India Q2 GDP Data : सलग दुसऱ्या तिमाहीत आर्थिक विकास दर वाढला, गेल्या वर्षीच्या तुलनेत जीडीपी उणे 7.4 वरुन 8.4 टक्क्यांवर
India Q2 GDP Data : जुलै-सप्टेंबर तिमाहीत देशाचा जीडीपी -7.4 टक्यावरुन 8.4% पर्यंत वाढला. यापूर्वी जून तिमाहीत भारताचा जीडीपी 20.1 टक्के होता.
GDP Data for 2nd Quarter Declared : मोदी सरकारने 2021-2021 -22 या आर्थिक वर्षासाठी देशाच्या जीडीपीची आकडेवारी जाहीर केली आहे. जुलै-सप्टेंबर तिमाहीत देशाचा जीडीपी -7.4 टक्यावरुन 8.4% पर्यंत वाढला. यापूर्वी जून तिमाहीत भारताचा जीडीपी 20.1 टक्के होता. 2021-22 मध्ये स्थिर किमतींवर जीडीपी 35.73 लाख कोटी रुपये होता. यापूर्वी 2020-21 च्या दुसऱ्या तिमाहीत हा आकडा 32.97 कोटी रुपये होता. जून तिमाहीत भारताची अर्थव्यवस्था आतापर्यंतच्या सर्वात जलद गतीने वाढली आहे.
चालू वर्षाच्या जुलै ते सप्टेंबर या दुसऱ्या तिमाहीत GDP 8.4 टक्क्यानी वाढली आहे. आर्थिक वर्ष 21-22 च्या पहिल्या तिमाहीत म्हणजे एप्रिल ते जून या काळामध्ये जीडीपी 20.1 टक्यांनी वाढला आहे. केंद्र सरकारने या संदर्भातील आकडेवाडी आज (मंगळवारी) जाहीर केली. आर्थिक वर्ष 2021-22 या दुसऱ्या तिमाहीत जीडीप 35.73 लाख कोटी रुपयांवर गेला आहे. जो गेल्या वर्षी 32.97 लाख कोटी रुपयांवर पोहचले आहे.
NSO ने आकडे जाहीर करताना सांगितले की, आर्थिक वर्ष 2021-22 च्या दुसऱ्या तिमाहीत मॅन्युफ्ॅक््चरिंग सेक्टरची ग्रॉस व्हॅल्यू एडेड (GVA) ग्रोथ 5.5 टक्के आहे. ही ग्रोथ गेल्या वर्षी दुसऱ्या तिमाहीत - 1.5 टक्के एवढी नोंडवण्यात आली आहे. कृषी क्षेत्राचा GVA Growth 4.5 टक्के आहे. जो गेल्यावर्षी दुसऱ्या तिमाहीत 3.0 टक्के इतका होता.
बांधकाम आणि गृहनिर्मिती क्षेत्राचा GVA Growth 7.5 टक्के आहे. जो गेल्यावर्षी दुसऱ्या तिमाहीत 3.0 टक्के इतका होता. खणीकर्म - खाणव्यवसायात 15.4 टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. तसंच विद्युत, गॅस, पाणीपुरवठा यासारख्या लोकोपयोगी सेवा क्षेत्रात मात्र वाढ झाल्याचं आकडेवारीवरून पाहायला मिळतं असून 8.9 टक्के एवढी वाढ नोंदवण्यात आला आहे. तसेच ट्रेड, हॉटेल, ट्रान्सपोर्ट, कम्युनिकेशन आणि ब्रॉडकास्टिंगशी जोडलेल्या सेवांमध्ये 8.2 टक्के वाढ पाहायला मिळणार आहे. तसेच फायनान्शिअल, रिअल एस्टेट आणि प्रोफेशनल सेवांमध्ये 7.2 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
संबंधित बातम्या :