Indian Railway : कायमची कटकट थांबणार! RAC प्रवाशांसाठी रेल्वेकडून मोठा निर्णय
भारतीय रेल्वेतून दररोज लाखो लोक प्रवास करतात. मात्र अनेकांना तिकीट मिळत नाही तर अनेकांना RAC तिकीट मिळतं. या सगळ्यात प्रवाशांना त्रास सहन करत प्रवास करावा लागतो. त्यामुळे रेल्वेकडून आता मोठा निर्णय घेण्यात आला.
Indian Railway : भारतीय रेल्वेतून (Indian Railway) दररोज लाखो लोक प्रवास करतात. मात्र अनेकांना तिकीट मिळत नाही तर अनेकांना RAC तिकीट मिळतं. या सगळ्यात प्रवाशांना त्रास सहन करत प्रवास करावा लागतो. त्यातच अनेकदा अनेक कारणावरुन रेल्वेत भांडणंदेखील होतात. अनेकदा ट्रेनमध्ये चादर आणि टॉवेलवरून भांडणं तुम्ही पाहिली किंवा ऐकली असतील. पण आता भारतीय रेल्वेच्या एका निर्णयामुळे हे भांडण होणार नाही. सहसा आरएसी प्रवाशांमध्ये ही भांडणं होते. ट्रेनमध्ये कन्फर्म बर्थ मिळत नसल्याने लोक वेटिंग लिस्टमध्येही तिकिटे घेतात. खात्री झाली नाही तर निदान आरएसी तरी होईल, असा विचार केला जातो आणि थेट ट्रेनचा प्रवास केला जातो. मात्र आता ही सगळी कटकट संपणार आहे. कारण रेल्वेने एक मोठा निर्णय घेतला आहे. कोणता आहे हा निर्णय पाहूयात...
रेल्वेने घेतला 'हा' निर्णय
नुकतेच रेल्वे बोर्डाकडून सर्व विभागीय रेल्वे आणि आयआरसीटीसीच्या सीएमडीला पत्र पाठवण्यात आले आहे. आता आरएसी प्रवाशांनाही वेगवेगळे बेडरोल देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. सगळ्या बाबींचा विचार लक्षात घेता असा निर्णय घेण्यात आला आहे की एसी क्लासमध्ये प्रवास करणाऱ्या आरएसी प्रवाशांना (एसी चेअर कार वगळता) आता ब्लँकेट, बेडशीट आणि टॉवेल, उशीसह संपूर्ण बेड रोल किट देण्यात येईल.
सर्वांना समान सुविधा...
एसी क्लासच्या प्रवासासाठी आरएसी प्रवाशांकडून वसूल करण्यात येणाऱ्या भाड्यात बेडरोल चार्जेसचा समावेश असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे रेल्वे बोर्डाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळे आता आरएसी प्रवाशांसाठी लिनन आणि संपूर्ण बेडरोल किटची व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आरएसी प्रवाशांना इतर प्रवाशांसारख्या सोयीसुविधा देणे आणि त्याच्याही प्रवास आनंददायी करणे हा या मागचा महत्वाचा हेतू असल्याचं सांगितलं आहे.
आरएसी सीट कुठे असते?
बाजूच्या खालच्या बर्थवर आरएसी बर्थची व्यवस्था करण्यात आली असते. यामध्ये एकाच बर्थवर दोन प्रवाशांचे बुकिंग केले जाते. ट्रेनमध्ये कोणतीही सीट रिकामी राहिल्यास त्यांची बर्थ कन्फर्म होण्याची शक्यता असतेय. हे शक्य नसेल तर दोन्ही प्रवाशांच्या प्रवास निदान चांगला व्हावा, याचीदेखील काळजी घेतली जाते. त्यामुळे अनेकदा कन्फर्म तिकीट नाही मिळालं तर निदान प्रवास नीट होण्याकडे रेल्वेने लक्ष दिल्याचं या निर्णयावरुन दिसून येत आहे.
इतर महत्वाची बातमी-