India's Economy: 2023 मध्ये भारताचा विकास दर होईल 7.5 टक्के, जाणून घ्या काय आहे ADBचा अंदाज
Economic Growth: आशियाई विकास बँकेने (ADB) बुधवारी आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये दक्षिण आशियाई अर्थव्यवस्थांसाठी सात टक्के सामूहिक वाढीचा अंदाज व्यक्त केला आहे.
Economic Growth: आशियाई विकास बँकेने (ADB) बुधवारी आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये दक्षिण आशियाई अर्थव्यवस्थांसाठी सात टक्के सामूहिक वाढीचा अंदाज व्यक्त केला आहे. या क्षेत्रातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या भारताचा चालू आर्थिक वर्षात 7.5 टक्के आणि पुढील वर्षी आठ टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा आहे.
ADO ने अहवाल केला प्रसिद्ध
'एशियन डेव्हलपमेंट आऊटलूक' (ADO) 2022 जारी करताना 'मल्टी-लॅटरल फंडिंग एजन्सी' ने म्हटले आहे की, दक्षिण आशियातील विकास दर 2023 मध्ये 7.4 टक्क्यांपर्यंत पोहोचण्यापूर्वी 2022 मध्ये सात टक्क्यांपर्यंत मंदावण्याचा अंदाज आहे. या क्षेत्रातील विकासाची गती मुख्यतः भारत आणि पाकिस्तानवर अवलंबून आहे.
2022 मध्ये 7 टक्के विकास दर वाढण्याची अपेक्षा
एजन्सीने ADO अहवालात म्हटले आहे की, "दक्षिण आशियाई अर्थव्यवस्था सामूहिकपणे 2022 मध्ये 7 टक्के आणि 2023 मध्ये 7.4 टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा आहे. या क्षेत्रातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या भारताची चालू वर्षात 7.5 टक्के आणि पुढील आर्थिक वर्षात 8 टक्के वाढ अपेक्षित आहे.
2022 मध्ये पाकिस्तानचा विकास दर 4 टक्के असेल
या अहवालानुसार, 2023 मध्ये 4.5 टक्क्यांपर्यंत वाढण्यापूर्वी कमकुवत देशांतर्गत मागणीमुळे 2022 मध्ये पाकिस्तानची आर्थिक वाढ मध्यम ते चार टक्क्यांपर्यंत राहण्याचा अंदाज आहे. ADB ने म्हटले आहे की, देशांतर्गत मागणी आणि निर्यातीतील सततच्या विस्तारामुळे विकसनशील आशियातील अर्थव्यवस्था या वर्षी 5.2 टक्के आणि 2023 मध्ये 5.3 टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
Call drops : कॉल ड्रॉपवर सरकार गंभीर, टेलिकॉम कंपन्यांचा परवाना रद्द करण्याची तयारी!
Share Market : सलग दुसऱ्या सत्रात शेअर बाजार घसरला, Sensex 566 तर Nifty 149 अंकांनी घसरला
Call drops : कॉल ड्रॉपवर सरकार गंभीर, टेलिकॉम कंपन्यांचा परवाना रद्द करण्याची तयारी!
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha