रेल्वेतील बेडशीट चोरु नका, अन्यथा होऊ शकतो तुरुंगवास ; आतापर्यंत रेल्वेचे 14 कोटींचे बेडशीट चोरीला
प्रवासादरम्यान प्रवाशांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी रेल्वे विशेष काळजी घेत आहे. एसीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रेल्वेकडून टॉवेल आणि बेडशीट दिले जातात. मात्र, हे बेडशीट टोरल्यास तुमच्यावर कारवाई होऊ शकते.
Indian Railway : भारतीय रेल्वेने (Indian Railway) दररोज लाखो लोक प्रवास करतात. प्रवासादरम्यान प्रवाशांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी रेल्वे विशेष काळजी घेत आहे. एसीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रेल्वेकडून टॉवेल आणि बेडशीट दिले जातात. प्रवासी या वस्तू वापरु शकतात. मात्र, काही लोक प्रवास संपल्यानंतर ते घरी घेऊन जातात. ट्रेनमध्ये मिळणारे बेडशीट आणि टॉवेल तुम्ही घरी घेऊन जाणं योग्य नाही. कारण ते तुम्हाला महागात पडू शकते. आतापर्यंत रेल्वेचे 14 कोटी रुपयांचे टॉवेल आणि बेडशीट चोरीला गेले आहेत. तुम्ह जर रेल्वेतून बेडशीट आणि टॉवेल चौरला तर तुम्हाला दंड किंवा तुरुंगापर्यंतची शिक्षाही होऊ शकते.
दरम्यान, तुमचा प्रवास संपल्यानंतर ट्रेनमध्ये वापरलेले बेडशीट आणि टॉवेल तुम्ही सोबत नेणं अपेक्षीत नाही. तुमचा प्रवास संपल्यानंतर ते तिथेचं ठेवणं गरजेचं आहे. कारण जर तुमच्याजवळ ट्रेनच्या बाहेर पडल्यानंतर बेडरोलचे साहित्य आढळले तर तुमच्यावर कारवाई केली जाऊ शकते. चला तर मग जाणून घेऊया की जर कोणाला बेडरोलचे साहित्य आढळून आले किंवा कोणी चादर किंवा टॉवेल चोरला तर त्याच्यावर काय कारवाई केली जाते?
एक हजार रुपयांचा दंड आणि तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते
प्रवासासाच्या वेळी दिलेला टॉवेल आणि बेडशीट अनेकजण घरी घेऊन जातात. असे करताना कोणी पकडले तर त्या प्रवाशाविरुद्ध कारवाई होऊ शकते. वास्तविक, ही रेल्वेची मालमत्ता मानली जाते आणि रेल्वे मालमत्ता कायदा 1966 अंतर्गत ट्रेनमधून माल चोरीच्या विरोधात कारवाई करण्याची तरतूद आहे. अशा प्रकरणात या गुन्ह्यासाठी एक वर्षाची शिक्षा होऊ शकते आणि एक हजार रुपये दंडही होऊ शकतो. तुरुंगवासाची शिक्षा 5 वर्षांपर्यंत वाढू शकते.
14 कोटी रुपयांच्या वस्तू चोरीला
जेव्हा तुम्ही एसी कोचमधून प्रवास करत असता तेव्हा रेल्वेच्या बेडरोलमध्ये दोन चादरी, एक ब्लँकेट, एक उशी, एक उशाचे कव्हर आणि एक टॉवेल समाविष्ट असतो. मात्र, आता रेल्वेकडून टॉवेल क्वचितच पुरवले जातात. तर, एसी क्लासमध्ये प्रवास करणाऱ्यांनाच बेडरोल दिला जातो. मिळालेल्या आकडेवारीनुसार, 2017-18 मध्ये 1.95 लाख टॉवेल, 81,776 बेडशीट, 5,038 पिलो कव्हर आणि 7,043 ब्लँकेट चोरीला गेले. तसेच दरवर्षी मोठ्या प्रमाणात बेडरोलच्या वस्तूंची चोरी होते. या वस्तूची किंमत सुमारे 14 कोटी रुपये असल्याचे समजते. अशा परिस्थितीत, लोकांची चोरी होऊ नये म्हणून रेल्वेने प्रवास संपण्यापूर्वी अर्धा तास आधी बेडरोलच्या वस्तू जमा करण्याचा सल्ला दिला होता.
महत्त्वाच्या बातम्या: