Call drops : कॉल ड्रॉपवर सरकार गंभीर, टेलिकॉम कंपन्यांचा परवाना रद्द करण्याची तयारी!
Call Drops Issue : देशात कॉल ड्रॉप ही मोठी समस्या बनत चालली आहे. याला तोंड देण्यासाठी सरकार टेलिकॉम कंपन्यांवर कडक कारवाई करण्याच्या तयारीत आहे.
Call Drops Issue : देशात कॉल ड्रॉप ही मोठी समस्या बनत चालली आहे. याला तोंड देण्यासाठी सरकार टेलिकॉम कंपन्यांवर कडक कारवाई करण्याच्या तयारीत आहे. माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी, ही एक गंभीर समस्या सरकार गांभीर्याने यावर कडक पावले उचलणार असल्याचं त्यांनी लोकसभेत म्हटलं. कॉल ड्रॉप्सच्या समस्येला तोंड देण्यासाठी सरकारकडून कोणती प्रस्तावित पावले उचलली जातील यावर नजीकच्या काळात विचार केला जाईल, असे ते म्हणाले. दूरसंचार कंपन्या कॉल ड्रॉपची समस्या सोडवण्यात अपयशी ठरल्यास त्यांचे परवाने रद्द करण्यात यावेत, असाही विचार सरकारचा असल्याचं त्यांनी सांगितलं
ट्राय कंपन्यांवर लक्ष
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) या कंपन्यांनी सादर केलेल्या त्रैमासिक कामगिरी देखरेख अहवालाच्या (PMRs) आधारावर परवानाधारक सेवा क्षेत्रासाठी (TSPs) दूरसंचार सेवा प्रदात्यांच्या कामगिरीवर लक्ष ठेवून आहोत असंही केंद्रीय मंत्र्यांनी सांगितलं.
कॉल ड्रॉप वर TRAI बेंचमार्क
भारतातील TSP ला त्यांच्या मोबाईल नेटवर्कवरील कॉल ड्रॉप्स TRAI ने सेट केलेल्या बेंचमार्कमध्ये असल्याची खात्री करणे आवश्यक आहे. या संदर्भात, TRAI ने 'मूलभूत टेलिफोन सेवा (वायरलाइन) आणि सेल्युलर मोबाइल टेलिफोन सेवा (पाचवी दुरुस्ती) नियमन-2019' या नावाने एक अधिसूचना देखील जारी केली आहे. 1 ऑक्टोबर 2017 पासून लागू आहे.
समस्येचे निराकरणासाठी धोरणात्मक पुढाकार
दूरसंचार विभागाने दर्जेदार सेवांच्या दृष्टीने पायाभूत सुविधांच्या विकासासाठी धोरणात्मक पुढाकार घेतला आहे.
यामध्ये ट्रेडिंग, शेअरिंग, स्पेक्ट्रम उदारीकरण, सक्रिय पायाभूत सुविधा शेअरिंगला परवानगी देणे, टॉवर उभारण्यासाठी सरकारी जमीन/इमारती उपलब्ध करून देणे इत्यादींचा समावेश आहे.
देशभरात मार्च 2014 ते मार्च 2022 या कालावधीत TSPs द्वारे 2G/3G/4G-LTE सेवांसाठी सुमारे 16.82 लाख अतिरिक्त बेस ट्रान्सीव्हर स्टेशन (BTS) जोडले गेले आहेत.
कॉल ड्रॉप्सवर ग्राहकांकडून थेट फीडबॅक मिळवण्यासाठी DoT ने इंटरएक्टिव्ह व्हॉईस रिस्पॉन्स सिस्टम (IVRS) लाँच केले आहे.
यामध्ये डिसेंबर 2016 पासून सुमारे 5.67 कोटी ग्राहकांशी वैयक्तिक संपर्क साधण्यात आला आहे. त्यापैकी ७३.६१ लाख ग्राहक सर्वेक्षणात सहभागी झाले आहेत.
ठराविक वेळेत सुधारात्मक कारवाई करण्यासाठी अभिप्राय TSP सोबत सामायिक केला जातो. यासह, कॉल ड्रॉप्सचा सामना करत असलेल्या सुमारे 1.73 लाख प्रकरणांचे निराकरण करण्यात आले आहे.