देशातील फक्त 'या' दोन शहरात प्रॉपर्टी खरेदीसाठी झुंबड; रोजगारासाठी सुद्धा धावाधाव
देशातील मुख्य दोन शहरांमध्ये प्रॉपर्टी खरेदीसाठी झुंबड पाहायला मिळत आहे. कारण रोजगासाठी लोक या शहरांकडे मोठ्या प्रमाणात येत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळं घरांच्या दरात वाढ होत आहे.
India Property Rates : भारतीय अर्थव्यवस्था (Indian Economy) वेगानं प्रगती करत आहे. इतर देशांच्या तुलने भारतीय अर्थव्यवस्था मजबूत स्थितीत असल्याचं बोललं जात आहे. याचा परिणाम म्हणून देशातील अनेक भागात मालमत्तेच्या दरात (Property Rates) मोठी वाढ होताना दित आहे. देशातील मुख्य दोन शहरांमध्ये प्रॉपर्टी खरेदीसाठी झुंबड पाहायला मिळत आहे. कारण रोजगासाठी लोक या शहरांकडे मोठ्या प्रमाणात येत असल्याचं पाहायला मिळत आहे. एका अहवालात याबाबतची माहिती देण्यात आली आहे.
मुंबई आणि दिल्ली या दोन शहरातील मालमत्तेच्या किंमतीत मोठी वाढ
प्राइम ग्लोबल सिटीज इंडेक्स Q1 2024 मध्ये भारतातील मुंबई आणि दिल्ली या दोन शहरातील मालमत्तेच्या किंमतीत मोठी वाढ झालीय. जानेवारी ते मार्च दरम्यान मुंबईतील मालमत्तेच्या किंमतीत वार्षिक आधारावर 11.5 टक्के वाढ झाली आहे. तर देशाची राजधानी दिल्लीत घरांच्या किमती वार्षिक आधारावर 10.5 टक्क्यांनी वाढल्या आहेत. ही वाढ जगातील टॉप 44 शहरांमधील मालमत्तेच्या आधारे ठरवण्यात आली आहे. वार्षिक GDP वाढ 8 टक्क्यांहून अधिक असताना, संपूर्ण भारतातील मजबूत आर्थिक वाढीमुळे मुख्य शहरांमध्ये, विशेषतः दिल्ली आणि मुंबईमध्ये घरांच्या किमती वाढल्या आहेत, असे अहवालात म्हटले आहे.
भारतात मालमत्तेच्या किमती झपाट्याने का वाढतायेत?
जगातील टॉप 44 शहरांच्या मालमत्तेच्या किंमतींच्या आधारे तयार करण्यात आलेल्या या अहवालात मनिला 26.2 टक्के वार्षिक वाढीसह अव्वल स्थानावर असल्याचे सांगण्यात आले. यानंतर टोकियोचा क्रमांक लागतो. जिथे मालमत्तेच्या किंमती 12.5 टक्क्यांनी वाढल्या आहेत. अहवालात भारताचा जीडीपी विकास दर 8 टक्क्यांहून अधिक असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळं देशात घरांच्या किमती वाढल्या आहेत. अहवालात दिलेल्या माहितीनुसार, 2024 च्या पहिल्या तिमाहीत जगातील टॉप 44 शहरांमधील मालमत्तेच्या किमतींमध्ये वार्षिक 4.1 टक्के वाढ झाली आहे. जी 2022 च्या तिसऱ्या तिमाहीपासून सर्वाधिक आहे. त्रैमासिक आधारावर, 2024 मध्ये 2023 च्या पहिल्या तिमाहीत मासिक आधारावर मालमत्तेच्या किंमतीत सरासरी वाढ 1.1 टक्के होती, जी 2023 च्या चौथ्या तिमाहीत 0.3 टक्के होती. सध्या घरांना जास्त मागणी आहे. वाढत्या मागणीमुळं घरांच्या किंमतीत वाढ होत असल्याचे दिसत आहे. मागणीसमोर पुरवठाही मर्यादित राहतो, त्यामुळे घरांच्या किमतीत मोठी वाढ होत आहे. दरम्यान, दुसरीकडे मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी या मुंबई आणि दिल्लीत आहेत. त्यामुळं मोठ्या प्रमाणात नागरिक शहरांकडे जात आहेत. परिणामी घरांच्या किंमतीत वाढ होत आहे.
महत्वाच्या बातम्या:
Ranveer Singh Net Worth : रणवीर की दीपिका कोण आहे जास्त श्रीमंत, एकूण संपत्ती किती? वाचा सविस्तर
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)