पडझड पाहायला मिळाली. बाजार सुरू होताच सेन्सेक्स (Sensex) साडेचारशेहून अधिक अंकांनी घसरला, तर निफ्टीमध्येही (Nifty) जवळपास दीडशे अंकांची घसरण पाहायला मिळाली.
भारतीय शेअर बाजारात (Indian Stock Market) पुन्हा एकदा घसरण होऊन व्यवहाराला सुरुवात झाली आहे. गुंतवणूकदारांची विक्री, अदानी ग्रुप (Adani Group) एंटरप्रायझेसच्या एफपीओची माघार घेतल्यानं बाजारात मोठी पडझड पाहायला मिळाली. त्यामुळे बीएसईचा सेन्सेक्स 479 अंकांनी घसरला, तर निफ्टी 146 अंकांनी खाली आला आहे.
काल केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर केला. 2023-24 चा अर्थसंकल्प आणि अदानी एन्टरप्रायझेसनं घेतलेला एफपीओ मागे घेण्याचा निर्णय यांमुळे भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. अदानी समुहातील सातही कंपन्यांचे शेअर्स पुन्हा गडगडले. अदानी एन्टरप्रायझेजच्या शेअर्समध्येही 7 टक्क्यांची घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. तर अदानी टोटल गॅसच्या शेअर्समध्ये मागील 5 दिवसांत 50 टक्क्यांहून अधिक घसरण झाली.
सेक्टरोल अपडेट्स (Sectoral Updates)
आजच्या ट्रेडिंग सत्रात आयटी, एफएमसीजी, मीडिया आणि कंझ्युमर ड्युरेबल्स क्षेत्रातील शेअर्समध्ये खरेदी होताना दिसत आहे. बँकिंग, ऑटो, इन्फ्रा, मेटल, एनर्जी आणि फार्मा क्षेत्रातील शेअर्समध्ये विक्री होताना दिसत आहे. मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक हिरव्या चिन्हात व्यवहार करत आहेत. सेन्सेक्समधील 30 शेअर्कपैकी 15 शेअर्स वाढीसह आणि 15 शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत. निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 19 शेअर्स वाढीसह तर 31 शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत.
कोणते शेअर्स तेजीत?
जर आपण आज तेजीत चालणाऱ्या शेअर्सवर नजर टाकली तर, Infosys 1.98 टक्क्यांनी, HCL Tech 1.79 टक्क्यांनी, Tech Mahindra 1.61 टक्क्यांनी, TCS 1.48 टक्क्यांनी, ITC 1.47 टक्क्यांनी, Titan Company 1.19 टक्क्यांनी, Wipro 1.14 टक्क्यांनी, Bajaj Finserv 1.01 टक्क्यांनी, Suzui 90 टक्क्यांनी, भारती एअरटेल 0.89 टक्क्यांनी, अल्ट्राटेक सिमेंट 0.61 टक्क्यांनी आणि इंडसइंड बँक 0.28 टक्क्यांनी वधारत आहे.
कोणते शेअर्स कोसळले?
घसरलेल्या शेअर्समध्ये SBI 2.11 टक्के, बजाज फायनान्स 1.73 टक्के, ICICI बँक 1.29 टक्के, HDFC 1.12 टक्के, NTPC 1.09 टक्के, सन फार्मा 1.05 टक्के, Asian Paints 1.04 टक्के, HDFCta Bank 0.9 टक्के, Steel6 टक्के. 0.61 टक्के, रिलायन्स 0.55 टक्क्यांची घसरण पाहायला मिळत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
आमची बॅलन्सशीट मजबूत, गुंतवणूकदारांना वाऱ्यावर सोडणार नाही; FPO मागे घेतल्यानंतर गौतम अदानींची हमी