एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

कांद्यावरील निर्यातबंदी उठवा, चांगला दर द्या, लासलगाव बाजार समितीत लिलाव बंद, शेतकरी आक्रमक

कांद्याच्या निर्यातबंदीवरुन (Onion Export Ban) सध्या राज्यातील वातावरण चांगलच गरम झाल्याचं पाहायला मिळत आहे. लासलगाव बाजार समितीत आज शेतकऱ्यांकडून कांदा लिलाव बंद पाडण्यात आले आहेत.

Onion : कांद्याच्या निर्यातबंदीवरुन (Onion Export Ban) सध्या राज्यातील वातावरण चांगलच गरम झाल्याचं पाहायला मिळत आहे. विविध शेतकरी संघटनांसह शेतकरी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. कारण कांद्याच्या दरात मोठी (Oion Price) घसरण झाली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. दरम्यान, लासलगाव बाजार समितीत शेतकऱ्यांकडून कांदा लिलाव बंद पाडण्यात आले आहेत. दुसरीकडे NCCF (National Cooperative Consumers​ Federation) कडून कांदा खरेदी सुरू असल्याचा दावा सरकारकडून केला जात असला तरी प्रत्यक्षात कांदा खरेदी होत नसल्याची शेतकरी ओरड करत आहेत.

लासलगाव बाजार समितीत शेतकरी आक्रमक झाले आहेत. शेतकऱ्यांकडून लासलगाव बाजार समितात कांद्याचे लिलाव बंद पाडण्यात आले आहेत. निर्यातबंदीवरुन कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत. तर कांद्याला चांगला हमीभाव मिळावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. सरकारनं तातडीनं कांद्यावरील निर्यातबंदी उठवावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केलीय. तसेच शेतकऱ्यांनी केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी केली.


कांद्यावरील निर्यातबंदी उठवा, चांगला दर द्या, लासलगाव बाजार समितीत लिलाव बंद, शेतकरी आक्रमक

लासलगावात कांद्याला सरासरी 2100 रुपयांचा दर

लासलगाव बाजार समितात सध्या कांद्याला सरासरी 2100 रुपयांचा दर मिळत आहे. तर कमीत कमी 800 तर जास्तीत जास्त 2304 रुपयांचा भाव मिळत आहे. कांदा निर्यात बंदी उठवावी, यासाठी बाजार समितीत शेतकऱ्यांनी आमरण उपोषण देखील सुरु केलं आहे. 

NCCF कडून कांदा खरेदी सुरु नाहीच

केंद्र सरकारनं कांद्यावर निर्यातबंदी केल्यानंतर कांद्याचे भाव सतत कोसळत असल्यानं मनमाड येथील शेतकरी संतप्त झाले आहेत. कांद्याच्या दरात सुरु असलेली घसरण सुरुच आहे. दुसरीकडे NCCF कडून कांदा खरेदी सुरु असल्याचा दावा सरकारकडून केला जात आहे. प्रत्यक्षात मात्र, कांदा खरेदी होत नसल्याची ओरड शेतकऱ्यांनी केलीय. 

सोलापूर बाजार समितीत केवळ 600 ट्रक कांदा लिलावसाठी सोडला जाणार

सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवारी कांदा लिलावमध्ये गोंधळ झाला होता. या गोंधळानंतर आज पुन्हा बाजार सुरु झाला आहे. कांद्याच्या लिलावासाठी बाजार समितीनं नवीन नियम केले आहेत. बाजारात आता केवळ 600 ट्रक कांदा लिलावसाठी सोडला जाणार आहे. उर्वरित कांदा गाड्यांना दुसऱ्या दिवशीच्या लिलावसाठी टोकन नंबर देऊन पार्किंगमध्ये थांबवले जाणार आहे. बाजारात लिलाव झालेला कांदा बाहेर पडल्याशिवाय बाहेरील गाड्या आतमध्ये सोडल्या जाणार नाहीत. बाजार समितीच्या नवीन नियमामुळं बाजारात आज कोणताही गोंधळ नाही, शिस्तबद्ध पद्धतीने बाजारात लिलाव सुरु आहेत. कांद्याचे दर देखील स्थिर आहेत. आज कांद्याला साधारण 1800 ते 2200 रुपये दर मिळत आहे. 

महत्त्वाच्या बातम्या:

दरवर्षीच का होतो कांद्याचा वांदा? निर्यातबंदीचा शेतकऱ्यांना किती बसतोय फटका? जाणून घ्या सविस्तर माहिती

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
Maharashtra vidhansabha Results : रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित
रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित देशमुख
Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
Maharashtra vidhansabha results 2024 : नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Naresh Arora on Ajit Pawar win :अजितदादा एकदम साधा माणूस, कुठे सौम्य, कुठं कडक असावं ते त्यांना कळलंDhananjay Mahadik on Satej Patil | पुतण्याला निवडून आणता आलं नाही आणि मुख्यमंत्री बनायले निघालेNarayan Rane On Vidhan Sabha Result : महाराष्ट्रात आता तोंड दाखवू नका, उद्धव ठाकरेंवर सडकून टीकाAmruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
Maharashtra vidhansabha Results : रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित
रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित देशमुख
Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
Maharashtra vidhansabha results 2024 : नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
Koregaon Assembly Elections 2024 : महेश शिंदेंचा कोरेगावात दणदणीत विजय, शशिकांत शिंदेंचा पुन्हा पराभव
महेश शिंदेंचा कोरेगावात दणदणीत विजय, शशिकांत शिंदेंचा पुन्हा पराभव
Karjat Jamkhed : हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
Maharashtra Vidhan Sabha Election results 2024: ठाकरे ब्रँण्ड संकटात, विधानसभेचे भुईसपाट करणारे निकाल, आता इगो सोडून राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार का?
ठाकरे ब्रँण्ड संकटात, विधानसभेचे भुईसपाट करणारे निकाल, आता इगो सोडून राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार का?
Uddhav Thackeray : महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, उद्धव ठाकरे यांनी पराभवाचं कारण सांगितलं...
महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, विधानसभा निवडणुकीच्या निकालावर ठाकरेंची दोन शब्दांची प्रतिक्रिया
Embed widget