Share Market : सलग दुसऱ्या सत्रात शेअर बाजार घसरला, Sensex 566 तर Nifty 149 अंकांनी घसरला
Share Market : ऑईल अॅंड गॅस, मेटल या क्षेत्रातील शेअर्समध्ये एक टक्क्यांची वाढ झाली आहे. तर बँक आणि आयटी क्षेत्रातील शेअर्स एक टक्क्यांनी घसरले आहेत.
मुंबई: जागतिक स्तरावरील घडामोडी आणि ऑटो, बँक आणि आयटी क्षेत्रात झालेल्या विक्रीमुळे आज सलग दुसऱ्या सत्रामध्ये शेअर बाजारात घसरण झाल्याचं दिसून आलं आहे. आज शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्स 566 अंकांनी घसरला आहे तर निफ्टीही 149 अंकानी घसरला आहे. सेन्सेक्समध्ये 0.94 टक्क्यांची घसरण होऊन तो 59,610 वर पोहोचला आहे तर निफ्टीमध्ये 0.83 टक्क्यांची घसरण होऊन तो 17,807 वर पोहोचला आहे.
आज 2094 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे तर 1229 शेअर्समध्ये घसरण झाली आहे. 92 कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही.
आज बाजार बंद होताना मेटल, उर्जा, ऑईल अॅन्ड गॅस या क्षेत्रातल्या शेअर्समध्ये एक टक्क्यांची वाढ झाली. तर बँक आणि आयटी सेक्टरच्या शेअर्समध्ये एक टक्क्यांची घसरण झाल्याचं दिसून आलं आहे. BSE मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्ये काहीशी वाढ झाली आहे.
बुधवारी शेअर बाजारात HDFC Bank, HDFC, HDFC Life, HCL Technologies आणि Tech Mahindra या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये मोठी घसरण झाली असून ONGC, Tata Motors, SBI, Coal India आणि UPL या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये वाढ झाली आहे.
या कंपन्यांचे शेअर्स वधारले
- Coal India- 3.17 टक्के
- IOC- 2.77 टक्के
- NTPC- 2.62 टक्के
- Tata Steel- 1.92 टक्के
- Power Grid Corp- 1.54 टक्के
या कंपन्यांचे शेअर्स घसरले
- HDFC Bank- 3.57 टक्के
- HDFC- 3.34 टक्के
- HDFC Life- 2.42 टक्के
- HCL Tech- 2.09 टक्के
- Tech Mahindra- 1.99 टक्के
भारतीय शेअर बाजारातील आजच्या व्यवहाराची सुरुवात घसरणीसह झाली. आशियाई शेअर बाजारात सुरू असलेल्या घसरणीचा परिणाम भारतीय शेअर बाजारातही दिसून आला.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह -
ABP Majha