'या' चार योजनांत गुंतवणूक करा अन् टेन्शन फ्री व्हा, म्हातारपणी मिळणार भरघोस पेन्शन!
वृद्धापकाळात आर्थिक अडचणी येऊ नयेत म्हणून अनेकजण वेगवेगळ्या योजनांत पैशांची गुंतवणूक करतात. मात्र अशा चार योजना आहेत, ज्यांच्या माध्यमातून तुम्हाला चांगले मासिक पेन्शन मिळू शकते.
मुंबई : वृद्धापकाळात आर्थिक अडचण येऊ नये म्हणून ज्येष्ठ नागरिक सुरक्षित ठिकाणी पैसे गुंतवण्याचा पर्याय शोधतात. यासाठी बहुसंख्य लोक एफडीमध्यै पैसे टाकतात. मात्र एफडी यासह इतरही अनेक पर्याय आहेत, जेथे तुम्हाला चांगला परतावा मिळतो. याच पार्श्वभूमीवर सर्वांत चांगला परतावा देणाऱ्या पाच योजना जाणून घेऊ या...
सिनियर सिटिझन सेव्हिंग स्कीम
सिनियर सिटिझन सेव्हिंग स्कीम ही ज्येष्ठ नागरिकांसाठीची शासकीय योजना आहे. एकूण पाच वर्षांसाठी या योजनेत गुंतवणूक करता येते. या योजनेत गुंतवलेल्या पैशांवर 8.2 टक्क्यांनी व्याज मिळते. या योनजेत कमीत कमी 1,000 रुपये तर जास्तीत जास्त 30 लाख रुपये गुंतवता येतात. या योजनेत प्राप्तिकराच्या कलम 80सी अंतर्गत 1.5 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर करबचतीचा फायदा मिळतो.
अटल पेन्शन योजना
या योजनेत 18 ते 40 वर्षांपर्यंतचे नागरिक गुंतवणूक करू शकतात. या योजनेत वयाची 60 वर्षे झाले की गुंतवणूकदाराला 1,000 ते 5,000 रुपये पेन्शन मिळते. 18 ते 40 वर्षाच्या कालावधीत तुम्ही किती गुंतवणूक करता, यावरून तुम्हाला किती पेन्शन द्यायचे हे ठरवले जाते.
पोस्ट ऑफिस मासिक पेन्शन योजना
ही एक पोस्ट ऑफिसची मासिक पेन्शन योजना आहे. या योजनेअंतर्गत पाच वर्षांपर्यंत पेन्शन मिळवता येते. या योजनेअंतर्गत गुंतवलेल्या रकमेवर 7.4 टक्के व्याज मिळते. या योजनेत कमीत कमी 9 लाख आणि जास्तीत जास्त 15 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते. या योजनेत एका व्यक्तीला जास्तीत जास्त 5,550 रुपये मासिक पेन्शन मिळते. जॉइंट अकाउंट असेल तर अशा खात्यांवर जास्तीत जास्त 9,250 रुपये मासिक पेन्शन मिळू शकते.
एसडब्ल्यूपी मध्ये म्यूच्यूअल फंड
एसडब्ल्यूपी म्हणजे सिस्टेमॅटिक विदड्रॉअल प्लॅन. या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला महिन्याला निश्चित पेन्शन मिळू शकते. बाजारातील चढ-उताराचा या योजनेवर परिणाम पडतो. म्हणूनच बाजारात मोठी घसरण झाल्यास तुम्ही गुंतवलेले पैसे बुडू शकतात.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. आम्ही या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा या लेखामागचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
हेही वाचा :
SBI चे क्रेडिट कार्ड वापरत असाल तर सावधान, 'हा' नवा नियम जाणून घ्या; अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान!
एसआयपी करताना फक्त 'हे' चार सूत्र पाळा, मालामाल व्हा; मिळवा दुप्पट, चौपट परतावा!