EPFO Link Aadhaar : आधार UAN नंबरशी लिंक केलं? आज शेवटचा दिवस, नाहीतर होईल आर्थिक नुकसान
UAN-Aadhaar Link Ladt Date : PF धारकांसाठी महत्त्वाचं! 30 नोव्हेंबरपर्यंत जर UAN नंबर आधारशी लिंक केलं नाही. तर आर्थिक नुकसान होऊ शकतं.
UAN-Aadhaar Link Ladt Date : तुम्ही तुमचं आधार कार्ड UAN ला लिंक केलंय का? नसेल केलं तर आजच करा. कारण आज शेवटचा दिवस आहे. जर आजच आधार कार्ड लिंक केलं नाही, तर तुम्हाला मोठा आर्थिक फटका बसू शकतो. याव्यतिरिक्त ईपीएफ अकाउंटमध्ये मासिक कॉन्ट्रीब्युशनही जमा होणार नाही. त्यामुळे तुमच्याकडे फक्त आजचा वेळ आहे. तुम्ही EPFO च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन उमंग अॅपमार्फत लिंक करु शकता.
एम्प्लॉई प्रॉविडंट फंड ऑर्गनायजेशनने (EPFO)अनेकदा सांगितलं आहे की, जर पीएफ (Provident Fund) सब्स्क्रायबर्सनी 30 नोव्हेंबरपर्यंत आपल्या UAN ला आधारशी लिंक केलं नाही, तर त्यांचं खातं बंद होईल. यामध्ये पीएफचे पैसे जमा होऊ शकणार नाही आणि पगारदार वर्गातील कर्मचारी त्यांच्या पीएफ खात्यातून पैसे काढू शकणार नाहीत.
ईपीएफओने या संबंधित समस्या सोडवण्यासाठी एका अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे आणि त्यांच्याद्वारे तुम्ही तुमची समस्या सोडवू शकता. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्ही तुम्हाला वारंवार आठवण करून देत आहोत की, ज्या लोकांनी त्यांचा UAN (युनिव्हर्सल अकाउंट नंबर) आधार (AADHAAR) शी लिंक केलेला नाही, त्यांनी ते त्वरित करावा अन्यथा 30 नोव्हेंबर 2021 च्या रात्रीनंतर हे काम शक्य होणार नाही.
जर पगारदार वर्गाला त्यांच्या कंपनीकडून हे काम करण्याची वारंवार आठवण करून दिली जाते. परंतु, तरीही काही संस्था किंवा संस्थेतील कर्मचारी UAN आधारशी लिंक करणं टाळतात, अशातच आता त्यांच्याकडे 29 आणि 30 नोव्हेंबरचे दिवस शिल्लक असून त्यांनी हे काम तातडीने करावं, असंही EPFO अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
कंपनीकडून मिळालेली विम्याची रक्कमही जमा केली जाणार नाही
पीएफ खात्यावर कर्मचाऱ्यांना इंशोरन्स कव्हर मिळतो. त्यासाठीही UAN आधारला लिंक करणं गरजेचं आहे. एंप्लाई डिपॉजिट लिंक्ड इंश्योरंस अंतर्गत ज्या 7 लाख रुपयांचा विमा कवच कर्मचाऱ्यांना मिळतं. त्याची रक्कमही खात्यात जमा होणार नाही.
EPFO खातं आधार कार्डाशी कसं लिंक कराल?
1. सर्वात आधी EPFO ची अधिकृत वेबसाईट epfindia.gov.in ला भेट द्या. आपलं अकाउंट लॉग इन करा.
2. त्यानंतर 'ऑनलाइन सेवा' पर्याय क्लिक करा. नंतर 'ई-केवायसी पोर्टल' वर जाऊन, Link UAN Aadhaar या पर्यायावर क्लिक करा.
3. तिथे तुमचा UAN क्रमांक आणि रजिस्टर मोबाईल नंबर प्रविष्ट करा.
4. मोबाईल नंबर तिथे प्रविष्ट केल्यानंतर त्या नंबरवर OTP येईल. तिथे ओटीपी आणि आधार नंबर तिथे टाका.
5. यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा आणि ओटीपी व्हेरिफिकेशन करून घेऊन आपला मोबाईल नंबर रजिस्टर करून घ्या. .
6. यानंतर, EPFO कडून आधार-ईपीएफ अकाउंट लिंकिंग ऑथन्टिकेशनसाठी तुम्ही काम करत असलेल्या कंपनीशी संपर्क साधला जाईल. तुमच्या कंपनीकडून आधारला ईपीएफ अकाउंटशी जोडण्यासाठी व्हेरिफिकेशन मिळाल्यानंतर अकाउंट आधार कार्डाशी जोडलं जाईल
7. ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुमचं EPFO खातं आधारशी लिंक केलं जाईल.