(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IT कंपन्यांमध्ये निराशा! ना पगारवाढ ना पदोन्नती, नेमकी स्थिती काय? सविस्तर माहिती एका क्लिकवर
IT Companies : आयटी क्षेत्रात (IT Sector) आलेल्या जागतिक मंदीच्या (Global recession) भीतीनं कर्मचारी चिंतेत आहेत. कारण यावर्षी अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांची पगारवाढ तसेच पदोन्नती केली नाही.
IT Companies : आयटी क्षेत्रात (IT Sector) आलेल्या जागतिक मंदीच्या (Global recession) भीतीनं कर्मचारी चिंतेत आहेत. इन्फोसिससह (Infosys) अनेक मोठ्या कंपन्यांनी यंदा पगार वाढवला नाही तसेच पदोन्नतींची संख्या देखील कमी केली आहे. कंपन्या नवीन कर्मचार्यांना (employee) कामावर घेण्यास उत्सुक नाहीत किंवा त्यांनी यावर्षी त्यांच्या कर्मचार्यांना कोणतीही वेतनवाढ (increment) किंवा पदोन्नती (promotions) दिली नाही. त्यामुळं आयटी क्षेत्रातील कर्मचारी निराश आहेत.
बंगळुरुमधील इन्फोसिसने पगारवाढ आणि पदोन्नतीचा निर्णय यावर्षी उशिरा घेतला. परंतु, यंदा पगारात 10 टक्क्यांहून कमी वाढ झाल्यानं कर्मचाऱ्यांची निराशा झाली आहे. इन्फोसिसने पगारवाढीचे पत्र देतानाच कर्मचाऱ्यांनी कठीण काळात साथ दिल्याबद्दल त्यांचे आभारही मानले आहेत. तर काही आयटी कंपन्यांनी पगारवाढ केली नाही. त्यामुळं या क्षेत्रातील जागतिक मंदीचा परिणाम गरीब कर्मचाऱ्यांवर झाला आहे.
आयटी कंपन्या नवीन नियुक्त्या करण्याची शक्यता कमी
इकॉनॉमिक टाइम्सच्या रिपोर्टनुसार, अमेरिका आणि युरोपमधील अनेक मोठ्या आयटी कंपन्यांचे मुख्यालय बंगळुरुमध्ये आहे. आयटी क्षेत्रात जवळपास 60 टक्के खर्च फक्त कर्मचाऱ्यांवर होतो. हा मोठा खर्च हाताळण्यासाठी आयटी कंपन्यांनी यावर्षी कमी पगारवाढ दिली आहे. याशिवाय पदोन्नतींची संख्याही कमी करण्यात आली आहे. अलीकडेच अनेक अहवाल आले आहेत, ज्यावरून असे दिसून आले आहे की या वर्षी आयटी कंपन्या नवीन नियुक्ती करण्यात रस दाखवत नाहीत.
नवीन कर्मचाऱ्यांचे पगार वाढवले नाहीत
मंदीचा हा ट्रेंड जवळपास वर्षभर सुरू आहे. मात्र, येत्या सहा महिन्यांत मंदीवर मात होईल, असा आशावाद कंपन्यांना आहे. मात्र तोपर्यंत परिस्थिती बिघडू नये म्हणून कंपन्या खबरदारी घेत आहेत. यंदा नवीन कर्मचाऱ्यांना पगारवाढ देण्यात आलेली नाही.
पगाराच निम्मीच वाढ, पदोन्नती थांबली
एका आयटी कर्मचाऱ्याच्या मते, दरवर्षी कंपन्या पगारात सुमारे 20 टक्के वाढ करतात. एखाद्याला प्रमोशन मिळाले तर त्याचा पगार 50 टक्क्यांनी वाढतो. यावर्षी अनेक पदोन्नती थांबवण्यात आल्या आहेत. तसेच ज्यांना पदोन्नती मिळाली त्यांना केवळ 10 ते 20 टक्के पगारवाढ देण्यात आली.
नोकऱ्या बदलणाऱ्यांना केवळ 20 टक्के पगारवाढ
यावर्षी कंपन्यांनी नोकऱ्या बदलणाऱ्यांना केवळ 20 टक्के पगारवाढ दिली आहे. पूर्वी हा आकडा 40 टक्क्यांपर्यंत असायचा. काही प्रकरणांमध्ये, पगारात 100 ते 120 टक्के वाढ झाली. 2023 मध्ये 2007 ते 2009 सारखीच परिस्थिती राहील. या दोन वर्षांत आयटी क्षेत्रावर वाईट परिणाम झाला आहे.
AI मुळं आयटी व्यावसायिक चिंतेत
एका आयटी कंपनीच्या एचआर मॅनेजरने दिलेल्या माहितीनुसार, ऑटोमेशन आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) मुळे नोकऱ्या गेल्या आहेत. यामुळं आयटी व्यावसायिक चिंतेत आहेत. ही अवस्था कधी संपेल हे कोणालाच माहीत नाही. कोरोना महामारीच्या काळात आयटी कर्मचाऱ्यांची मागणी खूप वाढली होती. कंपन्यांकडून लोकांना महागड्या कार, बाईक अशा भेटवस्तूही मिळाल्या होत्या. पण सध्या परिस्थिती बदलल्याचे चित्र दिसत आहे.
महत्त्वाच्या बातम्या: