एक्स्प्लोर

50-30-20 चा नियम आहे तरी काय? पगार संपणार नाही, सेव्हिंगही होणार भरपूर!

महिन्याच्या पहिल्या तारखेला आलेला पगार हा कधी संपतो हे अनेकांना समजतही नाही. त्यामुळे या सूत्राचा वापर करून चांगल्या प्रकारे सेव्हिंग करता येऊ शकते.

मुंबई : नोकरदार वर्गाची पगार ही एक मोठी समस्या असते. नोकरदार महिनाभर पुढच्या पगाराची (Monthly Salary) वाट पाहात असतात. विशेष म्हणजे पगार झाल्यानंतर पुढच्या दहा दिवसांत तो कोठे जातो, हे अनेकांना समजतही नाही. हातात पैसे शिल्लक न राहिल्यामुळे हेच पगारदार पैशांची गुंतवणूक करू शकत नाहीत. त्यामुळेच आलेल्या पगाराचे योग्य नियोजन लावणे गरजेचे आहे. हाताशी काहीतरी पैसे ठेवून ते म्यूच्यूअल फंड (Mutual Fund), शेअर बाजार (Share Market) यामध्ये गुंतवणे गरजेचे आहे. मात्र अनेक लोकांना हे प्रत्यक्ष शक्य होत नाही. याच पार्श्वभूमीवर खर्चाचा ताळमेळ राखण्यासाठी 50-30-20 चा नियम तुम्हाला फार मदत करू शकतो. हा नियम काय आहे? हे जाणून घेऊ या...

50-30-20 नियम काय आहे? (What is 50-30-20 formula)

50-30-20 हा नियम सर्वप्रथम अमेरिकी सीनेट तसेच टाईम मॅगझीनमध्ये प्रभावशाली 100 लोकांमध्ये स्थान मिळवणाऱ्या एलिझाबेथ वॉरेन यांनी आणला होता. याच नियमाबाबत सविस्तर माहिती देण्यासाठी त्यांनी त्यांच्या मुलीला सोबत घेऊन 2006 साली All Your Worth: The Ultimate Lifetime Money Plan नावाचे एक पुस्तक लिहिले होते. या 50-30-20 नियमाअंतर्गत त्यांनी त्यांच्या पगाराचे तीन भाग केले होते. आवश्यकता, इच्छा आणि बचत असे हे तीन भाग होते. एलिझाबेथ वॉरेन यांच्या मतानुसार पगारातील 50 टक्के हिस्सा हा गरजेच्या वस्तूंवर खर्च केला पाहिजे. त्या वस्तूंशिवाय आपण जगूच शकत नाही, अशा वस्तूंवर हा 50 टक्के हिस्सा खर्च करावा, असे वॉरेन यांचे मत आहे. यामध्ये घरातील रेशन, घरभाडे, यूटिलिटी बिल, मुलांचे शिक्षण, ईएमआय, आरोग्य विमा इत्यादी गोष्टींचा समावेश होतो. 

30 टक्के रक्कम कोठे खर्च करावी?

त्यानंतर 50-30-20  या नियमाच्या दुसऱ्या भागात 30 टक्के खर्चाच्या नियोजनाबद्दल सांगितलेले आहे. पगारातील 30 टक्के खर्च हा तुमची इच्छा असणाऱ्या गोष्टींवर खर्च केला पाहिजे. या अशा गोष्टी आहेत, ज्यांना तुम्ही टाळू शकता, पण त्या गोष्टींसाठी पैसे खर्च केल्यावर आनंद मिळतो. यामध्ये चित्रपट पाहणे, पार्लर, शॉपिंग, बाहेर जेवायला जाणे अशा गोष्टी या 30 टक्के खर्चात येतात. 

20 टक्के रक्कम सेव्हिंगसाठी ठेवून द्यावी

50-30-20  या नियमात शेवटचा भाग आहे तो 20 टक्के खर्चाचे नियोजन कसे करावे. एलिझाबेथ यांच्या मतानुसार पगारातील 20 टक्के भाग हा सेव्हिंगसाठी ठेवून द्यायला हवा. या पैशांचा उपयोग, निवृत्तीनंतरचे नियोजन, मुलांचे शिक्षण, मुलांचे लग्न, एमर्जन्सी फंड यासाठी राखून ठेवला पाहिजे.  

उदाहरणासह समजून घ्या 50-30-20 नियम 

समजा तुमचा महिन्याला येणारा पगार हा 50 हजार आहे. यातील साधारण 50 टक्के भाग 25 हजार रुपये हे रेशन, वीजबील, पाणीबील, मुलांची फी, पेट्रोल अशा अत्याशक्यक, न टाळता येणाऱ्या गोष्टींवर खर्च करावेत. त्यानंतर 30 टक्के पैसे म्हणजेच 15 हजार रुपये हे फिरायला जाणे, चित्रपट पाहणे, शॉपिंग करणे, मोबाईल, टीव्ही खरेदी करणे अशा  आवडीच्या, इच्छा असणाऱ्या कमांसाठी खर्च करता येतील. उर्वरीत 20 टक्के म्हणजेच 10 हजार रुपये हे  गुंतवणुकीसाी जपून ठेवले पाहिजेत. यामध्ये एफडी, निवृत्तीसाठी एनपीएस, पीपीएफ, म्यूच्यूअल फंड, एसआयपी यामध्ये हे पैसे गुंतवावेत. 

हेही वाचा :

'या' चार योजनांत गुंतवणूक करा अन् टेन्शन फ्री व्हा, म्हातारपणी मिळणार भरघोस पेन्शन!

एसआयपी करताना फक्त 'ही' चार सूत्रं पाळा, मालामाल व्हा; मिळवा दुप्पट, चौपट परतावा!

चला चला घाई करा! 'या' चार बँका एफडीवर देतायत भरघोस व्याज, मालामाल होण्याची नामी संधी!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
Rahul Gandhi : एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Chhatrapati Sambhaji Nagar : गुगल मॅपने केला गोंधळ, UPSC चे विद्यार्थी परीक्षेपासून वंचितABP Majha Headlines : 2 PM : 16 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTop 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा :16 June 2024 : ABP MajhaIce Cream Human Finger Malad : Ice Cream मध्ये सापडला माणसाच्या बोटाचा तुकडा!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
Rahul Gandhi : एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
तुम्ही 500 पार जरी गेला असतात, तरी...; टी राजाच्या वक्तव्यावरुन मिटकरींचा पलटवार, राष्ट्रवादी-भाजप आमने सामने
तुम्ही 500 पार जरी गेला असतात, तरी...; टी राजाच्या वक्तव्यावरुन मिटकरींचा पलटवार, राष्ट्रवादी-भाजप आमने सामने
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
Lok Sabha Result 2024: रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
गुगल मॅपचा भरोसा नाय काय, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेपासून 50 विद्यार्थी वंचित; मुलींच्या डोळ्यात अश्रू
गुगल मॅपचा भरोसा नाय काय, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेपासून 50 विद्यार्थी वंचित; मुलींच्या डोळ्यात अश्रू
Embed widget